गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा उपयोग आणि खुलवा सौंदर्य

गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा उपयोग आणि खुलवा सौंदर्य

गुलाबांचा उपयोग अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्याचे अनेक फायदे तुम्ही आतापर्यंत वाचले आणि ऐकले असतील. गुलाबांचा उपयोग जाणून घेतल्यानंतर तुम्ही गुलाबाचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग ही केला असेल. सर्वसाधारणपणे गुलाबपाण्याचा उपयोग आपण आपल्या चेहऱ्यासाठी करतो. पण आज आपण गुलाबाच्या पाकळ्याचा उपयोग कसा करता येईल ते जाणून घेणार आहोत. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग अगदी आरामात करता येईल. मग जाणून घेऊया आज गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे

गुलाबपाकळ्यांचा फेसपॅक

shutterstock

तुमच्याकडे खूप गुलाबाची फुलं असतील तर ती टाकून देऊ नका. त्याच्या पाकळ्या तुम्ही काढून घ्या.  गुलाबाचा कोणत्याही पाकळ्या तुम्हाला चालू शकतील. एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या घेऊन तुम्ही त्या चांगल्या कुटून घ्या. पाकळ्यांमध्ये आधीच पाणी घालू नका. याचे कारण असं की, पाकळ्यांमध्ये असलेले पाणी कुटल्यानंतर वर येते. जर तुम्हाला त्याचे आणखी फायदे हवे असतील तर तुम्ही त्यात ओट्स घालू शकता. ओट्समुळे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा ग्लो येईल. तर गुलाबपाकळ्यांमध्ये असलेला रस तुमची त्वचा हायड्रेड करण्यास मदत करेल.

नाजूक त्वचेसाठी winter skin routine

गुलाबपाकळ्यांची वाफ

जर तुम्ही चेहऱ्याला वाफ घेत असाल तर तुम्हाला गुलाबण्याची वाफ घेण्यास काहीच हरकत नाही. गरम पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून झाकण बंद करुन ठेवा. गुलाबाच्या पाकळ्यांमधील अर्क पाण्यात उतरणे फारच गरजेचे असते.  झाकण काढून तुम्ही साधारण तीन ते चार मिनिटं चेहऱ्याला वाफ घ्या. गुलाब पाकळ्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन C, A आणि E तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. शिवाय तुमचे पोअर्स कमी करुन तुमची त्वचा चांगली ठेवते. त्यामुळे तुम्ही गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.  तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.

वाचा - जाणून घ्या चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे नेमके काय आहेत

गुलाबपाकळ्यांचा लीप पॅक

shutterstock

जर तुमचे ओठ काळवंडले असतील  किंवा कोरडे पडले असतील तर अशावेळीसुद्धा तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग करु शकता. गुलाबाच्या पाकळ्या कुटून घ्या त्यामध्ये दाणेदार साखर घालून तयार लीप पॅक तुम्ही तुमच्या ओठाला लावा. ओठांना लावून काही वेळ ठेवा. छान स्क्रब करा. तुमच्या ओठांचा ओलावा आणि गुलाबीपणा टिकून ठेवायला मदत मिळेल. 

गुलाबपाकळ्यांचा बॉडी पॅक

तुम्ही चेहऱ्याच्या त्वचेची इतकी काळजी घेता की, तुम्हाला त्यासोबत तुमच्या शरीराच्या इतर भागाच्या त्वचेचीचीही काळजी घेणे गरजेचे असते हे विसरुन जायला होते. जर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग बॉडी पॅक म्हणून केला तर तुम्हाला त्याचा अगदी हमखास फायदा होऊ शकतो. गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या हलक्या कुटून घ्या. त्यात बारीक साखर किंवा मध घाला. तयार पॅक छान तुमच्या शरीराला चोळून घ्या. तुमच्या शरीरावरील मृत त्वचा अगदी अलुवारपणे काढून तुम्हाला तजेला देण्याचे काम गुलाबपाकळ्या करु शकते. 


आता तुमच्याकडेही खूप गुलाब आले असतील तर त्याच्या पाकळ्या अशाच वाया जाऊ देऊ नका. त्याचा जास्तीत जास्त वापर करुन तुमचे सौंदर्य खुलवा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

https://www.popxo.com/shop/zodiac-collection/