महागड्या पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरच्याघरी करा हेअर डिटॉक्स

महागड्या पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरच्याघरी करा हेअर डिटॉक्स

जशी आपल्या शरीराला डिटॉक्सची गरज असते, ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर फेकले जातात. शरीराच्या निरोगी ठेवण्यासाठी हे खूपच महत्त्वपूर्ण मानलं जातं. बाहेरील धूळ-माती आणि प्रदूषणामुळे आपल्या केसांवरही नकारात्मक प्रभाव पडत असतो. कारण त्यामुळे केसांवर अनेक टॉक्सिन्स जमा होतात आणि अशावेळी केसांना डिटॉक्स करण्याची खूप गरज असते. त्यामुळे नियमित अंतरानंतर डिटॉक्स केल्यास केस निरोगी राहतात. डिटॉक्स केल्याने केसांमधील कोंडा, स्प्लीट एंड्स, कोरडेपणा आणि केसगळती इत्यादी समस्या दूर होतात. पुढील तीन सोप्या पद्धतीने तुम्ही केसांना डिटॉक्स करू शकता.

डिटॉक्सची गरज नेमकी कधी असते?

सामान्यतः दर 15 ते 20 दिवसांनी केसांचं डिटॉक्स करावं. जर तुमचे केस प्रदूषणाच्या जास्त संपर्कात असतील आणि तुम्हाला केस मोकळे ठेवायला आवडत असेल तर तुम्ही 10 ते 15 दिवसांनी केस डिटॉक्स करा. खरंतर डिटॉक्सच्या मदतीने स्कॅल्पचे पोर्स मोकळे होण्यास मदत होते आणि यानंतर शँम्पू, तेल, कंडीशनर यांनी पोषण केल्यास ते केसांच्या मूळापर्यंत जातं. त्यामुळे स्कॅल्प निरोगी राहण्यास मदत होते.

हेअर डिटॉक्ससाठी वापरा कोरफड

त्वचेसाठी जसं कोरफड म्हणजेच एलोव्हेरा जेल फायदेशीर असतं. तसंच केसांसाठीही कोरफड खूप फायदाचं असतं. एलोव्हेरा जेलमध्ये व्हिटॅमीन ए, सी आणि ई चं प्रमाण भरपूर असतं. या जेलमध्ये असलेल्या अँटीबॅक्टीरियल गुणांमुळे कोंड्याची समस्या दूर होते. त्यामुळे हेअर डिटॉक्ससाठी बाजारात मिळणारं ऐलोव्हेरा जेल विकत घेऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ताज्या कोरफडाचा गरही वापरू शकता. हे जेल किंवा गर घेऊन स्कॅल्पला मसाज करा. हा गर किमान एक तास केसांना लावून ठेवा. मग सौम्य शँपूने केस धुवा. यामुळे तुमच्या केसांसोबतच स्कॅल्पही स्वच्छ होईल.

हेअर डिटॉक्ससाठी एपल साईडर व्हिनेगर

एपल साईडर व्हिनेगर किंवा सफरचंदाचं व्हिनेगर हे केसांसाठी उत्तम असतं. या व्हिनेगरने केसांच्या मुळांशी असलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते आणि केस चमकदारही होतात. हेअर डिटॉक्ससाठी तुम्ही एपल साईडर व्हिनेगर वापरताना ते डायलूट करून घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तीन लीटर पाण्यात 10 एमएल सफरचंदाचं व्हिनेगर घाला. केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकापर्यंत या मिश्रणात केस भिजवा. पाच मिनिटं तसचं ठेवा आणि साध्या पाण्याने केस धुवून टाका.

हेअर डिटॉक्ससाठी लिंबू आणि काकडी

डँड्रफची समस्या असेल तर लिंबाची मदत होते. लिंबू तुमच्या स्कॅल्पशी जमा झालेली घाण दूर करतं. ज्यामुळे केस कोंडाविरहीत होतात. तर दुसरीकडे काकडीतील भरपूर मिनरल्सयुक्त असते आणि यातील अँटीऑक्सीडंट्स हे केसांना निरोगी ठेवतात. तुम्ही हेअर डिटॉक्ससाठी दोन चमचे काकडीचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण तुमच्या स्कॅल्पवर लावा. हे मिश्रण केसांना  30 ते 40 मिनिटं तसंच ठेवा आणि सौम्य शँपूने धुवून टाका. हा डिटॉक्स उपाय केल्याने तुम्हाला डँड्रफपासून सुटकेसाठी आणि चमकदार मऊ केसांसाठी हा उपाय नक्की करून पाहा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.