दह्यात मीठ घालून खाणं योग्य की अयोग्य

दह्यात मीठ घालून खाणं योग्य की अयोग्य

जेवण जेवताना दही खायला अनेकजणांना आवडतं. मग ती कोशिंबीर असो कढी असो वा ताक असो. दह्याचं सेवन आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. दही खाल्ल्याने पचनाची क्रिया वेगाने होते आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमीन्स आढळतात. याच कारणामुळे दही आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पण आपल्यापैकी अनेकांना दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ माहीत नसते. जसं काहींना सवय असते दह्यात मीठ, मसाले किंवा साखर घालून खाण्याची. पण असं दही खाणं कितपत योग्य आहे, चला जाणून घेऊया.

दह्यात मीठ घालून खाऊ नका

दही ही एक प्रकारे आयुर्वैदीक औषध आहे. ज्यामध्ये मीठ घालून खाऊ नये. दह्यात मीठ घातल्यास ते विषसमान होतं. कारण मीठामुळे दह्यातील बॅक्टेरिया मरून जातात आणि मग ते खाणं फायदेशीर ठरत नाही. दही हे नेहमी गोड वस्तू जसं साखर, गूळ किंवा खडीसाखरेसोबत खावं.

खडीसाखरेसोबत दही खाण्याचे फायदे

जर दह्यात खडीसाखर मिक्स करून खाल्ली तर त्याचा भरपूर फायदा होतो. आयुर्वेदात याबद्दल सांगण्यात आलं आहे की, दही-खडीसाखर खाल्ल्याने शरीराची रोग-प्रतिकारक क्षमता वाढते. दही-खडीसाखर खाण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वापार आहे. यासाठी जन्‍माष्‍टमीमध्ये म्हणून भगवान कृष्णाला दही-खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. जुन्या काळी लोकं दह्यात गूळ घालून खात असत. कोणीही मीठ घालून खात नसे.

गोड घालून खाल्ल्यास दही जास्त फायदेशीर

दह्यात अनेक प्रकारचे चांगले बॅक्टेरिया असतात. जे मँग्नीफाईंग ग्लास किंवा लेन्सच्या मदतीने तुम्हाला दिसू शकतात. हे सर्व बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करून एंजाइम प्रोसेसवर ताबा ठेवतात. ज्यामुळे जेवण लवकर पचत आणि पोटाशी निगडीत अनेक समस्या दूर होतात. याच कारणामुळे दह्यात गोड पदार्थ जसं साखर, गूळ आणि खडीसाखर घातल्याने यातील बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि दही आधीपेक्षा जास्त फायदेशीर ठरतं.

दह्याबाबतच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

  • उष्णता किंवा मळमळत असल्यास दही खाणं हा चांगला घरगुती उपाय आहे. 
  • उन्हाळ्यात दही खाणं सर्वात फायदेशीर मानलं जातं कारण दही थंड असतं. त्यामुळे उष्णता कमी होते. जर तुम्हाला सर्दी खोकला आणि कफची तक्रार असेल तर रात्री चुकूनही दही खाऊ नका. आयुर्वेदानुसार रात्री दह्याचं सेवन करू नये. 
  • रोग-प्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी रोज एक चमचा दही खावं. दह्यातील चांगल्या बॅक्टेरियामुळे आपलं इम्यून सिस्टम अजून चांगलं होतं. 
  • दही दातांसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. हे ऑस्टियोपोरोसिसमध्ये खाणं उत्तम मानलं जातं. दहीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांसाठी आणि दातांना मजबूत देतं. 
  • दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळतं. हे एक असं तत्त्व आहे जे शरीर सूजू देत नाही आणि त्यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.