उपवास करत आहात, तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि नुकसान (Benefits Of Fasting In Marathi)

Fasting In Marathi

तुम्ही नक्कीच कधी ना कधीतरी उपवास केले असणार. पण उपवास म्हणजे नक्की काय? याचं वैज्ञानिक महत्त्व नक्की काय आहे? उपवास केल्याने तुमच्या आरोग्याला नक्की काय फायदा काय? या सगळयाची माहिती तुम्हाला आहे का? खरं तर आपल्याकडे उपवास हा आस्था आणि भक्तीचा विषय आहे. पण तरीही उपवासाचे काही फायदे आणि काही नुकसान असतात. तुमच्या आरोग्यासाठी नक्की याचा काय फायदा होतो हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तसंच उपवासाबद्दलची सगळी माहिती तुम्हाला यातून मिळेल. इतकंच नाही तर उपवासाचा कोणते प्रकार आहेत आणि त्यामुळे नक्की तुमच्या आरोग्याला काय नुकसान होऊ शकतं हेदेखील जाणून घेणार आहोत. खरं काही वेळा उपवास करायला हवा की नको इथपासून वाद सुरू होतात. पण उपवास करायचा असेल तर पूर्णतः न खाता पिता करू नये. उपवासाच्या दिवशी नक्की काय खायला हवं हेदेखील महत्त्वाचं आहे. शिवाय उपवास आहे तर दुप्पट खावं असंही नाही. उपवास आहे म्हणजे उपवासाचा पदार्थ जास्त प्रमाणात खाणंही योग्य नाही. त्यामुळे या लेखातून ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. जाणून घेऊया उपवासाची माहिती - 

Table of Contents

  उपवास म्हणजे नक्की काय ? (What Is Fasting In Marathi)

  Fasting In Marathi

  सर्वात पहिले जाणून घेऊया उपवास म्हणजे नेमकं काय? उपवासाच्या व्याख्याची आपण जर गोष्ट म्हटली तर ती प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जाते. साधारणपणे उपवासाच्या दिवशी कोणतीही व्यक्ती काही वेळासाठी काही खास पदार्थ आणि पेयांचा त्याग करत असते. हा त्याग यासाठी असतो की तुमच्या नेहमीच्या खाण्याने तुमच्या पोटामध्ये काही टॉक्झिन्स असतील तर ते उपवास करून तुम्ही शरीराबाहेर काढू शकता. आठवड्याूतन किमान एक दिवस तरी तुम्ही तुमच्या पोटाला आराम देणं हादेखील यामागे हेतू असतो. काही जण यावेळी केवळ पाणी अथवा जलयुक्त पदार्थ पिणं योग्य समजतात. उपवास हा एक दिवसाचा अथवा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत करण्यात येऊ शकतो. काही ठिकाणी यामध्ये श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असतो. पण यामध्ये तुमच्या आरोग्यालाही फायदा मिळतो. आपण उपवास आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. 

  वाचा - साबुदाणा म्हणजे काय

  उपवासाचे प्रकार (Types Of Fasting In Marathi)

  Types Of Fasting In Marathi

  उपवासाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा उपवास हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. तसे तर उपवासाचे प्रकार वेगवेगळे असतात. तुम्हाला हे प्रकार माहीत आहेत का? नसतील तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत - 

  1. सकाळचा उपवास - या उपवासामध्ये सकाळचा नाश्ता न करता केवळ दिवसभरात दोन वेळा जेवण जेवण्यात येतं. हा उपवास जास्त प्रमाणात केला जात नाही. ज्यांना पूर्ण दिवस उपवास झेपत नाही त्या व्यक्ती अशा प्रकारचा उपवास करू शकतात. 

  2. संध्याकाळचा उपवास - या उपवासामध्ये रात्री जेवण्यात येत नाही. शिवाय पूर्ण दिवसातही केवळ दुपारचं जेवण जेवण्यात येतं. इतर दिवसभर तुम्ही काहीही खाऊ शकत नाही. 

  3. ज्युस अथवा जल उपवास - या उपवासामध्ये कोणत्याही पदार्थांचं सेवन करण्यात येत नाही. या उपवासात केवळ फळांचा रस अथवा केवळ पाण्याचं सेवन करण्यात येतं. 

  4. फलाहार उपवास - या उपवासांमध्ये दिवसभर केवळ फळांचं  सेवन करण्यात येतं. काही व्यक्ती तर निवडक फळांचं सेवनच करतात. ज्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं अशा फळांचं सहसा यामध्ये सेवन करण्यात येतं जेणेकरून पोट भरल्यासारखं राहातं. 

  5. पाण्याचा उपवास - या उपवासामध्ये काहीही खात नाहीत. दिवसभर केवळ पाण्याचं सेवन करून हा उपवास करण्यात येतो. याला पूर्णोपवास  अथवा निराहार उपवास असंही म्हटलं जातं. 

  6. दुधाचा उपवास - या उपवासामध्ये केवळ एक वेळा दूध पिऊन दिवसभर उपवास करण्यात येतो.  दिवसभर पाणीही न पिता केवळ एक ग्लास अथवा एक भांडं दुधावर हा उपवास करण्यात येतो. 

  7. निराहार - निर्जला उपवास - हा उपवास अतिशय कठीण असतो. कारण यामध्ये काही खाणं पिणं तर नाहीच पण पाणीही पित नाहीत. याला निर्जला उपवास म्हणतात. सहसा हरतालिकेच्या दिवशी हा उपवास करण्यात येतो. बऱ्याच महिला अशा रितीने हा उपवास करतात. इतकंच नाही तर हा उपवास साधारण दीड दिवसाचा करण्यात येतो. 

  8. नैदानिक उपवास - यामध्ये जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारची मेडिकल टेस्ट करायला जात असेल आणि त्यासाठी तुम्हाला पोट रिकामंं ठेवण्याची गरज असते. त्यामुळे हादेखील एक प्रकारचा उपवास असतो. यामध्ये जोपर्यंत टेस्ट होत नाही तोपर्यंत काहीही न खाता पिता राहावं लागतं. एका विशिष्ट कालावधीनंतरच तुम्ही खाऊ शकता. पण तेदेखील 7-8 तासानंतर. त्यामुळे हा उपवासच ठरतो. 

  9. साप्ताहिक उपवास - काही जण आठवड्यातून एक दिवस उपवास करतात. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं की, उपवासाच्या दिवशी काय खायचं किंवा केवळ पाणी पिऊन अथवा ज्युस पिऊन राहायचं. लक्षात ठेवा की, उपवासाच्या दिवशी मीठाच्या पदार्थांचं सेवन करू नये. 

  10. इंटरमिटेंट फास्टिंग - हा उपवास आजकाल बराच ट्रेंडिंगमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. हा उपवास वजन कमी करण्यासाठी करण्यात येतो. यामध्ये खाण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात येतो. यामध्ये व्यक्ती एक - दोन दिवस सोडून उपवास करू शकतात. एका वेळचं खाणं बंद करून हा उपवास करण्यात येतो. ज्यावेळी तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकत नाही. पण तुम्ही ज्युस, कॉफी, चहा आणि पाण्याचं सेवन करू शकता. 

  उपवासाचे हे काही प्रकार आहेत. याशिवायदेखील उपवासाचे अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये व्यक्ती साखर अथवा साखरेच्या पदार्थांचे सेवन करू शकत. काही उपवास असे असतात ज्यामध्ये व्यक्ती उच्च कॅलरी पदार्थ असतात त्याचं सेवन तुम्ही बंद करता. कसा उपवास करायचा आहे हे संपूर्णतः उपवास करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. आता आपण उपवासाचे फायदे बघूया - 

  उपवासाचे फायदे (Benefits Of Fasting In Marathi)

  उपवासाचे फायदे हे घरामध्ये सुख शांतीसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी उपवास करायला हवा. महाशिवरात्री, अंगारकी असे अनेक उपवास केले जातात. उपवासाचे वेगवेगळे पदार्थ महाशिवरात्रीलाही बनवले जातात. उपवासाने नक्की काय फायदे होतात हे आपण खाली वाचूया - 

  1. उपवासामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते (Fasting Helps The Body To Detox)

  बऱ्याचदा बाहेर जेवल्याने तेल आणि मसाल्याचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून टाकणं गरजेचं आहे. यामुळे फक्त पोटासंबंधी नाही तर त्वचेच्या समस्याही या टॉक्झिन्समुळे सुरू होतात. त्यामुळे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढून टाकायला हवा. अशा स्थितीत उपवास केल्यास, तुम्ही खाद्यपदार्थांऐवजी शुद्ध पेय अर्थात फळांचा रस, लस्सी आणि ताक, पाण असे पदार्थ पिण्याने शरीर डिटॉक्झिफाय करू शकता. यामुळे त्वचेसंबंधी समस्या कमी होण्यास सुरूवात होते. उपवास करत आहात तर त्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.

  2. वजन कमी करण्यासाठी उपवास

  Loose Weight By Fasting In Marathi

  अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना वजन जास्त असण्याची समस्या आहे. तुम्ही वजन वाढवण्याकडे वेळेवर लक्ष द्यायला हवं. कारण नंतर हे शारीरिक दृष्टीने अधिक त्रासदायक ठरू शकतं. तसं तर वजन कमी करण्यासाठी उपवास हा चांगला पर्याय ठरू शकतो. इंटमिटेंट फास्टिंग हा सध्याचा ट्रेंड आहे. ज्याबद्दल आम्ही तुम्हाला वरही सांगितलं आहे. उपवास वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. वजन कमी करायचे असेल तर 7 दिवसात 2 ते 6 किलो वजन कमी करेल हा डाएट प्लॅन आपण करू शकतो .

  3. पचनक्रियेसाठी उपवासाचे फायदे

  बऱ्याच लोकांना पचनक्रियेची समस्या असते. अशावेळी उपवास करणं फायद्याचं ठरतं. तुमची पचनक्रिया उपवासामुळे चांगली होते. उपवासाने शरीराचं पचनयंत्र व्यवस्थित काम करतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढून शरीर आजारांशी स्वतः लढा देण्यास समर्थ होतं. एका अभ्यासानुसार 62.33% लोकांना उपवासादरम्यान अपचनाची समस्या झाली नाहीये तर 27% लोकांची अपचनाची समस्या ठीक झाली आहे. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते.

  4. रक्तदाबच्या त्रासापासून सुटका मिळवून देतो उपवास

  रक्तदाबच्या त्रासापासून सुटका - Benefits Of Fasting In Marathi

  जसजशी जाडेपणाची समस्या वाढते, तसतशी शारीरिक समस्या वाढते आणि रक्तदाबाची समस्या ही त्यापैकीच एक आहे. रक्तदाबाची समस्या ही आजकाल तरूणपणातही होऊ लागली आहे. अशावेळी याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की, उच्च रक्तदाबापासून उपवास तुम्हाला नक्कीच सुटका करून देऊ शकतो. तुम्ही जर साधारण 8 तासाचा उपवास केलात तर तुम्हाला लाभदायी ठरू शकतो. यामुळे तुमची उच्च रक्तदाबाची समस्या बऱ्याच अंशी बरी होते. तसंच रक्तदाब नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.

  5. कोलेस्ट्रॉल होतं कमी

  तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपवास केलात तर यामुळे तुमचं वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा तुमच्यापासून अनेक आजाराही दूर होऊ लागतात. लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल हा आजारही येतो. कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ हा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. तसंच यामुळे तुमच्या हृदयावरही परिणाम होत असतो. पण तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास केलात तर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणं सोपं होतं. उपवासाच्या वेळी एचडीएल अर्थात चांगल्या कॉलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते.

  6. त्वचा होते अधिक सुंदर

  त्वचा होते अधिक सुंदर - Benefits Of Fasting In Marathi

  बऱ्याचदा क्रिम आणि इतर सौंदर्यप्रसाधनं नाहीत तर तुमच्या खाण्यातील बदलानेही त्वचा अधिक सुंदर होते. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण आणा असं नेहमी सांगण्यात येतं. जास्त तेल आणि मसाल्याचं खाणं तुम्ही खाल्ल्यास, तुम्हाला चेहऱ्यावर अधिक त्रास होतो त्याचा परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स येणं आणि काळे डाग निर्माण होणं हादेखील होतो. उपवास ठेवल्याने तुमचं शरीर डिटॉक्झिफाय होतं आणि त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम तुमची त्वचा अधिक चमकदार आणि चांगली होण्यावर होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात तेव्हा त्वचा अधिक चमकदार होते. तसंच उपवासामध्ये तुम्ही अधिक पौष्टिक खाता आणि फळांवर अथवा फळांच्या रसावर भर देता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली होते. फळांचा रस पिणं हे अतिशय शुद्ध असून त्वचेवर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो.

  7. मानसिक आणि भावनात्मक लाभासाठी उपवास

  उपवासाचा परिणाम हा केवळ शारीरिक आरोग्यावर होतो असं नाही, त्याचा मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. उपवास करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता लागते. तुमच्या एकाग्रतेवर चांगला परिणाम होऊन कामात अधिक लक्षही लागतं. सुस्ती कमी होते. कामाकडे लक्ष केंद्रित करता येतं. तसंच सतत चिंता आणि तणाव असेल ज्यामुळे झोप येत नसेल तर उपवासाने आणि उपवासात योग्य खाण्याने तुम्हाला चांगली झोपही येते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी जर झेपत असेल तर शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास करणं चांगलं आहे. 

  8. उपवासाने वय वाढतं

  आपण सतत काही ना काहीतर चुकीचे अन्नपदार्थ पोटात घालवत राहतो. त्याचा परिणाम  शरीरावर होऊन अनेक आजार निर्माण होतात. पण हे थांवबण्यासाठी आणि शरीराचं पचन आणि शरीराचं तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण उपवास करायला हवा. त्यामुळे तुमचं वय वाढतं. योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुमचं वय निश्चितच वाढतं. कारण उपवासाच्या वेळी आपण शरीराला आवश्यक तितकाच आहार घेतो. अरबट चरबट खात नाही. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

  9. मेटाबॉलिजममध्ये होते वाढ

  उपवास म्हटलं की, आपण कधीही जास्त खात नाही. सहसा खाणं टाळतो. केवळ फळं आणि फळांचा रस अथवा तत्सम पदार्थांवर लक्ष देत असतो. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होऊन तुमच्या मेटाबॉलिजममध्येदेखील वाढ होते. तुमची शारीरिक ऊर्जा योग्य प्रमाणात राखून अतिरिक्त टॉक्झिन्स शरीरातून बाहेर फेकले जातात. त्यामुळेच शरीरामध्ये मेटाबॉलिजम वाढतं. 

  आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे 'आरोग्यदायी पदार्थ'

  10. प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ

  कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. उपवासाचा हा एक फायदा होतो तो म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. उपवास केल्याने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर फेकली जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही योग्य स्वरूपात उपवास करायला हवा. उपवास करायचा म्हणजे दिवसभर केवळ पाण्यावर राहायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा असा अर्थ होत नाही. नियमित काही तासांनी फळं खाऊन अथवा पाणी पिऊन त्याप्रमाणे उपवास केल्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

  11. पिंपल्सपासून मिळते सुटका (Reduces Pimples)

  पिंपल्सपासून मिळते सुटका - Benefits Of Fasting In Marathi

  उपवासाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात हे तर तुम्हाला आतापर्यंत कळलंच आहे. त्याता सर्वात जास्त परिणाम हा चेहऱ्यावर पिंपल्स येण्यात होत असतो. पण तुम्ही नियमितपणे उपवास केलात आणि खाण्यापिण्याचं योग्य प्रमाण पाळून तिखट आणि तेलकट पदार्थ कमी केलेत तर तुम्हाला नक्कीच पिंपल्सपासून सुटका मिळते. उपवासाने हा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. त्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक येण्यासाठीही उपवास फायदेशीर ठरतो.

  12. हृदयासाठी अप्रितम

  हृदयासाठी अप्रितम - Fasting In Marathi

  सतत खात राहण्याने कॉलेस्ट्रॉल वाढतं आणि त्याचा थेट परिणाम होतो तो हृदयावर. पण तुम्हाला हृदयरोगांपासून दूर राहायचं असेल तर तुम्ही योग्यरित्या उपवास करायला हवा. तुमच्या हृदयावर कोणताही दाब न येता अनेक समस्यांपासून  तुम्ही दूर राहू शकता. उपवासामध्ये तुम्ही केवळ जलपदार्थ अथवा केवळ शरीराला आवश्यक आहेत तेच पदार्थ खाता. त्यामुळे हृदयात कॉलेस्ट्रॉलचा धोकाही टळतो. तसंच हृदयासाठी उपवास करणं चांगलं ठरू शकतकं.

  उपवासाच्या वेळी काय खायला हवं ? (What To Eat During Fasting In Marathi)

  Eat During Fasting In Marathi

  तुम्ही कोणत्या प्रकारचा उपवास करत आहात त्यानुसार तुम्ही काय खायला हवं ते अवलंबून आहे. आम्ही तुम्हाला इथे काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत सांगणार आहोत ज्याचं सेवन उपवासादरम्यान तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. ज्यामुळे उपवासादरम्यान तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तुम्ही पहिल्यांदाच उपवास करणार असाल तर तुम्ही आंशिक उपवासापासून सुरूवात करा. यामध्ये तुम्हाला काही वेळेसाठी काही अन्नपदार्थांपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. या वेळेत तुम्ही फळ, फळांचा रस अथवा हल्केफुल्के पदार्थ खा. ज्याप्रमाणे - 

  • उपवासादरम्यान तळलेले पदार्थ सेवन करू नका
  • रसदार फळांचं सेवन करा
  • तुम्ही नेहमी ड्रायफ्रूट्सचं सेवन करा
  • दूध प्या
  • फळांचा रस तुम्ही प्या
  • तुम्ही मीठ खाणार नसलात तर तुम्ही हिरव्या भाज्या मीठाशिवाय उकडवून खा

  तुम्ही निर्जला उपवास करत असाल तर तुम्ही दूध पिऊ शकता. तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही कॉफी अथवा चहा पिऊ शकता. मात्र असं करत असल्यास, एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला जर अॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफी पिऊ नका

  नोट - तुम्हाला वर जे पदार्थ सांगण्यात आले आहेत ते उपवास करणाऱ्या व्यक्तीनुसार बदलू शकता. हे  तुम्हाला पर्यायी पदार्थ म्हणून आम्ही सांगितले आहेत. 

  उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

  उपवासादरम्यान तुम्ही काय टाळायला हवं (What To Avoid During Fasting In Marathi)

  तुम्ही उपवास हा तुमच्या आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी करणार असता. त्यामुळे काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला उपवासाच्या दरम्यान टाळायला हव्यात. 

  • उपवासापूर्वी तुम्ही तुमच्या मनाची आणि शरीराची योग्य तयारी करा. वजन कमी करण्यासाठी उपवास करणं आणि धार्मिक उपवास करण्यामध्ये खूपच अंतर असतं. दोन्हीसाठी तुम्हाला तुमचं मन आणि शरीर तयार करावं लागतं. तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीसाठी उपवास करणार आहात हे तुमच्या मनात निश्चित करून घ्या. उपवास करताना तुमच्या रोजच्या कामातही काही फरक पडू शकतो याकडे नीट लक्ष द्या. 
  • तुम्ही पहिल्यांदाच उपवास करत असाल तर तुम्ही वेळ कमी ठेवा. जास्त वेळेसाठी तुम्ही लगेच उपवास करू नका
  • उपवास करण्यापूर्वी तुम्ही योग्य आणि पौष्टिक जेवण करा. जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दरम्यान कोणताही त्रास होणार नाही. लक्षात ठेवा की, एकाच वेळी जास्त खाऊ नका. या जेवणात तुम्ही उपवासाचे थालीपीठदेखील खाऊ शकता.
  • उपवासाच्या दरम्यान जास्त कठीण व्यायाम अथवा जास्त वेळ व्यायाम करू नका कारण या दरम्यान तुमच्या शरीराला अधिक एनर्जीची गरज असते आणि व्यायाम केल्यास, अधिक ऊर्जा जाते. त्यामुळे तुम्हाला अधिक थकवा येण्याची शक्यता निर्माण होते. 
  • तुम्हाला जर आरोग्यासंबंधी काही समस्या असतील अथवा कोणत्याही प्रकारचं औषध तुम्ही घेत असलात तर उपवास करणं टाळा
  • उपवासादरम्यान पोष्टीक गोष्टींचं सेवन जास्त करा - उदाहरणार्थ - फळ, फळांचा रस, दूध इत्यादी
  • उपवासानंतर खूप भूक लागणं साहजिक आहे. पण अशावेळी उपवास सोडताना अति आहार घेणं शक्यतो टाळा. संतुलित प्रमाणात तुम्ही आहार घ्या

  उपवास केल्याने काय होतं नुकसान (Side Effects Of Fasting In Marathi)

  तुम्हाला उपवासाने होणारे फायदे तर कळलेच आहेत. पण उपवासाचे काही तोटेही आहेत. आपण त्याबद्दलही जाणून घेऊया - 

  • तुम्ही उपवासादरम्यान योग्य पौष्टिक तत्वयुक्त खाद्यपदार्थांचं सेवन न केल्यास, तुम्हाला डिहायड्रेशन,  चक्कर आणि थकव्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात
  • तुम्हाला जास्त कालावधीसाठी उपवास करायचा असल्यास, तुम्हाला एनिमिया होण्याची शक्यता असते
  • उपवासानंतर तुम्ही जर लगेच खाल्लं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्या निर्माण होऊन त्रास होतो
  • काही लोकांना उपाशी राहिल्यास भूक सहन होत नाही आणि चिडचिडेपणा वाढतो अथवा रागाचं प्रमाण वाढतं
  • जास्त काळ उपाशी राहिल्यास डोकेदुखी अथवा अन्य काही आजार होण्याची शक्यता असते

  उपवासाचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. तोट्यांपेक्षा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जास्त फायदा होतो. पण तुम्ही जास्त काळासाठी उपवास करू नये हा सल्लादेखील आम्ही तुम्हाला नक्कीच देत आहोत. कारण याचा तुमच्या शरीरावर अधिक वाईट परिणाम होऊ शकतो. उपवासाचे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात पाणी,  ज्युस आणि फळांचं सेवन कराल. 

  नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी

  प्रश्नोत्तरं (FAQ's)

  1. उपवास करण्याचं काही विशिष्ट वय आहे का?

  नक्कीच उपवास करण्याचं एक विशिष्ट वय आहे. तुम्ही साधारण 12 वर्षांनंतर उपवास करू शकता. तोपर्यंत तुमचं शरीर भूक थांबवण्यासाठी तयार झालेलं असतं. पण तरीही तुम्हाला हे वय कमी वाटत असेल तर साधारण पंधरा वर्षानंतर तुम्ही उपवास करू शकता. 

  2. उपवासाने खरंच वजन कमी होतं का?

  उपवासाने वजन कमी होतं. पण तुम्ही काही काही वेळाने योग्य खात राहायला हवं. उपवासाच्या वेळी तुम्ही फळं आणि फळांच्या रसावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं. जेणेकरून तुमच्या शरीरात योग्य ऊर्जा राहील.

  3. उपवास करणं कितपत गरजेचं आहे ?

  तुम्ही जर सतत काही ना काही खात असाल आणि तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकणं तुम्हाला गरजेचं वाटत असेल तर नक्कीच हे उपवासाने घडू शकतं. त्यामुळे तुम्ही किमान आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी हा उपाय नक्कीच करू शकता. 

  खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

  मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.