पायावर पडल्या असतील भेगा तर होतील 4 दिवसात गायब, करा हे उपाय

पायावर पडल्या असतील भेगा तर होतील 4 दिवसात गायब, करा हे उपाय

हिवाळ्यात पायाला भेगा पडणं हे खूपच कॉमन आहे. कामाच्या रगाड्यात मात्र आपण आपली काळजी घ्यायला विसरतो. बऱ्याचदा अनेक महिला आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देतात पण आपल्या हातापायांची काळजी घ्यायला विसरतात. हिवाळ्यामध्ये थंडीचा सर्वात जास्त परिणाम होतो तो आपल्या पायांवर. त्वचा कोरडी होते आणि फाटायला सुरुवात होते. जर तुम्ही यामध्ये स्वतःची काळजी घेतली नाही तर तुमच्या पायाला पडलेल्या भेगांचं रूपांतर हे सूज आणि त्रास अधिक वाढण्यामध्ये होतं. त्यामुळे पायांना भेगा पडल्या तर त्याची वेळीच काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं हे जर माहीत नसेल तर त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. हे उपाय करून तुम्ही 4 दिवसात तुमच्या पायांच्या भेगा घालवू शकता. तुम्हीही या उपायांचा वापर करून घ्या. पायाची काळजी घेण्यासाठी उत्पादने बाजारामध्ये असतात. तुम्ही त्याचा उपयोग करत असाल. पण तरीही बऱ्याचदा उपयोग माहीत असूनही केला जात नाही. त्यामुळे नक्की काय उपाय करायचे ते जाणून घेऊया. 

 

पायांना भेगा का पडतात?

Shutterstock

पायांना नक्की थंडीच्या दिवसात भेगा का पडतात यांचं कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पायांना भेगा पडण्याचं मूळ कारण  आहे ते म्हणजे पायामधील तेलाच्या ग्रंथीमधील तेल निघून जातं आणि त्वचा कोरडी पडू लागते. थंडीच्या दिवसात ही त्वचा अधिक कोरडी होऊ लागते. त्यामुळे थंडी असो वा उष्मा. दोन्ही वेळा आपली पायाची त्वचा आपण मॉईस्चराईज करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हीही तुमच्या पायांच्या भेगांमुळे हैराण असाल तर तुम्ही सोपे घरगुती उपाय नक्की करा. ज्यामुळे तुम्हाला पटकन आराम मिळेल. 

पायांना भेगा पडल्या असतील तर घरगुती उपाय

Shutterstock

पायांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काहीही त्रास घ्यावा लागत नाही आणि तुमची त्वचाही मऊ आणि मुलायम राहाते. 

लिंबाचा रस

Shutterstock

लिंबाच्या रसामुळे तुमची त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम बनते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाय कोमट पाण्यात 5-10 मिनिट्स बुडवून ठेवा. पाण्यामध्ये थोडंसा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर तुम्ही पायांना प्युमिक स्टोनने स्क्रब करा आणि मग धुवा. यामुळे तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येतो. तुम्ही हा उपाय नियमित करत राहायला हवा. 

मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय

कडिलिंबाची पानं

Shutterstock

तुमच्या पायाला भेगा पडल्या असतील तर तुमच्या पायाच्या भेगांवरील संक्रमण दूर करण्यासाठी कडिलिंबाच्या पानांचा उपयोग होतो. कडिलिंबाच्या पानांंसह तुम्ही हळद आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही पाय व्यवस्थित साफ करून घ्या आणि ही पेस्ट लावा. ही पेस्ट सुकेपर्यंत तशीच ठेवा आणि नंतर पाण्याने पाय स्वच्छ करून घ्या. कडिलिंबातील अँटिऑक्सिडंट्स गुणांंमुळे पायांवरील भेगा लगेच भरण्यास याचा उपयोग होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात तुमच्या पायाला जर भेगा पडल्या असतील तर नक्की याचा उपयोग करून घ्या. 

सुंदर टाचा हव्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी 'हा' उपाय जरूर करा

मध

Shutterstock

कोमट पाण्यात मध घालून घ्या आणि ते व्यवस्थित मिसळून घ्या. या पाण्यात तुम्ही पाय घालून ठेवा. साधारण 15-20 मिनिट्सननंतर तुम्ही प्युमिक स्टोनने हलक्या हातांनी स्क्रब करा. पाय धुतल्यानंतर तुम्ही पाय सुकवून घ्या आणि लिंबू, ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचं मिश्रण करून घ्या. हे मिश्रण पायाला लावून तुम्ही मोजे घालून ठेवा. हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केल्यास त्याचा परिणाम तुमच्या पायांवरील फाटलेल्या भेगांवर जास्त चांगला होतो. 

पायांच्या भेगांपासून होतोय त्रास तर, घरच्या घरी करा 'हे' उपाय

नारळ तेल

Shutterstock

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सर्वात पहिले आपल्या भेगा पडलेल्या पायांना नारळाचं तेल लावा आणि मोजे घाला. सकाळी उठल्यानंतर पाय धुवा. असं तुम्ही सतत काही दिवस सतत करत राहिल्यास,  तुमच्या पायांवरील भेगा जाऊन तुमचे पाय मऊ आणि मुलायम होतील आणि पायांवरील कोरडेपणा निघून जाईल. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.