सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग 'हा' आजार घेईल तुमचा जीव

सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग 'हा' आजार घेईल तुमचा जीव

हिवाळा असो वा उन्हाळा, शरीरातून घाम येणं अत्यंत आवश्यक आहे. घाम आल्यानं शरीरातील केवळ विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत तर तापमानदेखील नियंत्रणात राहतं. पण तुम्हाला घामच येत नसेल किंवा घामाचं प्रमाण अत्यंत कमी असेल तर मग ही बाब तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. घाम न येण्यामागे नेमके काय कारण असते, हे जाणून घेऊया. 

अॅन्हिड्रोसिस आणि हायपोहीड्रोसिस म्हणजे काय?

अॅन्हिड्रोसिसच्या (Anhidrosis) परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला अजिबातच घाम येत नाही, तर हायपोहीड्रोसिसमध्ये इतरांच्या तुलनेत घाम येण्याचं प्रमाण कमी असतं. ज्या लोकांना कष्टाचं काम आणि व्यायाम केल्यानंतरही घाम येत नाही, त्यांना हीट स्ट्रोकचा सामना करावा लागण्याची भीती अधिक प्रमाणात असते. अधिक तापमानामुळे हे गंभीर स्वरुप धारण करू शकते. हीट स्ट्रोक आल्यास मेंदूसह शरीराच्या अन्य अवयवांचंही नुकसान होऊ शकतं. 

(वाचा : पार्टनरचा हात पकडून चालण्याचे 'हे' हेल्दी फायदे आहेत माहिती)

अॅन्हिड्रोसिस घेईल तुमचा जीव

International Hyperhidrosis Societyनुसार, घाम न येणे जीवघेणे ठरू शकतं. अॅन्हिड्रोसिस पीडित लोकांनी जर उच्च तापमानात कठीण व्यायाम प्रकार किंवा अधिक मेहनत असलेलं शारीरिक कार्य केलं तर त्याच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतं. घाम न येण्याच्या कारणामुळे त्यांनी हीट स्ट्रोक व्यतिरिक्त बेशुद्ध होणे आणि चक्कर देखील येऊ शकते. काही कारणांमुळे हीटसंबंधी समस्यांवर वेळीच औषधोपचार होत नाहीत, परिणामी रूग्ण कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. 

(वाचा : गर्लफ्रेंडच्या 'या' इच्छा तुम्ही करता का पूर्ण, असं करा तिला खूश)

ShutterStock

अॅन्हिड्रोसिस होण्यामागील कारण

औषधे : काही औषधांमुळे घाम ग्रंथींच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. विशेषतः मानसिक आजारांसाठी जी औषधं घेतली जातात त्यामुळे घाम ग्रंथींवर अधिक परिणाम होतो.

अनुवांशिक: काही लोकांमध्ये जन्मतः घाम ग्रंथीच नसतात. पण ही परिस्थिती फारच कमी प्रमाणात पाहायला मिळते.

रक्तवाहिन्यांमधील दुखापत : ब्लड प्रेशर नियंत्रित करणे, विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकणे, यांसारखी महत्त्वाची काम करणाऱ्या वाहिन्यांना दुखापत झाल्यास शरीरात अॅन्हिड्रोसिस परिस्थिती म्हणजे घाम न येण्याची परिस्थिती निर्माण होते.

(वाचा : जेवणानंतर लगेचच पाणी पिता का, मग तुमचं आरोग्य आहे धोक्यात)

त्वचेसंबंधी समस्या : त्वचेच्या समस्या या अॅन्हिड्रोसिसमागील मुख्य कारण असल्याचं मानलं जातं. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात, ज्यामुळे घाम येण्याची प्रक्रियादेखील बंद होते.

पाण्याची कमतरता : शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि त्वचेवर एखाद्या प्रकारची इजा झाल्यासही घाम न येण्याची परिस्थिती निर्माण होते.

अॅन्हिड्रोसिसवरील उपाय
International Hyperhidrosis Societyच्या अनुसार, या आजारावरील उपाय हे त्या-त्या कारणावर अवलंबून असतात. पण यावरील उपाय सोपा नाही. त्यामुळे जर तुम्हाला जीवघेण्या उकाडा आणि हिवाळ्यातही घाम येत नसेल किंवा व्यायाम केल्यानंतर घाम येत नसेल तर तुम्हीआरोग्याच्या दृष्टीनं तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.