2020 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार फ्रेश जोड्या

2020 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार फ्रेश जोड्या

2019 मध्ये अनेक नव्या आणि जुन्या जोड्यांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. 2019 च्या बॉलीवूड रिपोर्ट कार्डबाबत बोलायचं झाल्यास हिट आणि फ्लॉप चित्रपटांमध्ये बरोबरीचा स्कोअर झाला. ‘गली बॉय’, ‘वॉर’, ‘बाला’, ‘ड्रीम गर्ल’, ‘जजमेंटल है क्या’ आणि ‘केदारनाथ’ सारख्या चांगल्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक जोड्यांचं कॉकटेल पाहायला मिळाल. आता उत्सुकता आहे ती बॉलीवूडमध्ये (Bollywood) 2020 येणाऱ्या नव्या जोड्यांबाबत. 2020 मध्येही अनेक नव्या आणि जुन्या जोड्या आपली जादू बॉक्स ऑफिसवर दाखवण्यासाठी तयार आहेत.

बॉलीवूडमधील नव्या जोड्या

बॉलीवूडने 2020 मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची पूर्ण तयारी केली आहे. अनेक रीमेक्स, सिक्वल्स, रोमांस, अॅक्शन, कॉमेडी, बायोपिक्स आणि रॉमकॉम चित्रपटातील भरपूर मसाल्यांसोबत काही नव्या जोड्या मोठ्या पडद्यावर तुमच्या भेटीला येणार आहेत. बॉलीवूड (Bollywood) 2020 मधील या जोड्यांवर टाकूया एक नजर -

कियारा अडवाणी - कार्तिक आर्यन

2019 मध्ये सारा अली खान, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे आणि क्रिती सनोनसारख्या अभिनेत्रींसोबत काम केल्यावर कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) 2020 मध्ये ‘लस्ट स्टोरीज’ फेम कियारा अडवाणी (Kiara Advani) सोबत ‘भूलभुलैया 2’ (Bhoolbhulaiyaa 2) मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर ‘भूलभुलैया’ चा सिक्वल आहे.

कंगना रणौत - जस्सी गिल

2019 प्रमाणेच 2020 मध्येही बायोपिक्सचा फॉर्म्युला जोरदार आहे. 2019 मध्ये ‘मणिकर्णिका’ मध्ये राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेला साकारल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) 2020 मध्ये एका राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटूच्या आयुष्यावरील आधारित ‘पंगा’ (Panga) चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जस्सी गिल (Jassie Gill) तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सेक्रेड गेम्स फेम स्मिता तांबे, रिचा चड्ढा आणि नीना गुप्ता यांच्याही भूमिका आहेत.

सारा अली खान - वरुण धवन

स्टार किड सारा अली खान (Sara Ali Khan) ने 2019 मध्ये ‘केदारनाथ’ आणि ‘सिंबा’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. 2020 मध्ये ती बॉलीवूडचा चॉकलेट हिरो वरुण धवन (Varun Dhawan) सोबत ‘कुली नं.1’ (Coolie No.1) चित्रपटाच्या रीमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट महानायक अमिताभ बच्चन स्टारर चित्रपट ‘कुली नं.1’ चा रीमेक असून वरुण-साराच्या फ्रेश जोडीबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

आलिया भट - रणबीर कपूर

बॉलीवूडच्या विश्वात सध्या आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या लव्हबर्ड्सची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या फॅन्सना आता उत्सुकता आहे ती या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्याची. बॉलीवूड स्टार मेकर करण जोहरच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळेल. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानही आहे.

कार्तिक आर्यन - जान्हवी कपूर - लक्ष्य

तुम्हाला प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन स्टारर चित्रपट ‘दोस्ताना’ तर लक्षात असेलच ना. याच चित्रपटाने पीसीला हॉलीवूडचं एंट्री तिकीट मिळवून दिलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये झळकणार आहे नवी तिकडी, ती म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), जान्हवी कपूर (Jahnvi Kapoor) आणि लक्ष्य (Lakshya) ची.

संजना सांघी - सुशांत सिंग राजपूत

2019 मध्ये नॉव्हेल ‘द झोया फॅक्टर’ या मूव्ही अडॅप्टेशननंतर आता आहे ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ ला मोठ्या पडद्यावर पाहण्याची. या सुपरहिट नॉव्हेल आणि हॉलीवूड चित्रपटाच्या बॉलीवूड रीमेक ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) सोबत एक नवी अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) सोबत दिसणार आहे. 

तारा सुतारिया - अहान शेट्टी

बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ने ‘स्टूडंट ऑफ द ईयर टू’ आणि ‘मरजावां’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमधून आपला अभिनय आणि नृत्य कौशल्य दाखवलं आहे. 2020 मध्ये ती हिट तेलुगू चित्रपट आर एक्स 100 (RX 100) च्या हिंदी रीमेकमध्ये अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) सोबत दिसणार आहे.

दिशा पाटणी - आदित्य रॉय कपूर - कुणाल खेमू

रिव्हेंज ड्रामा चित्रपटांशिवाय बॉलीवूडचं रिपोर्ट कार्ड अपूर्ण आहे. आगामी ‘मलंग’ (Malang) हा चित्रपट एक रिव्हेंज ड्रामा आहे आणि यामध्ये दिशा पाटणी (Disha Patani) सोबत आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor), कुणाल खेमू (Kunal Khemu) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) सारखे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहीत सुरी करत आहे.