फेस सीरम तुमच्या त्वचेवर आणेल ग्लो, जाणून घ्या बेस्ट फेस सीरम

फेस सीरम तुमच्या त्वचेवर आणेल ग्लो, जाणून घ्या बेस्ट फेस सीरम

त्वचेची काळजी घेण्यास आपण जराही मागे पुढे पाहत नाही. चेहऱ्यासाठी जे चांगलं असेल ते आपण करायला तयार असतो. हल्ली अनेकांना नितळ त्वचेसोबतच चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असतो. मेकअप करुन तुमची त्वचा नितळ दिसू शकते. पण त्याचा ग्लो हा मेकअप असेपर्यंत असतो. पण तुम्हाला जर हा ग्लो जास्तवेळ टिकायला हवा असेल आणि तुमची त्वचा चांगली करायची असेल तर तुम्ही फेस सीरम वापरायला हवे. कारण हे फेस सीरम तुमचा चेहऱ्यावर नॅचरल ग्लो तर आणते शिवाय तुमचा चेहरा चांगला सुद्धा करते.

जाणून घ्या तुमच्यासाठी कोणते डिओड्रंट आहेत बेस्ट (Best Deodorant For Women In Marathi)

फेस सीरम काय करते?

shutterstock

तुम्ही केसांसाठी सीरम लावत असाल तर तुम्हाला सीरम लावण्याचे फायदे माहीत असतीलच. केसांना सीरम लावल्यानंतर तुमचे केस स्मुथ आणि सिल्की होतात. अगदी त्याच प्रमाणे फेस सीरम काम करत असते. फेस सीरम तुमचा चेहरा स्मुथ करते आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणते. जर तुम्हाला चेहऱ्यासाठी इतर काही वापरायचे नसेल तर तुम्ही फेस सीरमचा उपयोग करु शकता. पण नेमकी कशाची निवड करायची हे कळत नसेल तर तुम्हाला फेस सीरम आणि फेस टोनरमधील फरक माहीत हवा.

फेस सीरम कसे लावावे?

shutterstock

आंघोळ केल्यानंतर तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला सीरम लावू शकता. कोणताही मेकअप लावण्याआधी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सीरम लावायचे असते. त्यानंतर तुम्ही तुमचा मेकअप करु शकता. बेसला सीरम लावल्यामुळे तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये मेकअप जात नाही. जर तुम्ही मेकअप करत नसाल तरी देखील तुम्ही हे सीरम लावू शकता.तुमच्या त्वचेला हायड्रेंट ठेवण्याचे काम फेस सीरम करत असते.

वाचा - घरच्या घरी बनवा तुमच्या त्वचेसाठी बेस्ट सीरम

त्वचेसाठी निवडा बेस्ट सीरम

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फेस सीरम मिळतात. तुम्हाला तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस सीरम निवडणे गरजेचे असते. आता वेगवेगळ्या फेस सीरमची माहिती घेताना तुम्ही कोणते फेस सीरम निवडायला हवे ते आता पाहुयात.

व्हिटॅमिन C सीरम

कोणत्याही त्वचेसाठी व्हिटॅमिन C आवश्यक असते. तुमच्या त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी तुम्ही व्हिटॅमिन C असलेले सीरम वापरु शकता. लिंबू आणि संत्र यांचे घटक असलेले हे सीरम तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट करते. या सीरममुळे तुमचा चेहरा अधिक चांगला दिसतो. तुमचा चेहरा कोरडा असेल तर तुमच्या चेहऱ्याला एक ग्लो येतो.

Skin Care

St.Botanica Vitamin C 20% + Vitamin E & Hyaluronic Acid Facial Serum

INR 1,499 AT St.Botanica

टी ट्री ऑईल सीरम

जर तुमच्या त्वचेवर पिंपल्सचे डाग असतील तर तुमच्यासाठी टी ट्री ऑईल असलेले सीरम एकदम बेस्ट आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी या सीरमचा वापर करु शकता. टी ट्रीमधील घटक तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी करण्यास मदत करत. शिवाय जर तुमची त्वचा पिंग्मेंटेड असेल तरी देखील तुमत्या पिंपल्सची जळजळ कमी करुन त्यांना कमी करण्याचे काम हे सीरम करते. हे सीरम लावल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थोडा तेलकट वाटेल पण तुम्हाला त्यामुळे नक्कीच त्रास होणार नाही

वाचा - व्हिटॅमिन ई चे फायदे

Skin Care

The Body Shop Tea Tree Anti-Imperfection Daily Solution, 50ml

INR 1,595 AT The Body Shop

पपई सीरम

तुमची  त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेसाठी पपईचे सीरमही उत्तम आहे. पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत मिळते. जर तुमची त्वचा खूपच तेलकच असेल तर तुमच्या त्वचेसाठी पपईचे सीरम हे उत्तम आहे. 


आता जर तुम्ही चेहऱ्यासाठी सीरम लावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या सीरमचा उपयोग करता येईल. 

Skin Care

Good Vibes Oil Control Serum - Tea Tree & Papaya (10 ml)

INR 169 AT Good Vibes

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. शॉपिंगसाठी इथे क्लिक करा...https://www.popxo.com/shop/zodiac-collection/