ADVERTISEMENT
home / Diet
Home Remedies For Ulcer In Marathi

अल्सरवर करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Ulcer In Marathi)

बदलेल्या लाईफस्टाईलचा परिणाम आपल्या आरोग्यावर बऱ्याच प्रमाणात झाला आहे. आपण काय खातो? दिवसभर काय करतो ? आपल्यावर कामाचा ताण किती ? या सगळ्यावर हल्ली आपले आरोग्य अवलंबून आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर आधारीत असलेला एक भयंकर आणि त्रासदायक आजार म्हणजे ‘अल्सर’ तुम्हालाही अल्सरचा त्रास असेल तर आज आम्ही तुम्हाला अल्सरबद्दल माहिती देणार आहोत. शिवाय अल्सरवर तुम्हाला काय घरगुती इलाज करता येतील ते देखील सांगणार आहोत. मग करुया सुरुवात.

अल्सर म्हणजे काय (What Is Ulcer)

आता अल्सरबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसेल तर आधी अल्सर म्हणजे काय ते जाणून घेणे फारच गरजेचे आहे.  अल्सर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक प्रकारची जखम.. जी तुम्हाला सतत दुखत राहते. आता वेगवेगळ्या भागांमध्ये ही जखम होते. त्यानुसार त्या अल्सरच्या प्रकाराला नावे दिलेली आहेत. सर्वसाधारणपणे अल्सर हा मुखावाटे सुरु होतो आणि तो तुमच्या आतड्यांपर्यंत पसरतो. पचनसंस्थेतील कुठल्याही भागात तुम्हाला अल्सर होऊ शकतो. शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढले की, मग हा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते. 

अल्सरचे प्रकार (Types Of Ulcer)

Types Of Ulcer
Shutterstock

अल्सर ही एकप्रकारे शरीरात होणारी अंतर्गत जखम असून ती जिथे होते. त्यानुसार तिचे प्रकार मानले जातात .सर्वसाधारणपणे अल्सरचे तीन प्रकार आहेत. अल्सरच्या या प्रकारांविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया. म्हणजे तुम्हाला नेमका कोणत्या प्रकाराच्या अल्सरचा त्रास झाला आहे ते कळेल.

1. गॅस्ट्रीक अल्सर (Gastric Ulcers)

पोटाशी निगडीत असलेल्या अल्सरला गॅस्ट्रीक अल्सर असे म्हणतात. या अल्सरमध्ये तुम्हाला पोटदुखीचा त्रास होतो. H. Pylori मध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे हा अल्सरचा प्रकार होऊ शकतो. जर तुम्ही अॅस्परीन असलेल्या औषधांचे सेवन करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा अल्सर होण्याची शक्यता अधिक असते.  ताण-तणाव आणि तेलकट पदार्थांमुळे तुम्हाला हा अल्सर होत नाही पण या पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या या त्रासामध्ये नक्कीच त्रास होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

2. डुओडिनल अल्सर (Duodenal Ulcers)

तुमच्या छोट्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जखमेला डुओडिनल अल्सर असे म्हणतात. तुमच्या छोट्या आतड्यांमध्ये एक प्रकारची सूज येते त्याच्या आतल्या भागात फोड येते.  जर तुम्हाला हा अल्सर झाला असेल तर तुम्हाला जेवल्यानंतर पोटात जळजळ जाणवू लागते. काही थंड पदार्थांचे सेवन केल्यानंतर तुम्हाला तात्पुरता थंडावा मिळू शकतो. पण त्याची दाहकता तुम्हाला जास्त वेळ जाणवत राहते.

3. इसोपजेनेल अल्सर (Esophageal Ulcers)

इसोपजेनेल अल्सर तुम्हाला घशाकडे होतो. या अल्सरकडे दुर्लक्ष करणे अजिबात चांगले नाहीत. कारण अल्सरचा हा त्रास तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे या अल्सरकडे दुर्लक्ष करु नका. या अल्सरच्या प्रकारात तुम्हाला घशाकडे फोड येतात किंवा तुम्हाला आवंठा गिळताना सुद्धा त्रास होतो (टॉन्सिलप्रमाणे नाही). या प्रकारच्या अल्सरमध्ये तुम्हाला सतत मळमळल्यासारखे, उल्टी होणे, खोकला येणे असे काही त्रास होतात. 

वाचा – फिश ऑईलचे गुणकारी फायदे

अल्सरची कारणं (Causes Of Ulcers)

अल्सर होण्याची काही कारणं सुद्धा आहेत. तुमच्या आहाराच्या पद्धती, तुमच्या लाईफस्टाईलमुळे अल्सरचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते जाणून घेऊया अल्सर होण्यामागची कारणे

ADVERTISEMENT

1. तिखट आणि तेलकट पदार्थ (Spicy And Oily Food)

Spicy and Oily Food
Shutterstock

काही जणांचा आहार हा फारच तिखट असतो. त्यांना लाल तिखट हात सैल सोडून टाकायची सवय असते. इतका जाळ करुन पदार्थ खातात की, समोरच्यालाही भीती वाटते. पण असे पदार्थ खाण्याची सवय तुम्हाला अल्सरचा त्रास देऊ शकते. तुम्हाला तोंडाचा आणि पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. तिखट पदार्थांसोबतच तेलकट पदार्थ खाणेही तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. कारण त्यामुळेही तुम्हाला अल्सर होण्याची शक्यता असते.

2. ताण-तणाव (Stress)

अतिरिक्त ताणामुळे देखील तुम्हाला अल्सरचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचे स्वरुप आणि ताण-तणाव यांचा परिणाम देखील होतो. जेवणाच्या चुकीच्या वेळा आणि खाण्याचे चुकीचे पदार्थ त्यामुळे तुमचे अन्न पचत नाही आणि तुम्हाला अल्सरचा त्रास होतो.

वाचा – ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात चिंचेची पानं

3. औषधांचा वापर (Long Term Intake Of Medicine)

Medicine
Shutterstock

काही जणांना डॉक्टरांनी दिलेली औषध ही उष्ण पडतात. अशा औषधांमुळेही तोंड फुटण्याची शक्यता असते. तुम्ही जर जास्त कालावधीसाठी औषधं घेत असाल तर तुम्हाला अल्सरचा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी तुमच्या तोंडाला सतत जखमा होत राहतात. ओठांच्या कडा फुटणे, सतत रक्तस्राव होणे असा त्रास तुम्हाला होऊ लागतो. त्यामुळे औषधांचे सेवनही तुम्हाला त्रासदायक ठरु शकते.

ADVERTISEMENT

4. अॅसिडीटी (Hyper Acidity)

चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आणि चुकीच्या वेळी जेवण केल्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीचा अनेकांना त्रास होतो. ही अॅसिडीटी जास्त झाली की, त्याचा परिणाम तुम्हाला अल्सर होण्याची शक्यता असते. जर तुम्ही तुमच्या अॅसिडीटीकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. परिणामी तुम्हाला अल्सर म्हणजेच छाले किंवा जखम होऊ शकते.त्यामुळे तुम्ही तुमच्या अॅसिडीटीकडे दुर्लक्ष करु नका.

5. धूम्रपान आणि मद्यपान (Smoking & Drinking)

Smoking & Drinking
Shutterstock

जर तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपान करत असाल तर तुम्हाला तुम्हाला देखील अल्सर होण्याची शक्यता अधिक आहे. धूम्रपान म्हणजे तंबाखू आणि त्यातही तुम्ही तो जाळून शरीरात घेता त्यामुळे तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपान केल्यानंतर तुम्हाला अल्सरचा त्रास होऊ शकतो.

अल्सरवर घरगुती उपाय (Home Remedies For Ulcers In Marathi)

अल्सरचे तीन प्रकार आणि कारणं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जर अल्सरवर काही घरगुती उपाय माहीत करुन घ्यायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही सोपे आणि परिणामकारक असे उपाय आहेत. पण अल्सरमध्ये आराम पडण्यासाठी तुम्ही या उपयांचा अवलंब करु शकता.

1. ब्रिटन राईस (Britain Rice)

जर तुम्हाला भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही अल्सर झाल्यानंतरही भाताचे सेवन करु  शकता यावर ब्रिटन किंवा ब्राऊन राईस चांगला मानला जातो. पण जर तुम्हाला हा तांदूळ उपलब्ध नसेल तर तुम्ही साधा पांढरा भात खााऊ शकता. त्यात मस्त तूप घालून खाल्ले तरी तुम्हाला चालू शकेल. 

ADVERTISEMENT

2. केळं आणि मधाचे चूर्ण (Banana And Honey Churna)

Banana and Honey Churna
Shutterstock

केळं हे अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. एक पिकलेलं केळ कुस्करुन त्यात साधारण एक चमचाभर मध घाला आणि हे चूर्ण किंवा चाटण तुम्ही खा. तुम्हाला नक्कीच यामुळे आराम पडेल. मध हे उष्षण असले तरी केळ्यासोबतच्या सेवनामुळे त्याचा फायदाच होतो.

3. गाजर आणि फ्लॉवरचा रस (Carrot And Cauliflower Juice)

गाजराचा आणि फ्लॉवरचा रस पिण्याचा सल्ला देखील अल्सर झाल्यावर दिला जातो. कारण फ्लॉवरमध्ये असलेले सल्फोराफेनचे घटक अल्सरला दूर ठेवतात. तर गाजरामधील व्हिटॅमिन E असते. तुमच्या पोटातील जळजळ कमी करण्याचे काम गाजराचा रस करते. त्यामुळे तुम्ही याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही.

4. गायीचे तूप (Cow Ghee)

Cow Ghee
Shutterstock

गायीचे तूप हे अनेक आजारांवर गुणकारी आहे. गायीच्या तूपामुळे तुम्हाला लागलीच थंडावा मिळू शकतो. अल्सरच्या कोणत्याही प्रकारात तुम्हाला थंडावा हवा असेल तर तुम्ही अशावेळी दिवसातून किमान दोन चमचे तरी तुपाचे सेवन करावे तूपाच्या सेवनामुळे तुमच्या पोटांना तुमच्या आतड्यांना खंडावा मिळतो. तुम्हाला तूप आवडत नसेल तरी सुद्धा तुम्ही अल्सरचा त्रास कमी करण्यासाठी दोन चमचे तरी तूपाचे सेवन करावे.

5. शेवगाच्या शेंगा (Drum Stick)

अल्सरचा त्रास असल्यास शेवग्याच्या शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही कोणत्याही स्वरुपात त्याचे सेवन करु शकता. शेवग्यांच्या शेंगामध्ये जखम भरुन काढण्याची क्षमता असते. अल्सरमुळे तुमच्या आतड्यांना झालेल्या अंतर्गत जखमा भरुन निघायला मदत मिळते.

ADVERTISEMENT

6. बदाम (Almond)

Almond
Shutterstock

तुम्हाला डुओडिनल स्वरुपातील अल्सरचा त्रास झाला असेल तर तुम्हाला बदामाचे सेवन करणे योग्य ठरु शकते. बदाम तुम्ही कोणत्याही स्वरुपात खाऊ शकता. फक्त खारे बदाम खाऊ नका. कारण त्यामध्ये मीठ जास्त असते. बदामामुळे तुमच्या पोटातील जळजळ कमी होते.

7. मक्के दी रोटी (Maka Roti)

Maka Roti
Shutterstock

मक्याचे भरपूर फायदे आहेत. त्यातच मक्यापासून बनवला जाणारा रोटीचा एक प्रकार म्हणजे मक्के दी रोटी हा प्रकारही तुम्हाला पोटाचा अल्सर झाला असेल तर खाता येईल. मक्के दी रोटी आणि दही तुम्ही खाल्ले तर तुम्हाला नक्कीच आराम पडेल.

8. कढी (Kadhi)

Kadhi
Shutterstock

दह्यात बेसन घालून केलेली कढी देखील तुमच्या पोटाची जळजळ कमी करते. त्यामुळे तुम्ही कढीचे सेवन करणे आवश्यक असते. तुम्ही कढीसोबत भात किंवा पोळी असे पदार्थ खाऊ शकता

9. फळं (Fruits Intake)

तुम्ही जितकं फळं खालं तितकी ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली असतात. अल्सरच्या रुग्णांनाही फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. पाणीदार असलेली फळं तुम्ही आरामात खावू शकता. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक फळांचे सेवन करायला विसरु नका. 

ADVERTISEMENT

10. आलं (Ginger)

Ginger
Shutterstock

अल्सरसाठी तुम्हाला आलं खाण्याचा सल्ला दिला जातो. आता आलं उष्ण आहे. मग त्याचे सेवन कसे काय करुन चालेल असे तुम्हाला वाटत असेल तर अनेकदा अल्सर झाल्यानंतर बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होऊ लागतो. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आल्याचे सेवन करा असे सांगितले जाते. 

11. हळद (Turmeric)

हळद अँटीसेप्टीक आहे. अल्सर ही एक प्रकारची जखमच आहे. त्यामुळे तुम्ही छान दूधात हळद घालून पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला हळदीचे सेवन अशापद्धतीने करता येईल आणि तुमच्या अल्सरच्या जखमेला आराम देता येईल.

12. कॅमोमाईल (Chamomile)

Chamomile
Shutterstock

सध्या कॅमोमाईल टी ही सगळ्याच गोष्टींसाठी चांगली आहे असे सांगितले जाते. अनेक जण कॅमोमाईल टीचा उपयोग देखील अल्सरसाठी करतात. कॅमोमाईलची फुलं पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन तुम्ही ते पाणी पिऊ शकता. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

अल्सरवर डॉक्टरी इलाज (Ulcer Treatment In Marathi)

कोणत्याही आजाराचा त्रास तुम्हाला जास्त झाला तर त्यावर तुम्ही योग्यवेळी इलाज करणे आवश्यक असते. अल्सरवर अनेक डॉक्टरी इलाज असून त्यातील काही इलाज आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT
  • अल्सरचा इलाज तुम्ही योग्यवेळी करुन घेतला तर तुम्हाला डॉक्टरांची औषधे घ्यावी लागतात. त्याचा ठराविक दिवसांचा कोर्स असतो. तो पूर्ण करावा लागतो. शिवाय तुम्हाला डॉक्टर काही पथ्यही लिहून देतात. 
  • अल्सरचा त्रास जर जास्त झाला तर त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. पण सगळ्याच अल्सरच्या प्रकारामध्ये हा सल्ला दिला जात नाही. 

तुम्हाला हमखास पडतील हे प्रश्न (FAQ’s)

1. अल्सर बरा होतो का?

अल्सरची लक्षण जाणवल्यानंतर जर घरगुती इलाजाने तो बरा होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे फारच गरजेचे असते. डॉक्टरांच्या इलाजाने तुम्हाला आराम नक्कीच पडू शकेल. शिवाय अल्सरच्या बाबतीत सांगायची गोष्ट अशी की, अल्सर पूर्णपणे बरा होतो.

2. अल्सर झाल्यानंतर कोणते पदार्थ खायला हवेत?

अल्सर झाल्यानंतर तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात. तुम्हाला तेलकट, मसालेदार असे पदार्थ अजिबात खाता येत नाही. तुम्ही या दिवसामध्ये पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करायला हवे. कारण त्यामुळे तुम्हाला थंडावा मिळतो. आता तुम्हाला झालेल्या अल्सरच्या प्रकारानुसार तुम्ही काय खायला हवे ते तुम्हाला सांगितले जाते. त्यामुळे तुम्हाला दिलेले पथ्य तुम्ही पाळलेत तर तुम्हाला आराम मिळू शकेल. 

3. अल्सर झाल्यावर काय पिऊ शकतो?

अल्सरवर आराम मिळावा म्हणून तुम्हाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. अल्सरने पोटाला, तोंडाला थंडावा मिळतो. पण तरीही तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तर तुम्ही फळांचे रस किंवा तत्सम पेय पदार्थ पिऊ शकता.  पण तुम्ही योग्य सल्ला घेऊनच त्याचे सेवन करावे.

15 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT