ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात चिंचेची पानं

ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात चिंचेची पानं

चिंचेचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं नाही का? अनेक वर्षांपासून भारतीय स्वयंपाकात आपण आंबट-गोड चवीसाठी चिंचेचा वापर करत आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का चिंच फक्त चवीसाठीच नाहीतर यात अनेक औषधीय गुणदेखील आहेत. याशिवाय चिंचेची पानंही अँटीसेप्टीक गुणांनी भरपूर असतात. या लेखात आम्ही तुम्हाला चिंचेच्या पानांच्या औषधी गुणांविषयी सांगणार आहोत. ज्यामध्ये इफेक्शन, सूज आणि जखमा यावर जलद परिणाम करण्यात चिंचेची पानं उपयोगी ठरतात. तसंच चिंचेच्या पानांचे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

  • जखम लवकर भरण्यासाठी चिंचेची पानं 

चिंचेच्या पानांचा रस काढून जखमेवर लावल्यास ती जखम वेगाने भरते. या पानांचा रस कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन वाढण्यापासून रोखतं. याशिवाय नवीन कोशिकांची निर्मितीही वेगाने होते. 

  • ब्रेस्‍ट मिल्‍क वाढवण्यासाठी 

असं म्हटलं जातं की, चिंचेच्या पानांचा रस काढून तो स्तनपान देणाऱ्या महिलेला प्यायला दिल्यास तिच्या दूधाची गुणवत्ता सुधारते. 

  • जननेंद्रियांचं इंफेक्शन 

चिंचेच्या पानांच्या रसाचं सेवन जननेंद्रियांना काही इंफेक्शन असल्यास तेही रोखतं आणि आधीपासून काही आजार असल्यास त्यावरही आराम देतं. चिंचेच्या पानात व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असतं. जे कोणत्याही सूक्ष्मजीव इंफेक्शनपासून तुमच्या शरीराला पूर्णतः दूर ठेवतं आणि शरीर निरोगी ठेवतं. 

  • डायबिटीजवर नियंत्रण 

चिंचेच्या पानांचं सेवन केल्याने शरीरामधील रक्त शर्करेचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. यामुळे डायबिटीजसारखे आजारही नियंत्रित राहण्यास मदत होते. 

  • स्कर्वी होईल दूर 

स्कर्वीचा त्रास हा व्हिटॅमीन सीच्या कमतरतेमुळे होतो. चिंचेच्या पानात उच्च एस्कॉर्बिक एसिड घटक असतात जे अँटी-स्कर्वी व्हिटॅमीनच्या रूपात कार्य करतात. 

  • सूज आणि सांधेदुखीपासून आराम 

चिंचेच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने शरीराची सूज आणि सांधेदुखीचं दुखणंही कमी होतं. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक सूजेवर याचा वापर करता येतो. चिंचेच्या पानांचा प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही पपई, मीठ आणि पाणी त्यात मिसळता येतं. पण, हे नक्की करा की, तुम्ही मीठाचा वापर यात कमीत कमी कराल. चिंचेच्या पानांचा रस शरीरात निर्माण होणाऱ्या एलर्जीला रोखण्यात मदत करतो. 

आपल्यांपैकी बऱ्याच जणींना मासिक पाळीच्या दिवसात वेदना होतात. यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांच्या रसाचं सेवन करू शकता किंवा ज्या ठिकाणी वेदना होत आहेत ते हा रस लावूही शकता. 

 

अनेक आजार आहेत ज्यावर चिंचेच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता. जसं मलेरिया, अल्सर, हायपर टेन्शन आणि हाय बीपी. मात्र कोणत्याही रोग झालेल्या रूग्णांवर याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.