घेर आलेलं पोट कमी करायचं असेल तर 'हे' पदार्थ खाणं करा बंद

घेर आलेलं पोट कमी करायचं असेल तर 'हे' पदार्थ खाणं करा बंद

लठ्ठपणा आणि फुगलेलं पोट कमी करण्यासाठी आपण अनेक तऱ्हेच्या गोष्टी करत असतो. अगदी व्यायाम करण्यापासून ते वेगवेगळी डाएट करण्यापर्यंत सर्व गोष्टी आपल्या करून झालेल्या असतात. पण एकदा पोटाचा घेर वाढतो तो कमी व्हायचं नाव घेतच नाही. त्यासाठी प्रत्येक प्रयत्न करून झालेला असतो. पण काही लोकांना या गोष्टीची माहिती नसते की, तुम्ही ज्या काही रोज गोष्टी खाता त्यातील काही पदार्थ तुम्ही खाणं बंद केलंत तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. पोटाचा घेर जर वाढला असेल आणि कमी होत नसेल तर व्यायामासह तुम्ही हा पर्यायदेखील नक्की वापरून पाहा. असे कोणते पदार्थ आहेत जे बंद केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो हे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हीही पोटाचा घेर आणि वजन कमी करत असाल तर तुम्ही या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. 

1. सोयाबीन ऑईल

Shutterstock

सोयाबीन ऑईलचा बरेच जण जेवणात उपयोग करतात. पण सोयाबीन ऑईल हे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. खरं तर या तेलाला सॅच्युरेडेट फॅट्सचा एक उत्तम पर्याय मानण्यात येतं. पण 2016 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, वजन वाढवण्याच्या आणि पोटाचा घेर वाढवण्याच्या बाबतीत सोयाबीन ऑईल हे साखरेपेक्षाही पुढे आहे. सोयाबीनच्या तेलामध्ये ओमेगा - 6 चं प्रमाण अधिक असतं. खरं तर आपल्या शरीरासाठी ओमेगा - 6 चं योग्य प्रमाण हे चांगलं ठरतं. पण याचं प्रमाण अति झालं तर त्याचा परिणाम तुमचं वजन वाढण्यात होतं आणि सर्वात पहिले चरबी जमा होऊ लागते ती पोटामध्ये. त्यामुळे सहसा सोयाबीन ऑईलचं प्रमाण आपल्या खाण्यामध्ये कमी ठेवा. 

पोटाची चरबी वाढण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

2. अति साखर आणि क्रिमची कॉफी

Shutterstock

कॉफी खरं तर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. पण तेदेखील साखरेशिवाय कॉफी अथवा ब्लॅक कॉफी. दिवसभरात तुम्ही जर चार ते पाच कप अशी कॉफी पित असाल तर नक्कीच तुमचं वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. पण तुम्ही दिवसभरात चार ते पाच कप अतिसाखर आणि क्रिम घालून हीच कॉफी पित असाल तर तुमचं वजन वाढवण्यासाठी आणि पोटाचा घेर अधिक करण्यासाठी ही कॉफी मदत करते. बऱ्याच लोकांना कॉफीमध्ये क्रिम आणि साखर जास्त घालून प्यायची सवय असते. त्यामुळे तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही ही सवय वेळीच बदला आणि अशा तऱ्हेने कॉफी पिणं बंद करा. अन्यथा त्याच कॉफीमुळे तुमचं वजन आणि पोटही वाढेल. 

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

3. पांढरा (सफेद) ब्रेड

Shutterstock

तुमच्या पोटाचा घेर वाढला असेल आणि तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही पांढरा ब्रेड त्वरीत खाणं बंद करायला हवा. यामध्ये रिफाईन्ड मैदा आणि साखरेचं प्रमाण असतं. या ब्रेडच्या अधिक सेवनाने रक्तातील साखरेची पातळीही वाढते. तसंच वजनही अतिप्रमाणात वाढू लागतं. बऱ्याचदा काही जणांंना सफेद ब्रेड खाल्ल्याने त्रास होत नाही त्यांना हा ब्रेड पचायला जड जात नाही. पण तुम्ही जर व्यवस्थित डाएट करणार असाल तर तुम्ही नक्कीच हा ब्रेड बंद करायला हवा. तुम्हाला वेळेवर तुमच्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. यामधील मैदा आणि साखरेमुळे पोटात चरबी अतिरिक्त प्रमाणात निर्माण होऊन घेर वाढतो. त्याचा परिणाम तुमची जाडी वाढण्यावरही होतो. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

4. बिअर

Shutterstock

काही लोकांना असं वाटतं की, बिअर प्यायल्याने वजन वाढत नाही. पण असं अजिबात नाही. बिअर प्यायल्याने सर्वात जास्त परिणाम होतो तो पोटावर. तुमच्या पोटाचा घेर बिअर सतत पित असल्यास, वाढत जातो. त्यामुळे वेळीच तुम्ही बिअर पित असाल तर ती बंद करा. जर तुम्हाला तुमच्या पोटाच्या वाढत्या घेरापासून वाचायचं असेल तर तुम्ही हे पाऊल वेळेवर उचलणं गरजेचं आहे. 

5. डबाबंद पदार्थ, बिस्किटं

Shutterstock

पॅकबंद अर्थात डबाबंद पदार्थ, बिस्किट्स आणि कुकीज हेदेखील वजन वाढवण्यास आणि पोटातील चरबी जमा करण्यास मदत करतात. त्याशिवाय सोडा, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर गोड पदार्थ अर्थात मिठाई या सगळ्या पदार्थांपासून तुम्हाला दूर राहण्याची गरज आहे. या पदार्थांचं सेवन केवळ तुमच्या शरीराला नुकसान पोहचवत नाही तर तुमचं वजनदेखील खूपच लवकर वाढवतं. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.