ADVERTISEMENT
home / आरोग्य
Anemia Symptoms In Marathi

अशक्तपणाजाणून घ्या अॅनिमियाची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार (Anemia Symptoms In Marathi)

अॅनिमियाविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? (What Is Anemia In Marathi)

अॅनिमिया म्हणजे शरीरातील रक्त कमी होणं अथवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणं. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहण्यासाठी शरीराला लोहाची गरज असते. रक्तातील लाल रक्तकणांमध्ये हिमोग्लोबिन असते. ज्यामुळे शरीराला रक्तावाटे ऑक्सिजनचा पूरवठा केला जातो. रक्तावाटे शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा झाल्यामुळे सर्व शारीरिक क्रिया व्यसस्थित पार पाडल्या जातात. यासाठीच शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे. मात्र काही कारणांमुळे जर रक्तातील हे लोह अथवा हिमोग्लोबिन कमी झाले तर त्या व्यक्तीला अॅनिमिया अथवा अशक्तपणा होण्याची शक्यता असते. 

अॅनिमियाची लक्षणे (Symptoms Of Anemia In Marathi)

अॅनिमिया झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे तुम्हाला विविध शारीरिक समस्या जाणवतात.

Symptoms Of Anemia In Marathi

Symptoms Of Anemia In Marathi

चक्कर येणे

शरीरातील रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जे अन्न खाता त्याचे रूपांतर रक्तात होते. शरीरात रक्त आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य प्रमाणात नसेल तर तुमच्या शरीराचे योग्य पोषण होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या शारीरिक हालचालींवर होतो. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊन चक्कर येते. चक्कर येणे घरगुती उपायही केले जातात.

ADVERTISEMENT

ह्रदयाची ठोके वाढणे

शरीराला रक्ताचा पूरवठा कमी होतो. ह्रदयाला रक्तपूरवठा कमी झाल्यामुळे शारीरिक क्रियांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्यामुळे ह्रदयाचे ठोके कमी होतात.

डोकेदुखी

मेंदूला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यास तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. यासाठी जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच ब्लड टेस्ट करा. 

हाडे, छाती, पोट आणि सांधेदुखी जाणवणे

शरीरातील रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर जाणवू लागतो. ज्यामुळे तुमच्या छातीत, पोटात वेदना होतात. त्याचप्रमाणे सांधे आणि हाडे दुखू लागतात.

लहान मुलांची वाढ खुंटते

पुरेसे पोषण न झाल्यास आणि शरीरात रक्तक्षय झाल्यास लहान मुलांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. मुलांच्या पुरेशा वाढ आणि शारीरिक विकासाठी योग्य प्रमाणात हिमोग्लोबिनची गरज असते.

ADVERTISEMENT

छाप लागते

ह्रदयाला रक्तपूरवठा न झाल्यास ह्रदयाचे ठोके वाढतात आणि सतत धाप लागण्याचा त्रास जाणवू लागतो.

त्वचा पांढरट आणि पिवळसर दिसू लागते

शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्तकणांच्या लाल रंगामुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होत असतो. मात्र शरीरातील रक्त आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा पांढरट दिसू लागते.

हात पाय थंड पडणे

जर तुमच्या शरीरातील रक्ताचे कार्य बिघडले तर त्याचा परिणाम तुमच्या इतर शारीरिक क्रियांवर होतो. शरीराला रक्ताचा पूरवठा कमी झाल्यामुळे हात पाय थंड पडतात.

थकवा आणि अशक्तपणा

रक्तात तुम्ही  खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक असतात. जेव्हा तुमच्या शरीरातील रक्त कमी होते तेव्हा ते पोषक घटक न मिळाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा  येतो.

ADVERTISEMENT

दृष्टीदोष

डोळ्यांना योग्य प्रमाणात रक्त न मिळाल्यास तुमच्या दृष्टीवर याचा परिणाम होतो. अॅनिमिया झाल्यास अशक्तपणामुळे तुम्हाला विविध प्रकारचे दृष्टीदोष जाणवू शकतात.

नखं तुटणे

रक्तातील कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यास तुमच्या नखांवर याचा विचित्र परिणाम होतो. ज्यामुळे तुमची नखं तुटतात आणि निर्जिव दिसू लागतात.

अॅनिमिया होण्यामागची कारणे (Causes Of Anemia In Marathi)

शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी शरीराला पुरेशा रक्ताची गरज असते. रक्तातील रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा होतो. शरीराला ऑक्सिजनचा पूरवठा कमी झाल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. यासाठीच त्यामागची कारणे जरूर जाणून घ्या. 

Causes Of Anemia In Marathi

Causes Of Anemia In Marathi

ADVERTISEMENT

रक्तक्षय

बऱ्याचदा अॅनिमिया होण्यामागचं हे एक प्रमुख कारण असू शकतं. रक्तक्षय अथवा रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरात लोहाची कमतरता होते ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवतो. रक्तक्षय झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. बऱ्याचदा एखादा गंभीर अपघात, सर्जरी, बाळंतपण, अपघातामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. 

अती प्रमाणात लोहाचे प्रमाण घेणे

कधी कधी लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेकलोक आयर्न सप्लीमेंट घेतात. जास्त प्रमाणात शरीरात लोहाचे प्रमाण झाल्यास शरीराला रक्तात लोहाचे प्रमाण शोषून घेणे कठीण जाते. ज्यामुळे शरीर लोह शोषून घेण्यास असमर्थ ठरतं. ज्यामुळे शरीराला लोहाची कमतरता जाणवते आणि अशक्तपणा होतो.

मासिक पाळीत अती रक्तस्त्राव

मासिक पाळीच्या समस्यांना प्रत्येकीला सामोरं जावंच लागतं. कधी कधी काही शारीरिक बदलांमुळे मासिक पाळीत अती रक्तस्त्राव होतो. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा होऊ शकतो. 

बाळंतपण

गरोदरपणात स्त्रीयांच्या शरीराचे वजन आणि गर्भजलात वाढ होते. बाळंतपणादरम्यान रक्तस्त्राव सुरु होतो. जर हा रक्तस्त्राव अती प्रमाणात झाला तर त्या स्त्रीला अशक्तपणा अथवा अॅनिमिया होण्याची शक्यता दाट असते.

ADVERTISEMENT

लोहाची कमतरता

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनियमा हा  तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतो. वास्तविक तुमच्या शरीराला हाडांची पुरेशी वाढ करण्यासाठी आणि शारीरिक कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लोहाची गरज असते. मात्र जर तुमच्या आहारातून तुम्हाला पुरेसे लोह न मिळाल्यास तुम्हाला अॅनिमिया होऊ शकतो. कधी कधी काही औषधे, अन्न, कॅफेनयुक्त, वारंवार रक्तदान केल्यामुळे यामुळेदेखील तुम्हाला लोहाची कमतरता जाणवू शकते. 

अंर्तगत रक्तस्त्राव

कधी कधी एखादा अपघात अथवा दुखापत झाल्यास शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणामुळे अॅनिमिया होण्याची  शक्यता असते.

अॅनिमियावर करा हे उपचार (Treatment Of Anemia In Marathi)

जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास  असेल तर वैद्यकीय उपचार करून तुम्ही अॅनिमियावर मात  करू शकता. तुम्हाला अॅनिमिया होण्यामागचं काय कारण आहे यावरून तुमच्यावर काय उपचार करावेत हे ठरतं. 

Treatment Of Anemia In Marathi

Treatment Of Anemia In Marathi

ADVERTISEMENT

आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया

या प्रकारच्या अॅनिमियामध्ये डॉक्टर तुम्हाला आयर्न सप्लीमेंटची मात्रा वाढवून उपचार करतात. बऱ्याचदा रक्तक्षय, मासिक पाळीतील अती रक्तस्त्राव, सर्जरीमुळे लोहाची कमतरता झाल्यास हे उपचार केले जातात. 

व्हिटॅमिन डेफिशियन्सी अॅनिमिया

यासाठी डॉक्टर तुम्हाला फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधोपचार करतात. जर तुमचा आहार पुरेसा नसेल तर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची औषधे दिली जातात. 

गंभीर आजारापणामुळे होणारा अॅनिमिया

या अॅनिमियासाठी विशेष उपचारांची गरज असते. तज्ञ्ज डॉक्टरांच्या  देखरेखी खाली रूग्णावर उपचार केले जातात. कधी कधी या प्रकारच्या आजारपणात रक्तक्षय झाल्यास रुग्णाला रक्त चढवणे, हॉर्मोनल इंजेक्शन्स असे विविध उपचार करावे लागतात. 

अॅनिमियासाठी घरगुती उपचार (Home Remedies Of Anemia In Marathi)

काही घरगुती उपचार करून तुम्ही अशक्तपणा अथवा अॅनिमियावर मात करू शकता.

ADVERTISEMENT
Home Remedies Of Anemia In Marathi

Home Remedies Of Anemia In Marathi

आहारात व्हिटॅमिन सीचा वापर करा

अॅनिमियामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशक्तपणा झाल्यास तुम्हाला इनफेक्शन अथवा दाह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठीच जर तुम्ही या काळात आहारात व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवण्याची गरज असते. ज्यामुळे तुम्ही आहारातून घेत असलेले लोह शरीराला शोषून घेणे शक्य होते. अॅनिमियावर मात करण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करा. 

दही आणि हळदीचा असा करा वापर

दही आणि हळद घेणं हा एक उत्तम आयुर्वेदिक उपचार आहे.  जर तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर तज्ञ्जांच्या मते तुम्ही दिवसातून दोनदा एक कप दह्यातून पाव चमचा हळद घ्यायला हवी. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. 

आहारात हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा

आहारात पालक, सेलरी, ब्रोकोली आणि इतर हिरव्या आणि त्याच्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवल्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. मात्र या भाज्या स्वच्छ धुवून आणि उकडवून मगच खा. कारण कच्चा पालेभाज्या तुमच्या शरीराच्या पचनशक्तीवर परिणाम करू शकतात. 

ADVERTISEMENT

भरपूर पाणी आणि फळांचे रस प्या

शरीराला पुरेशा पाण्याची आवश्यक्ता असते हे तर तुम्हाला माहीत आहेच. कारण पाण्यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. आहारात विविध प्रकारच्या  भाज्या आणि फळांचे रस घेणेदेखील तितकंच  गरजेचं आहे. बीट, गाजर, डाळींब अशा भाज्या आणि फळांच्या रसामुळे तुमच्या शरीराची  झीज भरून निघते. 

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या

पाणी हे शरीरासाठी जीवन आहे. पण तुम्ही कोणत्या भांड्यातून पाणी पिता हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. तज्ञ्जांच्या मते तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीराला लोह मिळते. यासाठी रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी रिकाम्यापोटी ते प्या. 

आहारात तीळाचा वापर करा

आहारात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तीळ खाणं. विशेषतः अशक्तपणात तीळ खाण्याचे अनेक चांगले फायदे होतात. यासाठी दोन ते तीन तास तीळ भिजत ठेवा आणि वाटून त्याची पेस्ट करा. दररोज मधासोबत हे मिश्रण घेतल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल. 

काळ्या मनुका आणि खजूर

या दोन्ही सुकामेव्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सीचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे दररोज एक खजूर आणि चार-पाच मनुका खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरेल. तुम्ही सकाळी उठल्यावर अथवा जेवणाच्या मधल्यावेळेत हा सुकामेवा खाऊ शकता. 

ADVERTISEMENT

शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.  ज्यामुळे जेव्हा तुम्ही आहारात शेवग्याच्या पानांचा वापर करता तुमचा अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी अथवा रस आहारातून घेऊ शकता. मात्र जर तुम्ही गर्भवती असाल तर ही भाजी खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या.

अंजीर

अंजीर हे लोह मिळवण्याचा एक प्रमुख स्त्रोत आहे. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियमही भरपूर असते. यासाठी दररोज ताजे अंजीर अथवा सुकवलेले अंजीर पाण्यात भिजवून खा. दिवसभरात एक ते दोन अंजीर दररोज खाण्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल.

केळी

तुम्हाला सर्वांना  माहीत असेल की केळं हे एक स्वस्त आणि मस्त फळ आहे. मात्र एवढंच नाही तर केळं खाण्यामुळे तुमचा अशक्तपणादेखील कमी होऊ शकतो.  एका केळ्यामध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी , फॉलव्हेट असे अनेक पोषक घटक मिळतात. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत उर्जा मिळते. यासाठीच दररोज एक पिकलेलं केळं खाण्याची सवय लावा. 

अॅनिमियाबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न (FAQ’s)

1. जीवनशैलीत बदल करून तुम्ही अॅनिमियावर मात करू शकता का ?

याबाबत तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुमचे डॉक्टरच करू शकतात. कारण तुम्हाला अॅनिमिया होण्यामागचं काय कारण आहे यावरून तुमच्यावर काय उपचार करायचे हे ठरतं.

2. अॅनिमिया झाल्यास उपचार कधी सुरू करावे ?

प्रत्येकाचा अॅनिमिया आणि त्यावरील उपचार हे निरनिराळे असू शकतात. सामान्यतः अॅनिमिया झाल्यावर त्याच महिन्यापासून उपचार केल्यास फायदा होऊ शकतो.

3. अॅनिमियावर केल्या जाणाऱ्या उपचारांचे काही दुष्परिणाम होतात का ?

तुम्ही यावर काय उपचार करत आहात यावर तुम्हाला होणारे दुष्परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे वैद्यकीय उपचार घेताना याबाबत तुमच्या डॉक्टरांसोबत अवश्य चर्चा करा.

12 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT