प्लास्टिकचा कितीही वापर नाही करायचा असे म्हटले तरीसुद्धा प्लास्टिकची बॉटल आपण वापरतोच. तुम्ही वापरत असलेली प्लास्टिकची बाटली पुन्हा वापर करण्यासारखी असली तर तुम्ही ती स्वच्छ ठेवणेही गरजेचे असते. तुम्ही जी पाण्याची वाटली वापरत आहात तिची स्वच्छता राखणेही फारच गरजेचे असते. तुम्ही तुमच्या प्लास्टिकच्या बॉटल धूत नसाल तर मग तुम्ही आजारपणांना निमंत्रण देताय इतकं मात्र नक्की! तुमची प्लास्टिक बॉटल तुम्हाला अस्वच्छ वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने करु शकता तुमची बॉटल स्वच्छ
तुम्ही तुमची बॉटल नीट निरखून पाहा. जर तुमच्या बॉटलच्या बुडाशी थोडी हिरवी झाक आली असेल तर तुमच्या बॉटलला बुरशी लागली आहे. अशी बॉटल तुम्ही तातडीने धुणे आवश्यक आहे. बादलीत डिटर्जंट सोप घेऊन त्याचा चांगला फेस काढून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून तुमची बॉटल त्यात टाका. बॉटलच्या आत पर्यंत साबण जायला हवा. साधारण 5 मिनिटे ठेवून तुम्हाला लांब ब्रश वापरुन तुम्हाला बॉटल स्वच्छ करुन घ्यायची आहे.
तुम्ही जर पाण्याची बाटली नीट पाहिली तर तुम्हाला तुमचे बूच आणि तेथील भागावर जर मळ साचलेला दिसत असेल तर तुम्हाला तुमची बॉटल धुण्याची गरज आहे. याचे कारण असे की, तुम्ही थेट बॉटल तुमच्या तोंडाला लावता त्यावेळी तुमच्या तोंडात ही साचलेली मळ जाण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी तुम्ही तुमच्या बाटलीचे बूच आतून- आणि बाहेरुन स्वच्छ करणे आवश्यक असते. या शिवाय बूच लावता त्या ठिकाणीही मळ साचलेला असतो. तो साफ करण्यासाठीही तुम्हाला एक छोटा ब्रश वापरण्याची गरज असते. तुम्ही त्याचा उपयोग करुन तेथील मळ काढू शकता.
काही जणांना एखादी वस्तू स्वच्छ करायची म्हटली की, गरम पाणी वापरणे इतकेच वाटते. पण प्लास्टिकच्या बाटलीसाठी कधीही गरम पाण्याचा उपयोग करु नका. याचे कारण असे की, त्यामुळे प्लास्टिक वितळून त्यापासून तुम्हाला अन्य आजारांना आमंत्रण देण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कधीही गरम पाण्याचा उपयोग प्लास्टिकची बॉटल स्वच्छ करण्यासाठी करु नका.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचा वापर करत असाल तर मग एकदा वाचाच
प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग करताना तुम्ही कोणत्या प्रतीचे प्लास्टिकचे वापरायला हवे ते आम्ही सांगितले. मिनरल वॉटरच्या बाटल्या या पुर्नवापरालाठी नसतात. त्यामुळे तुम्ही अशा बाटल्या पुन्हा वापरु नका. त्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.