ADVERTISEMENT
home / Fitness
जाणून घ्या थंडीमध्ये का येते पाय आणि बोटांना सूज

जाणून घ्या थंडीमध्ये का येते पाय आणि बोटांना सूज

थंडीच्या दिवसात बरेचदा हातपाय गारव्यांमुळे आखडतात, ज्यामुळे हात आणि पायाला सूज येते. जर तुम्हीही थंडीत हातापायाला येणारी सूज आणि खाज यामुळे हैराण असाल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामागील कारणं आणि यावरील उपाय. जे कळल्यावर तुमचाही हिवाळा ऋतू होईल आनंदी.

थंडीत सूज येण्यामागची कारणं

Shutterstock

हिवाळ्यात अनेकदा हात आणि पाय सुजण्यामागे हे मुख्यतः अति थंड वातावरणात राहिल्यामुळे रक्त गोठणं हे असतं. कारण हिवाळ्यात रक्तप्रवाह हळू होतो. अशावेळी हात आणि पाय बराच काळ थंड पडल्यास ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. ज्यामुळे हातापायांना सूज येते आणि ते लाल दिसू लागतात. पण उबदारपणा मिळाल्यास पुन्हा ब्लड सर्क्युलेशन हळूहळू नॉर्मल झाल्यावर मग वेदन आणि खाज येते.

ADVERTISEMENT

पायाचं दुखणं आणि त्यावरील घरगुती उपाय

हिवाळ्यात हातापायांंना सूज आल्यास करा हे उपचार

Shutterstock

  • बटाट्याचा रस – एक बटाटा घ्या आणि मीठ लावून ज्या ठिकाणी सूज आली आहे तिकडे लावा. असं म्हटलं जातं की, बटाट्यात जळजळविरोधी तत्त्वं असतात. ज्यामुळे खाज आणि सूजही कमी होते. 
  • मोहरीचं तेल –  रात्री झोपताना पहिल्यांदा गरम मोहरीच्या तेलात सैंधव मीठ मिक्स करून ते हलक्या हातांनी सूज आलेल्या ठिकाणी हातापायांना आणि बोटांना लावा व मोजे घालून झोपा. असं आठवड्यातून 5-6 दिवस केल्यास लगेच आराम मिळतो. 
  • लिंबाचा रस – लिंबाचा रस आपल्या हात आणि पायाला लावल्यास सूज खूप प्रमाणात कमी होते. त्यामुळे एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि रात्री झोपण्याआधी बोटांना लावा. मग कव्हर करून झोपून जा. यामुळे काही दिवसांतच सूज कमी होईल. 
  • हळदीने दूर करा सूज – हळदीत अँटीबॉयोटिक आणि अँटीसेप्टिक तत्व भरपूर प्रमाणात असतात. तसंच हळदीमध्ये उष्णताही असते. त्यामुळे तुम्हाला हिवाळ्यात उबदार वाटतं. अशावेळी जर तुम्ही हळदीची पेस्ट बनवून हात आणि पायाला झोपतेवेळी लावल्यास वेदना आणि खाजेपासून सुटका होते. तुम्ही हा उपाय 3-4 दिवस केल्यास लगेच फरक जाणवेल. 
  • कांद्याचा रस –  हळदीप्रमाणेच कांद्यातही अँटीबॉयोटिक आणि अँटीसेप्टिक गुण आढळतात. ज्यामुळे हात आणि पायाच्या बोटांची सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कांद्याचा रस काढा आणि झोपताना सूज आलेल्या जागेवर पूर्ण रात्र लावून तसंच राहू द्या. 
  • मटारनेही कमी होईल सूज – हातपायांची सूज कमी करण्यासाठी या मौसमात बाजारात येणारे मटारही खूप फायदेशीर असतात. त्यामुळे हिरवे मटार चांगले उकळू घ्या आणि त्या पाण्याने हातापायाला शेक द्या. रात्री झोपताना मोजे घालून झोपा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्की करा 

हात नेहमी मऊ ठेवायचे असतील तर वापरा 10 टिप्स

ADVERTISEMENT

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

पायांच्या टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

28 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT