हिवाळ्यात मक्याचं पीठ वापरून केलेली पोळी आणि पदार्थ खाण्याचे फायदे

हिवाळ्यात मक्याचं पीठ वापरून केलेली पोळी आणि पदार्थ खाण्याचे फायदे

थंडी सुरू होताच आपल्या खाण्यापिण्यात अनेक बदल होतात. या ऋतूमध्ये गरमागरम पदार्थ खाण्याची मजा काही औरच. त्यातच या मौसमात खूप भूकही लागते. त्यामुळे नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. मग या थंडीत नक्की खाऊन पाहा मक्के दी रोटी आणि सरसों दा साग. मक्याची रोटी हिवाळ्यात आवर्जून खाल्ली जाते. कारण ही फक्त चवीलाच नाहीतर आरोग्यदायीही असते. थंडीमध्ये फक्त पोळी म्हणूनच नाहीतर अनेक भाज्यांमध्येही मक्याच्या पीठाचा तुम्ही वापर करू शकता. खरंतर थंडीत मक्याची पोळी आणि यापासून विविध पदार्थ बनवण्यामागे यापासून मिळणारं भरपूर पोषण आहे.

व्हिटॅमीन्स आणि मिनरल्सने भरपूर असलेला मका हा फक्त भारतातच नाहीतर विदेशातही भरपूर प्रमाणात वापरला जातो. मक्याचं कणीस आणि पॉपकॉर्न्सचा आस्वाद तर आपण घेतोच. पण मक्याच्या पीठाचाही आहारात समावेश करावा. यामुळे तुमचा आहार नक्कीच परिपूर्ण होईल.

  • पचायला सोपं 

मक्याचं पीठ हे त्यांच्यासाठी खासकरून फायदेशीर मानलं जातं, ज्यांना थंडीत पचनाचा त्रास होतो. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ते पचायला अगदी सोपं असतं. 

  • निरोगी हृदयासाठी मका 

मक्याची पोळी खाण्याने कॉलेस्ट्रॉल कमी होतं आणि यामुळे कार्डियोव्हॅस्क्युलरचा धोकाही कमी होतो. यामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिडही असतं जे हृदयाला निरोगी ठेवतं. याशिवाय तुम्हाला हायबीपीचा त्रास असल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रॉकचा धोकाही कमी होतो. नियमितपणे याचं सेवन केल्यास वाईट कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. 

  • ग्‍लूटेन-फ्री पीठ 

सध्या अनेक जणांना ग्लूटेन इनटॉलरन्सची समस्या असते. त्यामुळे अनेकजण गव्हाचं पीठ खाणं टाळतात. अशावेळी मक्याचं पीठ हा उत्तम पर्याय आहे. कारण मक्याचं पीठ हे ग्लूटेन-फ्री असतं. त्यामुळे हे तुम्ही निसंकोचपण वापरू शकता. 

  • एनिमिया होईल दूर 

हिमोग्लोबिन किंवा रेड ब्लड सेल्सच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो. अशा स्थितील एनिमिया म्हटलं जातं. एनिमिया, महिला आणि वाढत्या वयातील मुलांमधील कॉमन समस्या आहे. मग हे टाळायचं असल्यास तुम्ही तुमच्या आहारात मक्याचं पीठ सामील केलं पाहिजे. मक्याच्या पीठात बीटा-कॅरटीन नावाचं तत्त्वं आढळतं. हे तत्त्व रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत करतं. हे तत्त्वं शरीरातील रक्ताच्या निर्मितीत मदत करतं. त्यामुळे हे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास होत नाही. 

  • गर्भावस्थेतही फायदेशीर 

गर्भवती महिलांनी मक्याची पोळी आपल्या डाइट समाविष्ट करावी. यामध्ये फॉलेट आणि व्हिटॅमीन-बी आढळतं. जे गर्भातील शिशूच्या नव्या कोशिकांच्या विकासासाठी आवश्यक असतात. तसंच फॉलेट गर्भावस्थेत आई आणि शिशू दोघांसाठीही फायदेशीर असतं.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.