तुम्ही मस्त गाढ झोपेत असता आणि अचानक तुम्हाला हिसका अथवा धक्का बसल्यासारखं वाटतं. कधी कधी तर उंच डोंगरावरून पडल्यासारखं अथवा शेवाळावरून घसरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्ही घाबरून जागे होता आणि तुमच्या लक्षात येतं अरे आपण तर झोपेत होतो. मात्र झोपेत असा धक्का लागल्यामुळे तुमचा श्वास जलद होतो, अंगातून घाम येतो, ह्रदयाची धडधड वाढते. असं जर तुमच्याबाबतीतही होत असेल तर असं का होतं हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. गाढ झोपेत असताना अचानक कोणीतरी धक्का दिल्यासारखं वाटणं या मानसिक अवस्थेला हायपनिक जर्क (Hypnic Jerk)असं म्हणतात.
गाढ झोपेत शरीराला बसणाऱ्या या हिसक्याला वैज्ञानिक भाषेत हायपनिक जर्क असं म्हणतात. हायपनिक जर्क तुमच्या संपूर्ण शरीराला बसू शकतो. खरंतर असा हिसका बसण्यामागच्या कारणावर अजूनही संशोधन सुरूच आहे. अनेकांना हा एकादा गंभीर आजार आहे असंही वाटू शकतं. मात्र हा कोणताही गंभीर आजार नसून ती एक मानसिक आणि शारीरिक अवस्था आहे. बऱ्याचदा आपल्याला या अवस्थेला सामोरं जावं लागतं. जर तुम्ही ताणतणाव, चिंता, काळजीत असाल, नशेच्या आहारी गेलेले असाल अथवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्हाला हायपनिक जर्क लागण्याची शक्यता अधिक असू शकते.
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा जागृती आणि गाढ झोप या अवस्थेत जाताना शरीरात अनेक बदल होतात. आधी हळूहळू तुमचा श्वास मंद होतो, त्यानंतर ह्रदयाचे ठोके संथ गतीने सुरू होतात. त्यानंतर हळूहळू तुम्ही झोपेच्या अधीन जाता. मात्र कधी कधी तुम्ही फार थकलेले असता अशावेळी तुम्हाला पटकन झोप लागावी असं वाटत असतं. ज्यामुळे तु्मचं शरीर या सर्व शारीरिक क्रिया वेगाने करतं ज्यामुळे जागृत अवस्थेतून झोपेत जाण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला हा झटका लागू शकतो. मेंदूला शरीराकडून येणारे संकेत योग्य पद्धतीने न मिळाल्यास हा झटका लागण्याची शक्यता असते. बऱ्याचदा शरीरात असलेल्या पोषकमुल्यांच्या अभावामुळेदेखील हायपनिक झटका लागू शकतो. हायपनिक जर्क लागल्यामुळे तुमची झोपमोड होते आणि नंतर घाबरून तुम्ही बराचवेळ झोपत नाही. याचा परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होऊ शकतो. यासाठीच हायपनिक जर्कला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मात्र हा जर्क सतत बसू नये यासाठी त्यापासून स्वतःचं संरक्षण करणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. हायपनिक जर्क बसण्यामागच्या कारणांविषयी अजूनही संशोधन सुरू असल्यामुळे त्यावर नेमका काय उपाय करावा हे सांगता येणं कठीण आहे. मात्र जीवनशैलीत योग्य बदल करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
बहुगुणी हिरड्याचे आहेत 'हे' अनेक आरोग्यदायी फायदे
जेवणानंतर कधीही करु नका आंंघोळ जाणून घ्या कारण
तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची