थंडीपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी सर्वसाधारणपणे स्वेटर घातला जातो. पण स्वेटरसोबतच तुम्ही स्वेटशर्ट हा प्रकार देखील ऐकला असेल. हल्ली हे सगळे प्रकार नुसतेच थंडीपासून रक्षण करणारे वगैरे राहिले नाहीत तर तुम्हाला फॅशनचाही यामध्ये विचार करणे महत्वाचे झाले आहे. जर तुम्ही स्वेटर आणि स्वेटशर्टमध्ये नेमकं काय घालू या विचारात असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही टिप्ससुद्धा काढल्या आहेत. त्यामुळे हे नक्की वाचा.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे दोन वेगळे प्रकार नेमके काय आहेत. तर सगळ्यात आधी आपण स्वेटर आणि स्वेटशर्टमधील फरक काय तो जाणून घेऊया .
स्वेटर: सर्वसाधारणपणे लोकरीच्या धाग्यापासून बनलेल्या जॅकेट किंवा इतर प्रकारांना स्वेटर असे म्हटले जाते. याचे काम असते तुमचे थंडीपासून संरक्षण करणे. हल्ली तुम्हाला स्वेटरमध्ये अनेक प्रकार आणि रंग मिळतात. लोकरीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार हे स्वेटर मिळतात. अनेक ठिकाणी स्वेटर हे हाताने विणलेले मिळतात. तर मशीनवरसुद्धा हे स्वेटर बनवले जातात. स्वेटरमध्ये अनेक बारीक काम केलेले असते.
स्वेटशर्ट: हा प्रकार थोडासा जॅकेट स्वरुपात असतो. म्हणजे तुम्हाला अगदी कधीही कशावरही हा प्रकार घालता येतो. याचा शब्दश: अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घामासाठी हे असते. तुमचा घाम यामध्ये व्यवस्थित शोषला जातो. जीममध्ये किंवा एखाद्या कॅज्युअलवेअरवर हे जॅकेट घातले जाते.एखाद्या टूरमध्ये किंवा बाहेर जाताना तुम्हाला अशाप्रकारचे जॅकेट घालता येते. हे जॅकेट तुम्हाला अगदी कोणत्याही वातावरणात घालता येते. स्वेटरच्या तुलनेत हे थोडे पातळ असते. त्यामुळे तुम्ही अगदी उन्हाळ्यातही हे जॅकेट घालू शकता.
बूटांची स्टाईल करुन दिसा हटके.. तुम्ही ट्राय केलेत का हे प्रकार (Types Of Boots For Women)
आता स्वेटर केवळ थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घालत नाही. तर त्यामध्येही फॅशन स्टेटमेंट असते. त्यामुळेच सगळ्यात आधी आपण स्वेटरचे प्रकार जाणून घेऊया आणि ते कशावर आणि कधी घालता येतील ते पाहुया.
टर्टल नेक स्वेटरचा गळा हा साधारण पोलो नेक प्रमाणे असतो. म्हणजे यामध्ये तुमच्या गळ्यालगत पट्टी असते. हा स्वेटरचा प्रकार थोडासा जाड असतो. बॉयफ्रेंड फिट असल्यामुळे तुम्हाला ते कशावरही घालता येते. तुम्हाला याच्या आतमध्येही फार घालण्याची गरज नसते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या पद्धतीने विणकाम दिसते.
स्टायलिंग टिप: तुम्हाला अशा प्रकारचे स्वेटर कुठेही घालता येते. पण या स्वेटरमुळे तुमचे शरीर संपूर्ण झाकले जाते. जर तुम्ही हे स्वेटर टक इन करुन वापरु शकत असाल तर फारच उत्तम. तुम्ही ऑफिससाठी घालण्याचा विचार करत असाल तर रंग निवडताना एकच शेड निवडा.
चोकर स्वेटर हा थोडा स्टायलिश स्वेटरचा प्रकार आहे. हा तुम्हाला अगदी कधीही कुठेही घालता येतो. हा प्रकार तुम्हाला थोडासा टिशर्ट सारखाच वाटेल. या स्वेटरची खासियत सांगायची झाली तर गळ्याकडे एखाद्या नेकपीस प्रमाणे त्याची पट्टी असते आणि मध्ये थोडा गॅप असतो. जो तुमच्या स्वेटरचा गळा असतो. यामध्येही तुम्हाला अनेक पॅटर्न आणि गळे मिळतात.
स्टायलिंग टिप: स्वेटरचा हा प्रकार फॅन्सी असल्यामुळे तुम्ही पँटस किंवा स्कर्ट्सवर घालू शकता. तुम्ही थंडीच्या ठिकाणी फिरायला जाणार असाल तर तुमच्या फोटोसाठी हा प्रकार चांगला आहे.
वाचा - श्रगसोबत अशी करा स्टाईल
स्वेटरचा हा एक प्रकारही तुम्ही नक्कीच वापरुन पाहायला हवा असा आहे. हा आकाराने थोडा मोठा असतो. त्यामुळे तुम्हाला हे स्वेटर मोठे वाटले तरी हे स्टायलिश वाटू शकते. या प्रकारामध्ये तुम्हाला ड्रेस आणि शॉर्ट असा दोन्ही प्रकार मिळू शकतो.
स्टायलिंग टिप: आकाराने मोठा असल्यामुळे हा प्रकारही तुम्हाला स्टायलिश दिसू शकतो.त्यामुळे तुम्ही हा प्रकार नॅरो बॉटम पँटवर घालू शकता.
फझी स्वेटर हे हाताला फार मुलायम लागते. या स्वेटरचे दोरे थोडे बाहेर आलेले असतात. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतात. हे स्वेटर तुम्हाला एखाद्या पार्टीलासुद्धा घालता येतात. फक्त तुम्हाला पार्टीसाठी असे प्रकार निवडतात त्यांचे वायब्रंट कलर निवडायचे असतात.
स्टायलिंग टिप: हा प्रकार तुम्हाला कोणत्याही फॉर्मल वेअरवर घालता येत नाही. तुम्हाला हा प्रकार एखाद्या पार्टीसाठी किंवा असा घालता येईल. कारण रोज वापरताना तुम्हाला हा स्वेटर अधिक जपावा लागण्याची शक्यता आहे.
ज्या प्रमाणे बेल बॉटमच्या पँट असतात अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला बेल स्लिव्हज असलेले स्वेटरही पाहायला मिळतात. आता या प्रकाराच्या स्वेटरसाठी अगदी बारीक लोकर वापरण्यात येते. त्यामुळे हे स्वेटर तुम्हाला तसे पातळ वाटतील. पण तरीही हे स्वेटर उबदार असतात तुम्हाला हे स्वेटर कोणत्याही फॉर्मल कपड्यांवर घालता येतील.
स्टायलिंग टिप: जर तुम्हाला फॉर्मल्ससाठी काही वेगळे हवे असेल तर तुम्ही हा पर्याय देखील निवडू शकता. तुम्हाला यामध्ये तुमच्यापद्धतीने स्टायलिंग करता येईल.
हल्ली सगळ्यांना हुडी म्हटली की पटकन पॅटर्न कळतो. लोकरीमध्ये तुम्हाला लहान आकारांच्या हुडी मिळतात. या उबदार असल्या तरी स्टायलिश असतात.तुम्हाला असे स्वेटर्स बाहेर फिरायला जाताना घालता येऊ शकतात. तुम्ही जर कॉलेज गोईंग असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेंडी स्वेटर घालता येईल.
स्टायलिंग टिप: स्वेटरचा हा प्रकार अगदीच कॅज्युअल आहे त्यामुळे तुम्ही हा प्रकार वीकेंड किंवा मस्त वेकेशनच्यावेळी वापरु शकता.
स्वेटर जर तुम्ही कधी विणला असेल तर तुम्हाला केबल क्निट हा प्रकार माहीत हवा. कारण केबल नेच प्रकाराच्या स्वेटरमध्ये त्यांचे टाके थोडे मोठे असतात.यामध्ये तुम्हाला ड्रेस किंवा जॅकेट प्रकाराचे स्वेटर्स मिळतात. तुम्हाला यामध्येही रंग आणि पॅटर्न मिळू शकतील.
स्टायलिंग टिप: स्वेटरचा हा प्रकार खूप जाड असल्यामुळे तुम्ही हा प्रकार रोज वापरु शकताच असे नाही. पण त्यामध्येही तुम्हाला काही पातळ प्रकार मिळाला तर तो कॅज्युअल वेअरसारखा वापरता येऊ शकतो.
अनेक ठिकाणी स्वेटरचा उल्लेख केलेला असताना आम्ही स्वेटर ड्रेसचा उल्लेखही आम्ही अनेक वेळा केला आहे. स्वेटर ड्रेस हा प्रकारही यामध्ये वेगळा मिळतो. जरी तुमच्या इथे खूप थंडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्वेटर ड्रेस घेऊ शकता. आणि त्याखाली शूज घालू शकता.
स्टायलिंग टिप:ड्रेसचा हा प्रकार बॉडीकॉन किंवा इतर कोणत्याही स्वरुपात तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही हा ड्रेस कधीही घालू शकता.
केज्ड स्वेटर हा प्रकारही तसा नवीनच आहे असं म्हणायला हवं. याचं कारण असतं की, केज्ड स्वेटरमध्ये तुम्हाला काही फॅन्सी डिझाईन्स मिळतात. यांच्या गळ्याकडे किंवा पाठीमागे जाळीदार डिझाईन केलेली असते. त्यामुळे तुम्हाला हे स्वेटर्स कधीही घालता येऊ शकतात.
स्टायलिंग टिप: थोडा फॅन्सी असल्यामुळे तुम्ही हा प्रकार पार्टीमध्ये घालू शकता. व्हेकेशन दरम्यानही तुम्हाला हा प्रकार घालता येऊ शकतो.
स्वेटरच्या या प्रकारामध्ये विशेष असतो तो म्हणे ट्विस्ट. तुमच्या मागच्या बाजूला किंवा पोटाच्या बाजूला ट्विस्ट केलेले असते. थोडासा लुझ आणि पातळ प्रकारामध्ये तुम्हाला ट्विस्टेड स्वेटर मिळते. त्यामुळे तुम्ही असे स्वेटर ड्रेस किंवा जीन्सवर घालू शकता.
स्टायलिंग टिप: तुम्ही फॅशनिस्टा असाल तर तुम्हाला हा प्रकार नक्कीच ट्राय करायला हवा. हा प्रकार तुम्हाला सेक्सी आणि चांगला दिसतो. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकाराचे स्टायलिंग करु शकता.
स्वेटरचे प्रकार पाहिल्यानंतर आता आपण स्वेटशर्टचे काही प्रकार पाहणार आहोत. स्वेटशर्टचे हे प्रकार तुम्ही या आधीही वापरले असतील. पण तुम्ही हे स्वेटशर्ट नेमके कसे घालायला हवे या संदर्भात स्टायलिंग टिप्स देणार आहोत.
उंची कमी असली तरी तुम्ही घालू शकता 'मॅक्सी' ड्रेस, वाचा टिप्स
मागे टोपी किंवा हुड असलेले हे स्वेटशर्टचे प्रकार तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असतील. वापरलेसुद्धा असतील झीपर किंवा टिशर्ट स्वरुपात तुम्हाला हे स्वेटशर्ट मिळू शकतात. तुम्ही अशा प्रकारचे स्वेटशर्ट कधीही घालू शकता. तुम्हाला अगदी कधीही हे स्वेटशर्ट घालता येऊ शकतं. डेनिम, स्कर्ट कशावरही हे स्वेटशर्ट शोभून दिसतात.
स्टायलिंग टिप्स: हुड स्वेटशर्ट्स तुम्हाला कधीही घालता येऊ शकते. हे तुम्हाला स्पोर्टी लुक देते.
क्रॉप्ड स्वेटशर्टस यांची उंची थोडी कमी असते. म्हणजे तुमच्या बेंबीच्या वर जाणारे असे हे स्वेटशर्ट असतात. तुम्हाला हे स्वेटशर्ट हॉट पँटवर घालता येतात. तुम्हाला यामध्ये अनेक प्रकार दिसतील. शिवाय होजिअरी किंवा अन्य मटेरिअलमध्येही हे स्वेटशर्ट मिळू शकतील.
स्टायलिंग टिप्स: तुम्हाला शॉर्ट टॉप आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचे स्वेटशर्ट घालू शकता. यामध्ये मिळणारे रंग तुम्ही एखाद्या शॉर्टवर किंवा नेरो बॉटम जीन्सवर घालू शकता.
स्वेटशर्ट्स चा हा प्रकार हुड किंवा हुड नसलेलाही मिळतो. यामध्ये गळा गोल असतो आणि रंगामध्ये विविधता केलेली असते. थोड्या जाड कपड्यांमध्ये हे स्वेटशर्ट मिळू शकतात.
स्टायलिंग टिप: फॉर्मल वेअरवर अशा प्रकारचे स्वेटशर्ट्स फारच चांगले दिसतात. फक्त तुम्ही रंगाची निवड करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.
पुलओव्हर स्वेटशर्टमध्ये चेन नसते ते तुम्हाला थेट स्वेटरप्रमाणे घालावे लागते. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळतात. तुम्हाला हे स्वेटशर्ट कशावरही घालता येऊ शकतात.
स्टायलिंग टिप्स: जर तुम्ही कुठे वेकेशनवर जाणार असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे स्वेटशर्ट्स घालायला काहीच हरकत नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने कधीही हा प्रकार घालता येईल.
जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला स्वेटशर्टचा हा प्रकार अगदी हमखास खरेदी करता येईल. स्पोर्टस स्वेटशर्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे मटेरिअल मिळू शकते. अगदी पातळ कपड्यापासून जाड कपड्यांपर्यंत तुम्हाला हे स्वेटशर्ट्स मिळू शकतात.
स्टायलिंग टिप: जीममध्ये जाताना तुम्ही जर अशाप्रकारचे स्वेटशर्ट घातले तर ते तुम्हाला चांगले दिसू शकतात. शिवाय तुम्हाला येणारा घामही यामध्ये अगदी व्यवस्थित शोषला जातो.
जर तुम्हाला थोडे लाऊड आणि फॅन्सी असे स्वेटशर्ट हवे असतील तर हा प्रकार तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. फरच्या कपड्यामध्ये हे स्वेटशर्ट असतात. तुम्हाला तुमच्या ड्रेसच्या वर हा प्रकार घालता येऊ शकतो.
स्टायलिंग टिप: फर स्वेटशर्ट तुम्हाला थोडे जास्त लाऊड वाटू शकतात. पण तुम्ही एखाद्या पार्टीसाठी जाताना तुमच्या कपड्यांवर काहीतरी घालण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय बेस्ट आहे.
आता फरहून थोडा फॅन्सी प्रकार म्हणजे ऑफ शोल्डर स्वेटशर्ट्सचा. जर तुम्हाला तेच तेच स्वेटशर्ट घालून कंटाला आला असेल तर तुम्ही ऑफ शोल्डर स्वेटशर्टही घालू शकता. तुम्हाला हे स्वेटशर्ट सहज मिळणार नाहीत. थोडा शोध घ्यावा लागेल पण हा प्रकार चांगला दिसते.
स्टायलिंग टिप्स: हा प्रकार फारच कॅज्युअल आहे. तुम्ही एखाद्या डिनर डेटला किंवा असेच कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे स्वेटशर्ट नक्की करा.
तुमच्या शरीरावर येणारा अतिरिक्त घाम शोषून घेण्याची ताकद स्वेटशर्टमध्ये असते. म्हणूनच खेळाडू व्यक्ती अशा प्रकारचे स्वेटशर्ट हमखास घालतात. कारण त्यांना खेळताना येणारा घाम आणि त्यामुळे ओलं होणारं अंग नको असतं. अशावेळी त्यांच्या घाम शोषून घेण्याचे काम स्वेटशर्ट करत असतात. एकूणच काय घाम शोषून घेण्याचे काम स्वेटशर्ट करत असते.
तुम्ही स्वेटर अगदी कधीही आणि कशावरही घालू शकता. तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कपड्यांवरही स्वेटर घालू शकता. फक्त तुम्हाला तुमच्या अशा कपड्यांवर सिंगल रंगाचे स्वेटर निवडायचे असते. शिवाय फॅन्सी स्वेटर्सपेक्षा तुम्ही थोडे साधे आणि चांगले वाटणारे स्वेटर्स निवडले तर ते तुम्हाल तुमच्या कोणत्याही कपड्यांवर अगदी आरामात घालता येतात.
जर बाहेर फारच थंडी असेल अशावेळी आपण स्वेटर घालतो. पण स्वेटशर्ट हा प्रकार तुम्हाला तसा कधीही घालता येतो. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यातही स्वेटशर्ट घालू शकता. याचे मटेरिअल होजिअरी आणि कॉटनमध्ये असल्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत मिळते. शिवाय थंडीच्यावेळी कपडा थोडा जाड असल्यामुळे तुम्हाला स्वेटशर्टमध्ये छान उबदार वाटते.
यंदा जर स्वेटर आणि स्वेटशर्ट घेण्याच्या बेतात असाल तर तुम्ही नक्की या टिप्सचा विचार करा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.