भुईमूगाच्या शेंगांचे अफलातून फायदे, वजन ठेवते नियंत्रणात

भुईमूगाच्या शेंगांचे अफलातून फायदे, वजन ठेवते नियंत्रणात

हिवाळ्यात भुईमूगाच्या शेंगा उकडवून त्यातील मऊ मीठ लावलेले शेंगदाणे खाण्यात खूपच मजा असते. अगदी लहानपणापासून आपण ही चव घेत आलो आहोत. ते खाण्याची मजा आणि चव तर नेहमीच आपल्याला भावते. पण याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटचा भाग जर भुईमूगाच्या शेंगांना बनवलंत तर तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास आणि वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. या तुम्हाला बाराही महिने बाजारात मिळतात. पण त्याचा उपयोग माहीत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते.  खरं तुम्ही नुसत्या कुकर अथवा भांड्यातून पाण्यात उकडवूदेखील या भुईमूगाच्या शेंगातील शेंगदाणे खाऊ शकता. हे शिजताना केवळ त्यात मीठ घालणं लक्षात ठेवा. हिवाळ्याच्या दिवसात खरं तर शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण व्हावी यासाठी भुईमूगाच्या शेंगा आवर्जून खाल्ल्या जातात. पण त्याचबरोबर तुमच्या शरीरास्वास्थ्यासाठीही याचा उपयोग होतो. यामध्ये प्रोटीन, ओमेगा - 3, ओमेगा - 6, फायबर आणि विटामिन ई सारखी अनेक पोषक तत्व आढळतात जी तुमच्या शरीराला अधिक निरोगी ठेवतात. याशिवाय भुईमूगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपण ते जाणून घेऊया - 

1. अधिक प्रमाणात प्रोटीन

Shutterstock

भुईमूगाच्या शेंगेमध्ये प्रोटीनचं प्रमाण हे अधिक असतं. साधारण 100 ग्रॅम भुईमूगामध्ये 26 ग्रॅम प्रोटीन मिळतं. आपल्या शारीरिक वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक असतं. तुम्ही जर कोणत्याही कारणाने दूध पित नसाल तर त्यासाठी भुईमूगाच्या शेंगा हा उत्तम पर्याय आहे. दुधाऐवजी तुम्ही या शेंगा खाल्ल्यात तर तुम्हाला त्याचप्रमाणात प्रोटीन मिळतं. 

वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी

2. हृदयरोगापासून ठेवतं दूर

Shutterstock

भुईमूग हे तुमच्या शरीराला पोषण देण्यासह हृदरोगासंबंधित होणाऱ्या आजारापासून तुम्हाला दूर ठेवायला मदत करतं. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट आढळतात. जे हार्टअटॅक थांबवण्यासाठी आवश्यक घटक आहेत. तसंच शरीरातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचं कामही भुईमूग करतात. त्यामुळे आपल्या आहारात नेहमी तुम्ही हे शेंगदाणे वापरायला हवेत. तयार शेंगदाणे  बाजारातून आणण्यापेक्षा भुईमूगाच्या शेंगा आणून त्यातील शेंगदाणे काढून खाण्याने तुम्हाला याचा जास्त फायदा होतो. हे अतिशय पौष्टिक असतात. 

3. साखर नियंत्रणात आणण्यास ठरतं फायदेशीर

Shutterstock

भुईमूगाच्या शेंगा त्या व्यक्तींसाठी जास्त चांगल्या आहेत ज्यांना मधुमेह आहे. मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात राहणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील रक्तामधील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच हे शेंगदाणे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीमध्येही सुधारणा होते. तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. तसंच तुम्ही याचं प्रमाणात नियमित सेवन केल्यास, तुम्हाला त्याचा साखरेवरील नियंत्रण आणण्यात होणारा फायदा नक्कीच दिसून येईल. 

शेंगदाणे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का

4. वजन कमी करण्यास मिळते मदत

Shutterstock

भुईमूगाच्या शेंगदाण्यात जास्त प्रमाणात फॅट असले तरीही तुमचं वजन कमी करण्यासाठी याची मदत होऊ शकते. भुईमूगाच्या शेंगदाण्यात असलेले प्रोटीन आणि फायबर यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते. हे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळतं. त्यासाठी भुईमूगाचे शेंगदाणे खाल्ले की लगेच पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला लवकर भूकही लागत नाही. हाच याचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. 

जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक

5. गरोदर महिलांनाही होतो फायदा

Shutterstock

गरोदर महिलांनाही भुईमूगाच्या शेंगदाण्याचा फायदा मिळतो. यामध्ये फोलेक नावाचं तत्व असून याचं प्रमाण जास्त असतं. जे शरीराच्या नसांमध्ये विभाजन करण्यास मदत करतं. तसंच फोलेट गर्भाच्या आतील बाळाच्या मेंदूसंबंधी समस्या होण्यापासून दूर ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही योग्य प्रमाणात भुईमूगाच्या शेंगा खाऊ शकता. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.