शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा

शिकारी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली नेहा खान सध्या तिच्या दिलखेचक अदांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या बोल्ड आणि हॉट अदा प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहेत. नेहा खान आता टेलिव्हिजन माध्यमातील 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा या शोसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. विविध प्रकारचे डान्स फॉर्म्स ती सध्या यासाठी शिकत आहे. शिवाय यासाठी दिवसभरात कमीत कमी 10 ते 12 तास ती नृत्याचा सराव करत आहे.  नेहा सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह आहे. शिवाय तिचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर सतत फॉलो करत असतात. सहाजिकच नेहाच्या नृत्य अदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  नेहाने या तिच्या नृत्यकलेविषयी POPxo मराठीच्या चाहत्यांसोबत संवाद साधला...

 

1. या शोच्या पहिल्या डान्स परफॉर्मन्ससाठी तू कुठला नृत्यप्रकार आणि गाणं निवडणार आहेस ?

मी माझ्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी खूपच उत्सुक आहे. मी 'भोर भये पनघट पे' या माझ्याच गाण्यावर  नृत्य सादर करणार आहे. बॉलीवूड स्टाईलने हे सादरीकरण मी करेन.माझं हे नृत्य प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं मला वाटत आहे. 

किती कालावधीनंतर तू पुन्हा एकदा नृत्य सादरीकरण करणार आहेस? पुन्हा नृत्याच्या मंचावर येण्याची आतुरता किंवा काही विशिष्ट भावना मनात आहे का?

या शोसाठी मी जवळपास एक वर्षानंतर डान्स सादर करणार आहे. त्यामुळे आतुरता, भीती, धाकधूक अशा संमिश्र भावना माझ्या मनात आहेत. शिवाय मला नृत्य करणं फारच आवडतं. त्यामुळे या डान्समधून मी माझं टॅलेंट प्रेक्षकांसमोर दाखवता येणार आहे.

सोनाली आणि मयूर या दोघांपैकी, तुझा अधिक लाडका परीक्षक नक्की कोण आहे ?

काही जणांना गोड खायला आवडतं, तर काहीजण तिखट खाणं पसंत करतात. मी मात्र, गोड आणि तिखट या दोन्ही  प्रकारच्या खाण्याची चाहती आहे, असं मी म्हणेन. अर्थात, सरळ सांगायचं झालं तर, दोघेही परीक्षक माझ्यासाठी तेवढेच लाडके आहेत. या दोन्ही परिक्षकांमुळे शोला नक्कीच रंगत येणार आहे.

एवढ्या मोठ्या मंचावर तुला परफॉर्मन्स द्यायचा आहे. याची तुझ्या मनात काही धाकधूक आहे का?

मला काही प्रमाणात स्टेज फिअर आहे, हे मी मान्य करते. पण, कोरिओग्राफी इतक्या उत्तमरित्या होते आहे, की माझी ही धाकधूक कमी होईल याचा विश्वास वाटतोय. मी माझ्या कोरिओग्राफरचा विश्वास मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

तुझ्या डान्स रिहर्सल दरम्यान होणाऱ्या गमतीजमती आणि तुझ्या कोरिओग्राफरबद्दल आम्हाला थोडंसं सांगशील का ?

ओंकार सर आम्हाला नेहमीच खूप प्रोत्साहन देत असतात. आम्हाला  कंटाळा येऊ नये, सरावातखंड खंड पडू नये याची पुरेपूर काळजी ते घेतात. एखाद्या मुलाची आईवडिलांनी काळजी घ्यावी, तेवढ्या आपुलकीने ते आमच्याशी वागतात. आम्ही कुठेही कमी पडत असलो, एखादी स्टेप शिकण्यात अधिक अडचण येत असली, तर स्वतः  जातीने लक्ष घालून आम्हाला मदत करतात. आम्ही रिहर्सलदरम्यान खूप मजा करत असतो. कधी कधी मी आरशासमोर उभी राहून तयारी करत असताना कुणीतरी माझा विडिओ सुद्धा काढतं. मग माझं मलाच ती तयारी पाहताना हसू येतं. पण, या अशा घटना घडत असल्याने, रिहर्सलच्या  दरम्यान खूप सतर्क राहावं लागतं. या शोला आताच सुरूवात झाली आहे. पुढे पुढे या सर्व गोष्टींंमुळे शोमधून प्रेश्रकांचं निखळ मनोरंजन नक्कीच होणार आहे. 

View this post on Instagram

New show 💃 bakisabgangabarose 🤣#yuvadancingqueen

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial) on

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिका वाचा - 

लतादीदींना 28 दिवसांनंतर मिळाला डिस्चार्ज, हॉस्पिटलमधील PHOTO VIRAL

अभिनेत्री पायल रोहतगी अटकेत...नेहरु परिवारावर टीका केल्यामुळे अडचणीत

लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका