ADVERTISEMENT
home / Combination Skin
त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन (Body Lotion For Healthy Skin)

त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन (Body Lotion For Healthy Skin)

सुंदर त्वचा प्रत्येकालाच हवी आहे, पण देखभाल करण्यासाठी वेळ कोणाकडेच नाही. बदलत्या ऋतुनुसार किंवा त्वचेची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यानं अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. त्वचेचे गंभीर आजार, त्वचा फाटणे, शुष्क होणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा काळवंडणे, त्वचा पातळ होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. करिअर, शिक्षण, संसार अशा बऱ्याच कारणांमुळे स्वतःची काळजी घेणे म्हणजे एखाद्या टास्कप्रमाणेच असते. पण वेळात वेळ काढून आपली त्वचा मॉइश्चराइझ करणं गरजेचं आहे. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ कौशल्यच असून चालत नाही. तर तुमचं व्यक्तिमत्त्व, दिसणंदेखील महत्त्वाचं ठरत आहे.  

बॉडी लोशन त्वचेचं संरक्षण कसं करतं? (How Body Lotion Works)

मनुष्यप्राण्याच्या शरीरात त्वचेचे तीन थर आहेत. एपिडर्मिस (epidermis), डर्मिस (dermis) आणि हायपोडर्मिस (hypodermis) असे या थरांचे अनुक्रमे नावे आहेत. त्वचेच्या या तिन्ही थरांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याचं काम बॉडी लोशन करते. त्वचेतील पाण्यातील अंश भरून काढण्याचे किंवा त्यामध्ये समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण कामदेखील बॉडी लोशन करते. एवढंच नाही तर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून, प्रदूषणापासून संरक्षण करून आपली त्वचा नितळ आणि निरोगी ठेवण्यासही मदत  होते. जाणून घेऊया 15 बेस्ट बॉडी लोशनची माहिती

ADVERTISEMENT

कोरडी त्वचा होईल सोफ्ट (Body Lotions For Dry Skin)

हिवाळ्यात त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीमध्ये त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी होऊ लागते. पण ज्यांची त्वचा निसर्गतःच कोरडी आहे, अशा व्यक्तींना त्वचेसाठी योग्य उपाय करावेत.

1. Vaseline Intensive Care Deep Restore Body Lotion

Vaseline Intensive Care Deep Restore Body Lotion कोरड्या त्वचेची समस्या कमी करण्यास आणि त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. या लोशनमध्ये व्हेसलिन जेलीचे मायक्रोड्रॉप्लेट्स आणि ग्लिसरिनचं मिश्रण आहे, जे कोरड्या-खाज सुटणाऱ्या त्वचेला टवटवीत ठेवण्याचं काम करते. ग्लिसरिन कोरड्या त्वचेला ओलावा देण्याचं काम करते तर व्हेसलिन जेलीचे मायक्रोड्रॉप्लेट्स त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतात.
फायदे 
निमयित वापरासाठी योग्य
त्वचा खोलवर हायड्रेट ठेवते
दीर्घकाळ त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो
कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका
पॅकेजिंग उत्तम
त्वचा लोशन पटकन शोषून घेते
सौम्य सुगंध
तोटे
पॅरोबनयुक्त

वाचा : हेल्दी आणि हॉट दिसायचंय? त्वचा, केस,आरोग्यासाठी पेपरमिंट ऑईल आहे बहुगुणकारी

2. Nivea Nourishing Lotion Body Milk

Nivea Nourishing Body Milk कोरड्या त्वचेची समस्या कमी करून 48 तास तुमची त्वचा मॉइश्चराइझ ठेवते. या लोशनमधील पोषकतत्त्वांमुळे कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो, यामुळे त्वचा मऊ आणि नितळ राहण्यास मदत होते. मॉईश्चर सीरम आणि बदाम तेलाचे घटक कोरडी त्वचा दुरुस्त करतात.
फायदे
नियमित वापरासाठी योग्य
दीर्घकाळ त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
सौम्य सुगंध
त्वचा लोशन पटकन शोषून घेते
लोशन तेलकट-चिकट नाही
त्वचेला भरपूर ओलावा मिळतो
तोटे
पॅरोबनयुक्त

ADVERTISEMENT

वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी

3. Himalaya Herbals Cocoa Butter Intensive Body Lotion

Himalaya Herbals Cocoa Butter Intensive Body Lotion अतिशय कोरड्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यास आणि त्वचा खोलवर मॉइश्चराइझ करण्याचा दावा करते. यामध्ये ओलिव्ह ऑईल, ग्रेप सीड ऑईल, व्हीट जर्म ऑईल आणि कोकोआ बटरचा समावेश आहे. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि नितळ होते.
फायदे
संवेदनशील त्वचेसाठी योग्य
नियमित वापरासाठी योग्य
त्वचेला प्रचंड प्रमाणात ओलावा मिळतो
त्वचा लोशन पटकन शोषून घेते
पशु चाचणीविरूद्ध
सौम्य सुगंध
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
तोटे
पॅराबेनयुक्त

वाचा : चेहर्‍यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे Benefits Of Rice Flour For Face In Marathi

4. Aveeno Daily Moisturizing Lotion

Aveeno Daily Moisturizing Lotion चा वापर केल्यास कोरड्या त्वचेचे आरोग्य एका दिवसात सुधारते आणि दोन आठवड्यांत त्वचेमध्ये लक्षणीय सुधारणा आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रमाण वैद्यकीयदृष्ट्या मांडण्यात आले आहे. या लोशनमध्ये नैसर्गिक, कोलोइडल ओटचे जाडे भरडे पीठ आणि अन्य पोषक घटक आहेत. हे घटक तुमच्या त्वचेचं 24 तास संरक्षण करतात. ही पोषक घटक तुमच्या त्वचेतील ओलावा टिकवण्याचं कामदेखील करतात.
फायदे
नॉन-कॉमेडोजेनिक (त्वचेवरील बंद छिंद्रांना त्रास न देणारे प्रोडक्ट)
सौम्य सुगंध
पॅराबेनमुक्त
त्वचातज्ज्ञांनी चाचणी केलेलं प्रोडक्ट
त्वचा लोशन पटकन शोषून घेते
तोटे
महागडे प्रोडक्ट
मद्याचा समावेश

ADVERTISEMENT

5. Lotus Herbals Safe Sun UV-Protect Body Lotion

Lotus Herbals Safe Sun UV-Protect Body Lotion त्वचेचं टॅनिंग कमी करते. त्वचा काळवंडण्यास, सूर्याच्या हानिकारक UVA /UVB किरणांपासूनही संरक्षण होते. यामध्ये UV फिल्टरसह व्हिटॅमिन B3 आणि व्हिटॅमिन ईचा समावेश आहे. हे घटक मेलॅनिन नियंत्रणात ठेवते, त्वचा काळी होण्यापासून संरक्षण करते आणि त्वचा उजळवण्यास मदत करतात.
फायदे
नियमित वापरासाठी योग्य
त्वचेला प्रचंड प्रमाणात ओलावा मिळतो
त्वचेला एसपीएफ मिळते
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
तोटे
त्वचा लोशन शोषून घेत नाही
पॅराबेनयुक्त
उग्र सुगंध
त्वचेवर पांढरेशुभ्र डाग राहतो

तेलकट त्वचेचा चिकटपणा होईल कमी (Body Lotions For Oily Skin)

तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यासाठी बाजारात भरपूर बॉडी लोशनचे पर्याय आहेत. अतिरिक्त तेलामुळे मुरुमे येणे, त्वचा चिकट होणे, इत्यादी समस्या उद्भवू शकतात. या समस्या होऊ नयेत यासाठी योग्य बॉडी लोशनचा वापर करावा.

1. The Body Shop Shea Whip Body Lotion

The body shop shea whip body lotion त्वचेला तेलकट न करता खोलवर मॉइश्चराइझ करण्याचं काम करते. यामध्ये प्रचंड प्रमाणात शीया बटरचा समावेश आहे. हे लोशन मध्यम जाड क्रिमी स्वरुपात आहे. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि नितळ होते.
फायदे
चिकट-तेलकट स्वरुपात नाही
त्वचा लोशन लगेचच शोषून घेते
72 तासांपर्यंत त्वचा मॉइश्चराइझ ठेवते
कोरड्या त्वचेसाठी खूप प्रभावी
सोयीस्कर आकारात उपलब्ध
पशु चाचणीविरूद्ध
तोटे
छोट्या पॅकचे पॅकेजिंग थोडेसे टणक
उग्र सुगंध
महागडे प्रोडक्ट

ADVERTISEMENT

2. VLCC Natural Sciences Cocoa Butter Hydrating Body Lotion

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी VLCC Natural Sciences Cocoa Butter Hydrating Body Lotionचा वापर करावा. हे लोशन त्वचा उत्तम प्रकारे हायड्रेट ठेवण्याचं काम करते. कोकोआ बटर, व्हीट जर्म एक्स्ट्रॅक्ट, शीया बटर, कोरफड आणि फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमची त्वचा दिवसभर मॉइश्चराइझ राहते. या लोशनला सौम्य फुलांचा सुगंध आहे.
फायदे
त्वचा लोशन लगेचच शोषून घेते
त्वचेला खोलवर ओलावा मिळतो
एसपीएफ 15
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवते

कोणतेही तोटे नाहीत

 

 

ADVERTISEMENT

3. Lotus Herbal White Glow Skin Whitening And Brightening Hand & Body Lotion

लोटस हर्बलचं हे लोशन त्वचा नितळ होण्यास आणि उजळण्यास मदत करते. यामध्ये द्राक्ष फळ, ग्रीन टी आणि ज्येष्ठमधाच्या अर्काचा समावेश आहे. या घटकांमुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. त्वचेचा रंग सुधारतो, त्वचेवरील डाग कमी करते आणि आपली त्वचा हायड्रेट ठेवण्याचं काम करते.
फायदे
त्वचा लोशन लग
त्वचा मऊ होते
एसपीएफ 25
सौम्य सुगंध
उत्कृष्ट पॅकिंग
सहज उपलब्ध
तोटे
हिवाळ्यात वापरण्यासाठी अयोग्य 

4. Vaseline Aloe Fresh Hydrating Body Lotion

Vaseline Aloe Fresh Hydrating Body Lotion चिकट स्वरुपात नाही. यामध्ये काकडी आणि अ‍ॅलोव्हेराचे घटक आहेत. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते, त्वचेला खोलवर ओलावा मिळतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हे लोशन अतिशय योग्य आहे. सर्नबर्नपासून संरक्षण करते
फायदे
त्वचा लोशन लगेचच शोषून घेते
त्वचा मऊ राहते
100 टक्के कोरफडीचा अर्क

तोटे

ADVERTISEMENT

5. Himalaya Protecting Body Lotion

Himalaya Protecting Body Lotion व्हिटॅमिन A व E, फॅटी अ‍ॅसिड, बीटा कॅरेटिन, सूर्यफुलाच्या बियांचं तेल आणि बदामाचे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे घटक त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचं काम करतात. त्वचेवरील सुरकुत्या कमी करणे, खाज कमी करणे, त्वचा फाटण्याच्या समस्यांपासून सुटका मिळते.
फायदे
सौम्य सुगंध
त्वचा लोशन शोषून घेते
त्वचेचं संरक्षण करते
त्वचेला चांगल्या प्रकारे ओलावा मिळतो
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
तोटे
पॅराबेनयुक्त

निस्तेज त्वचेला मिळेला नैसर्गिक चमक (Body Lotions For Sensitive Skin)

प्रत्येकालाच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असते. अति कोरडी त्वचा असणाऱ्यांमध्ये निसर्गतः तैलग्रंथी कमी असतात. यामुळे त्वचा अधिक शुष्क आणि निस्तेज दिसू लागते.  पण अतिसंवेदनशील त्वचा असणाऱ्यांसमोर एखादं ब्युटी प्रोडक्ट वापरायचं म्हणजे कित्येक प्रश्न निर्माण होतात. अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उत्तम बॉडी लोशन त्वचेसाठी वापरावे.

1. Vaseline Intensive Care Cocoa Glow Body Lotion

Vaseline Intensive Care Cocoa Glow Body Lotion त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करते. त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. यामध्ये शुद्ध कोकोआ आणि शीया बटरचं मिश्रण तसंच व्हेसलिन जेलीचा समावेश आहे. अतिशय कोरडी, फाटलेली त्वचा उत्तम पद्धतीनं मॉइश्चराइझ होते. कोपर, गुडघ्यांचं देखील आरोग्य यामुळे सुधारते.
फायदे
नियमित वापरासाठी योग्य
त्वचा खोलवर हायड्रेट ठेवते
त्वचा लोशन लवकर शोषून घेते
लोशन चिकट स्वरुपात नाही
सौम्य सुगंध
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
तोटे
पॅराबेनयुक्त
एसपीएफ नाही

2. Himalaya Herbals Cocoa Butter Intensive Body Lotion

Himalaya Herbals Cocoa Butter Intensive Body Lotion संवेदनशील त्वचा सुधारण्याचा आणि त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करण्याचा दावा करते. यामध्ये व्हीट जर्म ऑईल आणि कोकोआ बटरचा समावेश आहे, ज्यामुळे त्वचा मऊ आणि नितळ होते. लोशनमुळे त्वचेला आर्द्रता देखील मिळते. यातील ऑलिव्ह ऑईल, ग्रेप सीड ऑईल (द्राक्षाची बी ) निस्तेज-मृत त्वचेची समस्या कमी करण्याचं काम करते.
फायदे
नियमित वापरासाठी योग्य
त्वचा खोलवर हायड्रेट ठेवते
त्वचा लोशन तातडीनं शोषून घेते
पशु चाचणीविरूद्ध
सौम्य सुगंध
खिशाला परवडणारे प्रोडक्ट
तोटे
पॅराबेनयुक्त

ADVERTISEMENT

3. Cetaphil Moisturising Lotion

Cetaphil Moisturising Lotion संवेदनशील त्वचेसाठी अतिशय योग्य लोशन आहे. अति कोरड्या त्वचेला दीर्घकाळ मॉइश्चराइझ ठेवण्याचं काम हे लोशन करते. त्वचा लगेचच हे लोशन शोषून घेते आणि यामुळे कोमल, मऊ त्वचा आपल्याला मिळते. लोशन चिकट स्वरुपात नसल्यानं तुम्हाला नक्कीच आवडेल. ग्लिसरिन आणि Macadamia Nut Oil तुमच्या त्वचेचं संरक्षणदेखील करते.
फायदे
सुगंध विरहित
कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होत नाही
नॉन-कॉमेडोजेनिक (त्वचेवरील बंद छिंद्रांना त्रास न देणारे प्रोडक्ट)
त्वचातज्ज्ञांनी चाचणी केलेलं प्रोडक्ट
तोटे
महागडे प्रोडक्ट
मद्याचा समावेश
एसपीएफ नाही

4. Neutrogena Norwegian Formula Body Moisturizer

हे लोशन कोरड्या, शुष्क त्वचेचं आरोग्य सुधारते. यामध्ये ग्लिसरिन प्रचंड प्रमाणात आहे. यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते
फायदे
वापरण्यास सोपे
चिकट स्वरुपात नाही
योग्य पद्धतीनं त्वचा मॉइश्चराइझ करते
कोरड्या त्वचेची समस्या कमी करते
सौम्य सुगंध
तोटे
तीव्र हिवाळ्यात लोशन कठीण होण्याची शक्यता

5. Fabindia Wild Rose Body Lotion

संवेदनशील त्वचेला खोलवर ओलावा देण्याचं काम हे लोशन करते. लोशनला गुलाबाचा नैसर्गिक असा सुगंध आहे. शीया बटर आणि व्हिटॅमिन ई युक्त असे हे लोशन आहे.

फायदे
गोडसर सुगंध
लोशनचा हलक्या स्वरुपातील पोत
तोटे
पॅराबेनयुक्त

ADVERTISEMENT

बॉडी लोशन खरेदी करताना लक्षात ठेवा या टिप्स (Tips When Buying A Body Lotion)

बॉडी लोशन खरेदी करताना केवळ पॅकिंग पाहून समाधान मानू नका. लोशनमध्ये कोणत्याही साहित्यांचा समावेश आहे, हे तपासून पाहण गरजेचं आहे. त्यातील साहित्य तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत की नाहीत? हे लेबलवरील माहिती वाचून पडताळून घ्यावी. अन्यथा  अॅलर्जी होण्याची शक्यता असते.

1. बॉडी लोशनमध्ये समावेश असलेले घटक तपासून पाहा (Check The Ingredients In The Bottle)

चेहरा, शरीराच्या अन्य भागासाठी आपण वापरत असलेल्या बॉडी लोशनमध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे, याची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. पॅकिंगवर याबाबतची माहिती दिलेली असते. त्यामुळे बॉडी लोशन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी त्यावरील लेबल वाचा. संबंधित प्रोडक्टमध्ये एखादा अॅलर्जी असलेला घटक असल्यास ज्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. तर ते प्रोडक्ट खरेदी करणे टाळा.

2. तुमच्या त्वचेचा प्रकारानुसारच प्रोडक्ट खरेदी करा (Buy Lotion According To Your Skin Type)

सर्वांची त्वचा एकसारखी नसते. त्यामुळे सर्वच ब्युटी प्रोडक्ट तुमच्या त्वचेसाठी योग्य असतात, असे नाही. बॉडी लोशन खरेदी करतानाही तुमची त्वचेनुसारच खरेदी करावे. त्यासाठी तुम्हालाही तुमची त्वचा कोणत्या प्रकारात मोडते, कोणते बॉडी लोशन लावल्यास फायदा होईल, हे पडताळून पाहा.

3. महत्त्वपूर्ण घटक SPF (Important Factor SPF)

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य SPF असते. भलेही खूप कमी वेळासाठी तुम्ही घराबाहेर असलात तरीही त्वचेवर बॉडी लोशन लावणं अत्यावश्यक आहे. कारण लोशनमधील SPF घटक तुमच्या त्वचेचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करते.

ADVERTISEMENT

4. पॅराबेन शरीरासाठी हानिकारक (Paraben Is Harmful To The Body)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅराबेन नसलेलं बॉडी लोशन खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं. कारण शरीरातील हार्मोनच्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम पॅराबेन करते. यामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो आणि शरीरात विषारी पदार्थदेखील वाढतात.

 

बॉडी लोशन वापरण्यासंदर्भातील प्रश्नोत्तरे (FAQs)

1. त्वचेवर बॉडी लोशन लावण्याची योग्य वेळ कोणती?

आंघोळ केल्यानंतर लगेचच त्वचेवर बॉडीवर लोशन लावल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. कारण तुमची त्वचा त्यावेळेस ओलसर असते. यामुळे त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. अस्वच्छ त्वचेवर बॉडी लोशन लावल्यास शरीराकडे जीव-जंतू मोठ्या प्रमाणात  आकर्षित  होतात. यामुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसानच मोठ्या प्रमाणात होते. 

2. त्वचेवर नियमित बॉडी लोशन का लावावे?

आपल्या शरीराच्या विशिष्ठ भागावर बॉडी लोशन नियमित लावणे गरजेचं असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या टाचा आणि पाय कोरडे असतील तर झोपण्यापूर्वी दररोज लोशन लावावे. केवळ हातापायांनाच नाही तर चेहऱ्यावरही लोशन लावणं आवश्यक आहे. योग्य काळजी न घेतल्यानं त्वचा काळी पडते, त्वचेचा पोत घसरतो. वेळीच या समस्यांकडे लक्ष न दिल्यास त्यापासून सुटका मिळवणं कठीण होतं.  कारण शरीरावरील एखाद्या डागापासून सहजासहजी मुक्तता मिळत नाही. त्यामुळे नियमित त्वचेवर बॉडी लोशन लावावे.

ADVERTISEMENT

3. झोपण्यापूर्वी त्वचेला बॉडी लोशन लावणं परिणामकारक ठरते?

दिवसभर धावपळ करणारे आपलं शरीर रात्रीच्या वेळेस आरामदायी परिस्थिती असते. दिवसभराच्या ताणतणावातून पुरेशा झोपेमुळे आपल्याला आराम मिळतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील ही वेळ अतिशय योग्य आहे. 

कोरडी त्वचा : तुमच्या त्वचेवर मुरुमांची समस्या नसल्यास तेलयुक्त लोशन लावल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही. रात्रीच्या वेळेस लोशन लावल्यास त्वचेला पोषक घटक मिळण्यास मदत होते.
तेलकट त्वचा : अतिशय तेलकट-चिकट स्वरुपात असणारे लोशन लावणं टाळावे. झोपण्यापूर्वी बॉडी लोशन लावल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला हायड्रेटेड, मऊ त्वचा मिळते.

4. झोपण्यापूर्वी चेहऱ्याच्या काळजीसाठी नेमके काय करावे?

बहुतांश जण त्वचेवरील उघड्या छिंद्रांमुळे त्रस्त असतात. या छिंद्रांची योग्य ती देखभाल न केल्यास त्वचेच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती असते. चेहऱ्यावरील छिंद्रांची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे.  झोपण्यापूर्वी चेहरा केवळ गरम किंवा कोमट पाण्यानं धुवून स्वच्छ करावा. यामुळे चेहऱ्यावरील उघड्या छिद्रांतून घाण पदार्थ, अतिरिक्त तेल आणि जंतू बाहेर फेकले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर एखादं क्रीम किंवा लोशन लावावे. 

16 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT