तुम्हाला त्वचेच्या समस्या सतावत असतील आणि तुम्ही डॉक्टरचे इलाज करुन थकला असाल तर तुमच्यासाठी आम्ही महिन्याभराचे एक छान रुटीन तयार केले आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम कमी होतील.शिवाय तुमच्या त्वचेला चांगला ग्लो येईल. तुमच्याप्रमाणे मलाही त्वचेच्या समस्या होत्या. पिलींग, फेशियल, ग्लो ट्रिटमेंट करुन मलाही कंटाळा आला होतो. तेव्हा थोडा विचार करुन मी माझे काही स्कीन रुटीन सेट केले ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखून तुमच्यासाठी चांगला फेसवॉश निवडा. जर तुम्हाला कोणता फेशवॉश घ्यायचा हे कळत नसेल तर तुम्ही मेडीकलमध्ये जाऊन थोडी मदत घ्या.cethapil नावाचे एक क्लिन्झर सध्या खूप चांगले आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला हे क्लिनझर मिळू शकते. या शिवाय तुम्हाला जर काया स्किन्सचे प्रोडक्ट चालत असतील तर त्यांचा व्हाईनिंग ब्लीड क्लिनझर तुम्ही वापरु शकता.
तुमच्या आवडीचे क्लिनझर निवडल्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्री सगळ्या गोष्टी आवरुन झाल्यानंतर झोपताना चेहरा धुवायचा आहे. (या व्यतिरिक्त तुम्हाला चेहरा धुवायचा असेल तर तुम्ही फक्त पाण्याचा वापर करा.
काही जणांना मेकअप काढण्यापेक्षा थेट चेहरा धुण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही मेकअप क्लिनझर वापरा. हल्ली क्रिम आणि लिक्वीडमध्ये क्लिनझर मिळतता. तुम्ही जास्त तेल असलेला क्लिनझर निवडू नका. क्लिनझर वापरल्यानंतर चेहरा धुवू नका असे सांगितले जाते. पण क्लिनझरमध्ये केमिकल्स असतात तुम्ही ते चेहऱ्यावरुन काढून टाकणे गरजेचे असते.
आठवड्यातून किमान दोनवेळा तरी तुम्ही तुमचा चेहरा स्क्रब करायला विसरु नका. स्क्रब निवडताना तुम्ही माईल्ड स्क्रबची निवड करा. तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्समध्ये शिरलेली माती काढण्यासाठी तुम्हाला स्क्रबची गरज असते. हे स्क्रब तुम्ही रात्रीच्या वेळी करा. कारण त्यानंतर धुळीमध्ये जाण्याची शक्यता कमी असते.
लग्नाचा सीझन आला, नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर *ग्लो* (Tips For Glowing Skin In Marathi)
तुम्हाला फेशिअलची भीती वाटत असेल तर तुम्ही घरी मास्कशीट घेऊन या. चेहरा चांगला क्लिन्स करुन चेहऱ्याला वाफ घ्या. वाफ घेण्यासाठी जे पाणी वापरत असाल त्यात लिंबाच्या चकत्या घाला. लिंबांमधील घटक तुमच्या त्वचेच्या आतपर्यंत जाऊन तुमची त्वचा स्वच्छ करतात. शिवाय व्हिटॅमिन C तुमच्या त्वचेला हायड्रेट करतात. साधारण 5 मिनिटे वाफ घेऊन तुम्ही चेहरा पुसून त्यावर शीस्ट मास्क लावले तरी चालेल. असे तुम्ही आठवड्यातून एकदाच करा.
जर तुम्हाला पिंपल्स असतील तर ते फोडू नका. अनेक चांगल्या ब्रँडचे स्पॉट करेक्टर मिळतात. मी Bodyshop चा टी ट्री ऑईल करेक्टर वापरते. ते लावायला आणि सोबत कॅरी करायलाही फार सोपे आहे. तुम्ही ते बॅगमध्ये कॅरी करु शकता. तुम्हाला पिंपल्स आले असे वाटत असेल तेव्हा तुम्ही ते लावू शकता.
घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावायला विसरु नका. चेहऱ्यासोबत तुमच्या हातांना आणि पायालाही सनस्क्रीन लावा. आंघोळीनंतर तुम्ही मॉश्चरायझर लावायला विसरु नका. मी या दोन गोष्टी लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.
चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर चालू शकतील .पण तुमचा चेहरा कायम फ्रेश आणि हायड्रेटींग दिसणे गरजेचे असते. साधारण महिनाभर तुम्ही या गोष्टी ट्राय करा. नित्यनेमाने त्वचेची काळजी घ्या. तुम्हाला फरक नक्की जाणवेल.