गाढ झोप हवी आहे का, रात्री 'या' 5 अन्नपदार्थांचं करा सेवन

गाढ झोप हवी आहे का, रात्री 'या' 5 अन्नपदार्थांचं करा सेवन

झोपच पूर्ण झाली नाही यार…! हे वाक्य नेहमीच आपल्या कानावर येत असते. प्रत्येकालाच रात्रीची गाढ झोप हवी असते. पण ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे झोप काही पूर्ण होत नाही. झोपण्यापूर्वी नेमकं काय खावे आणि काय खाऊ नये? यासंदर्भात भलमोठं प्रश्नचिन्ह बहुतांश जणांसमोर असतंच. साधारणतः झोपण्यापूर्वी काहीही न खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. खाण्यापिण्यामुळे झोपेत विघ्न येऊ नये, हे त्यामागील मुख्य कारण आहे. दिवसभराचा थकवा, धावपळ यानंतर रात्री गाढ झोप यावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. बऱ्याचदा कितीही काहीही केल्यास गाढ झोपेचा प्रयत्न अयशस्वीच ठरतो. बऱ्याचदा ताणतणाव नसतो, एखादी समस्यादेखील नसते तरीही पुरेशी झोप न मिळण्याचं कारण कितीही शोधून सापडत नाही. पण कित्येकदा आपल्या आहारामुळेच झोपेवर दुष्परिणाम होत असतात. रात्रीच्या जेवणात तुम्ही कोणकोणत्या अन्नपदार्थांचा समावेश केला आहे, यावर तुमची गाढ झोप अवलंबून असते. चांगली झोप येण्यासाठी रात्री नेमक्या कोणत्या गोष्टींचं सेवन करावं हे आपण जाणून घेऊया.

(वाचा : सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग 'हा' आजार घेईल तुमचा जीव)

गाढ झोपेसाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश

1. झोपण्यापूर्वी केळे खा
एका केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्समुळे ट्रिप्टोफेनची निर्मित होण्यास मदत होते, यामुळे चांगली झोपदेखील येते. याशिवाय केळ्यामध्ये मॅग्नेशिअम देखील मुबलक प्रमाणात असतं. यामुळे स्नायू आणि धमण्यांना आराम मिळतो.

2. एक ग्लास दूध
झोपण्यापूर्वी दूध पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. आयुर्वेदनुसार देखील दिवसाचा शेवट एक ग्लास गरम दूध पिऊन करावा, आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असते. यामुळे मेंदू शांत होतो. एवढचं नाही तर दुधामध्ये प्रचंड प्रमाणाक कॅल्शि‍अम असतं, ज्यामुळे झोपेवर शक्यतो परिणाम होत नाही.

(वाचा : गर्लफ्रेंडच्या 'या' इच्छा तुम्ही करता का पूर्ण, असं करा तिला खूश)

3. मध
गाढ झोपेसाठी उत्तम पर्याय म्हणजे मधाचं सेवन करणं. मधाचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. मध्यामध्ये अँटी बॅक्टिरिअल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडेंट्सचं भरपूर प्रमाण असतं. मध देखील ट्रिप्टोफेनच्या निर्मितीचं चांगलं काम करते.

4. बदाम
बदामामध्ये फॅट्स, अमिनो अॅसिड आणि मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण असते. चांगली झोप येण्यासाठी हा एक प्रभावी पर्याय आहे. जर गाढ झोपेत एखाद्या कारणामुळे अडथळा येत असेल तर झोपण्यापूर्वी बदाम खा. यामुळे लवकर झोप येण्यास मदत मिळते आणि गाढ झोप देखील येते. तुम्हाला आवडत असल्यास बदाम, मध एकत्रित करून तुम्ही एक ग्लास गरम दूध देखील पिऊ शकता.

5. दलिया
दलिया हे शरीरासाठी पोषक असा आहार आहे. पचनास हलका असल्यानं पचनक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी दलिया अवश्य खावा. दूध, मध, केळ किंवा बदामाचाही दलियामध्ये समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला चांगली झोप येणार, हे नक्कीच. महत्त्वाचे म्हणजे झोपण्यापूर्वी मसालेयुक्त, कॅफिनयुक्त, चरबीयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळावं. कारण अशा पदार्थांमुळे झोपेवर वाईट परिणाम होतो.

(वाचा : पार्टनरचा हात पकडून चालण्याचे 'हे' हेल्दी फायदे आहेत माहिती)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा :

मित्रमंडळीसाठी गुड नाईट मेसेज (Good Night Messages In Marathi For Friend)