इयर एंडचा प्लॅन प्रत्येकाचाच ठरलेला असेलच असे नाही. नेमका यंदा मंगळवार आला म्हटल्यावर अनेकांना कामावर जाणं भाग असेल. पण वर्षाचा शेवटचा दिवस तुम्ही अगदी दणक्यात साजरा करायला हवा. याचं सेलिब्रेशन फार मोठं नसलं तरी तुमच्या आप्तेष्टांसोबत तुम्हाला वेळ घालवण्यासाठी तरी तुम्ही काही तरी नक्कीच प्लॅन करायला हवं. आज 31st च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मुंबईत हा दिवस साजरा करण्यासाठी काही आयडियाज देणार आहोत. मग करुया सुरुवात
ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करा या शुभेच्छा, मेसेजेस, स्टेटस आणि कोट्सनी
मुंबईत ठिकठिकाणी खाऊगल्ली आहेत. तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवायचा असेल आणि मुंबईतील काही खास पदार्थ खायचे असतील तर तुम्ही मस्त संध्याकाळी या खाऊगल्लीला भेट देऊ शकता. आता या प्लॅनमध्ये कदाचित तुम्हाला डान्स किंवा गाण्यांचा आनंद घेता येणार नाही. पण वर्षाचा शेवटचा दिवस आपण सोबत घालवला याचा आनंद अधिक होईल. शिवाय हा प्लॅन करण्यासाठी तुम्हाला प्री बुकींग किंवा असे काही करण्याची कोणतीही गरज नसते. त्यामुळे तुम्ही अगदी लास्ट मिनिटंही हा प्लॅन करु शकता. हा प्लॅन तुमच्या अगदी बजेटमध्येसुद्धा आहे.
तुम्ही मुंबईमध्ये राहात असलात तरी तुम्ही मुंबई किती पाहिली हा प्रश्न आहे. रोज कामांसाठी बाहेर पडताना तुम्ही केवळ प्रवास करता पण तुम्ही आजुबाजूला पाहत नाही. तर फक्त घड्याळ पाहता जर तुम्हाला सुट्टी असेल तर तुम्ही मुंबईदर्शनचा प्लॅन करु शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ट्रॅव्हल्सकडे बुकींग करायची गरज नाही. तुम्ही एखादी कॅब बुक करुनही हे करता येईल. तुम्ही दिवसभर मस्त मुंबई दर्शन करु शकता.
मुंबईत अनेक ठिकाणी चौपाट्या आहेत. तुम्हाला समुद्र आवडक असेल तर तुम्ही चौपाट्यांना भेट देऊ शकता. अनेक चौपाट्यांवर छान खाण्याचे चटपटीत पदार्थ आहे. वर्षाचा शेवट मस्त तुम्ही आरामात चांगल्या भविष्याचा विचार करत घालवू शकाल. त्यामुळे मुंबईत आहात आणि तुम्ही बीचवर जाणार नाही असे कसे होईल नाही का? हा प्लॅन करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या दिवशी पोलिसांचा अधिक पाहारा असतो. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही दारु किंवा अन्य आक्षेपार्ह गोष्टी करु नका कारण त्याचा नाहक त्रास तुम्हाला होऊ शकेल.
मुंबई लगत अनेक चांगली रिसोर्ट्स आहेत. तुम्ही तुमचा शेवटचा दिवस छान रिसोर्टमध्येही घालवू शकता. पण यासाठी तुम्हाला प्री बुकींग करणे फारच गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही आधीच याचे बुकींग करुन ठेवा म्हणजे तुम्हाला छान मजा करता येईल. मुंबईजवळ तुम्हाला जायचे असेल तर सगुणा बाग (कर्जत), रेन फॉरेस्ट रिसोर्ट (कर्जत), सायलेंट रिसोर्ट (पालघर) किंवा अन्य काही ठिकाणं शोधू शकता.
आता तुम्ही काही प्लॅन केला नसेल तर मस्त असा काहीतरी प्लॅन करा आणि वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.