ADVERTISEMENT
home / Fitness
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ब्ल्यू टी (Blue Tea)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते ब्ल्यू टी (Blue Tea)

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे वजन वाढण्याचं प्रमाण वाढलं आहे. मग अशावेळी वजन कमी करण्यासाठी विविध प्रकार केले जातात. कोणी योगा करतं तर कोणी सतत जिमच्या फेऱ्या वाढवतं. तर बरेच जण वजन कमी करण्यासाठी विविध चहांचा अर्थात टी चा वापर करतात. त्यामध्ये ग्रीन टी चा वापर सर्वात जास्त करण्यात येतो. पण आता वजन कमी करण्यासाठी एक नवा प्रकार वापरण्यात येतो आणि त्याला ब्लू टी असं म्हटलं जातं. प्युअर हर्बल टी असणारा हा ब्लू टी अपराजिताच्या निळ्या फुलांपासून तयार करण्यात येतो. या टी ला बटरफ्लाय नावानेदेखील ओळखलं जातं. हे निळ्या अपराजिता फुले उकळवून बनवले जाते आणि या चहाचे बरेच फायदे आहेत. तुम्हाला जर या चहाचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. खरं तर दक्षिण – पूर्व आशियामध्ये हा ब्ल्यू टी जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. हा चहा केवळ स्वादिष्टच नाही तर याचा सुगंधदेखील सुंदर असतो. शिवाय याचा तुमच्या शरीरालाही उत्तम फायदा होतो. अँटिऑक्सिडंट्सचे पावरहाऊस म्हणून ब्लू टी ओळखण्यात येतो.

अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त त्यामुळे वजन होतं कमी

Shutterstock

ब्लू टी मध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. इतकं प्रमाण इतर कोणत्याही चहामध्ये आढळून येत नाही. या चहामध्ये आढळणारं बायो – कंपाऊंड शरीरातील फ्री रॅडिकलशी लढा देण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अधिक मजबूत होते. त्यामुळे ब्लू टी किमान दिवसातून एकदा तरी पिण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे तुमचं वजन  कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्लू टी चा वापर करू शकता.  

ADVERTISEMENT

मधुमेहापासून करते बचाव

तुम्हाला जर मधुमेहासारखा आजार असेल तर तुम्ही ब्लू टी चा वापर नक्की करायला हवा. शरीरात रक्तामधील साखरेची पातळी आणि ग्लुकोज मॅनेज करण्यासाठी ब्लू टी चा चांगला वापर होतो. इतकंच नाही तर शरीरात कोणत्याही तऱ्हेचं इन्फेक्शन झालं तर तुम्हाला ब्लू टी च्या मदतीने ते इन्फेक्शन दूर करता येतं. रोज कमीत कमी दोन कप ब्लू टी पिण्याने तुमच्या या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हालाही अशा समस्या असतील तर वेळेवर ब्लू टी पिण्यास तुम्ही सुरुवात करा. 

सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे कॅमोमाईल टी

तणावाची पातळी होते कमी

Shutterstock

ADVERTISEMENT

ब्लू टी तुमच्या तणावाची पातळी कमी करण्यासाठीही मदत करते. ब्लू टी पिण्यामुळे मेंदूमध्ये तयार होणारे हार्मोन्स वाढतात आणि त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते. तसंच कार्टिसोलसारख्या हार्मोन्सना बाहेर काढून  टाकण्यासाही याची मदत मिळते. ज्यामुळे तुमच्या डोक्यावर येणारा तणाव थांबण्यास मदत मिळते. ब्लू टी पिण्यामुळे तुम्हाला चांगली झोप मिळते आणि शरीर रिलॅक्स होण्यास मदत मिळते. 

Black Tea मुळे आरोग्य राहतं फिट, सौंदर्यासाठीही होतो उपयोग

त्वचा आणि केसांसाठी अधिक फायदेशीर

ब्लू टी मध्ये अधिक अँटिऑक्सिडंट्स असल्याने आपल्या त्वचा आणि केसांसाठी याचा अधिक फायदा होतो. तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल की, या चहामध्ये विटामिन्स आणि मिनरल्सचा भरणा असतो जे तुमच्या त्वचेसाठी अँटीएजिंगचं काम करतात आणि केसांना अधिक चमक आणण्यासाठी आणि मजबूती आणण्यासाठी फायदा मिळतो.

कॅन्सरसाठीही होतो फायदा

ADVERTISEMENT

Shutterstock

ब्लू टी मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी  याची मदत मिळते. अँटीऑक्सिडंट्स आणि यामध्ये आढळणारे मिनरल्स हे तुमच्या शरीरातील सेल्सना नुकसान पोहचवत नाहीत आणि त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका टळतो. त्यामुळे ब्लू टी चा नियमित तुमच्या आयुष्यात तुम्ही उपयोग करून घ्यायला हवा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

19 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT