मुलींच्या 'या' पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’

मुलींच्या 'या' पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’

एखाद्या तरुणीला तुम्ही मनापासून पसंत करत आहात, तिच्यावर जिवापाड प्रेम करत आहात आणि दररोज नवनवीन बहाण्यांच्या माध्यमातून तिच्यापर्यंत भावना पोहोचवण्याचे तुमचे प्रयत्न सुरूदेखील असतील. पण ती तरुणी तुमच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतेय, तिच्या मनात नेमकं काय? हे तुम्ही तपासून पाहिलंय का. तुमच्या शेकडो प्रयत्नानंतरही तिचं मन ओळखण्यात अपयश येत असेल तर आम्ही तुम्हाला दिलेली ही माहिती संपूर्ण वाचा. तुमच्या प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नांना तरुणी वेगळ्या पद्धतीनं उत्तर देत असेल तर समजून घ्या की तिच्या आयुष्यात तुमची एंट्री होण्याची संधी नाही आणि ती तुमची कधीच होऊ शकत नाही. मुलींच्या काही खास गोष्टी असतात त्यांच्याकडे योग्य पद्धतीनं लक्ष देणं आवश्यक आहे. 

जाणून घेऊया या खास गोष्टी :

‘आता रिलेशनशिपसाठी माझी मानसिक तयारी नाही’

कोणत्याही प्रकारच्या रिलेशनशिपसाठी सध्या मनाची  तयारी नाही, असं उत्तर एखाद्या मुलीकडून तुम्हाला मिळाल्यास तिला तुमच्यासोबत प्रेमसंबंध स्थापित करायचे नाहीत. कोणतीही वळणं न घेता ती तुम्हाला स्पष्ट शब्दांत नकार देते. त्यामुळे तिच्याही भावनांचा स्वीकार करा. 

(वाचा : सजना है मुझे! 'व्हॅलेंटाइन डे'साठी सुंदर दिसायचंय, हे ड्रेस करा परिधान)

‘मला असं वाटतं की मला स्वतःकडे अधिक लक्ष द्यायला हवं’

आता मला एखाद्या रिलेशनशिपपेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष देणे महत्त्वाचे वाटतं, असं एखादी मुलगी तुम्हाला सांगते तेव्हा याचा अर्थ असा होतो की, तिला तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा सिंगल राहणं अधिक पसंत आहे.

(वाचा : गरम पाणी पिणाऱ्यांनो वेळीच व्हा सावध, तुमचं आरोग्य आहे धोक्यात)

‘मी तुझ्याकडे त्या नजरेनं पाहत नाही’

प्रत्येक मुलगी ही ओळ बहुतांश वेळा कोणाला-न्-कोणाला तरी ऐकवतेच. तुम्हाला देखील तुमच्या एखाद्या मैत्रिप्रती स्वतःच्या प्रेमभावना व्यक्त केल्या असतील. पण तिच्या मनातही तुमच्यासाठी तशाच भावना असतील, या गैरसमजुतीत राहू नका. मी तुझ्याकडे मित्रापलिकडे कोणत्याही नजरेनं पाहत नाही, असे तिनं सांगितल्यास यातून योग्य मेसेज घ्या. म्हणजे तिला तुमच्याकडून स्वच्छ मैत्री व्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा नाही.  

(वाचा : त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

'मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे, कदाचित नंतर कधीतरी...'

एखाद्या तरुणीला तुमच्यासोबत नवीन नाते नको असतं, तेव्हा ती असं उत्तर तुम्हाला देते. पण जोपर्यंत तुम्ही तिला स्पेशल ट्रिटमेंट देत नाही किंवा तिच्यासाठी विशेष असं काही करत नाही, तोपर्यंत हे नाते तिला गमवायचंदेखील नसते.

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

'माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे'

तुम्हाला आवडत असलेली तरुणी सिंगल आहे, तुम्हाला माहिती आहे. पण तरीही ती तुम्हाला नकार देत असेल तर तुम्ही तिच्याकडे पुन्हा रिलेशनशिपसाठी मागणी करू नये, अशी भावना तिच्या मनात असते.  त्यामुळे तिच्याकडे पुन्हा हा विशष न काढल्यासच बरे.

हे देखील वाचा :

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.