13 डिसेंबर 2019चं राशीफळ,धनु राशीचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता

13 डिसेंबर 2019चं राशीफळ,धनु राशीचा अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता

मेष :  कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो 

कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा करार रद्द होण्याची शक्यता आहे. अनावश्यक धावपळ होऊ  शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

कुंभ : व्यवसायात प्रतिस्पर्धी अधिक राहतील 

व्यवसायात प्रतिस्पर्धी अधिक राहतील. चढ-उताराची परिस्थिती कायम राहील. आर्थिक समस्या असू शकतात. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. नवविवाहित जोडप्याचे नाते अधिक दृढ होईल. 

मीन : अचानक धनलाभाचा योग 

स्वतःच्या मौजमजेसाठी पैसे खर्च कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी अस्वस्थ राहतील. जोडीदाराबरोबर सामाजिक उपक्रम वाढू शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

वृषभ : खांदे-हात दुखीच्या तक्रारी 

खांदे किंवा हात दुखीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमचे मन अस्वस्थ राहील. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. 

मिथुन :नव्या नात्यामुळे मन असेल आनंदित

जोडीदाराच्या भावना समजून घेऊन नात्यातील अडचणी दूर करा. नवीन मित्रमैत्रिणी बनवा.  उधार दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत संस्मरणीय क्षण व्यतित कराल. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

कर्क : शिक्षण-कला क्षेत्रात होईल फायदा  

शिक्षण आणि कला क्षेत्र संबंधित असलेल्या लोकांचा फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. युवकांचे प्रेम प्रसंगांमध्ये मन रमेल. भावनिकरित्या तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

सिंह : खर्च वाढण्याची शक्यता 

आज अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. वाहनाच्या देखभालीमुळे खर्च वाढू शकतो. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. एखाद्या ठिकाणाहून आनंदाची बातमी मिळू शकते. 

कन्या : आरोग्यात सुधारणा होईल

वयोवृद्धांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक यात्रेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. 

तूळ : जोडीदारासोबत वाद वाढण्याची शक्यता 

जोडीदारासोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. अपत्यासंबंधी निराशाजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. उत्पन्न आणि खर्चामध्ये नियंत्रण ठेवा.  धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

वृश्चिक : मानसिक थकवा येऊ शकतो 

आळस किंवा मानसिक थकवा येण्याची शक्यता आहे. विवादास्पद प्रकरणे मार्गी लागण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीची योजना आखली  जाऊ शकते. व्यावसायिक करार प्रकरणामुळे थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. 

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

धनु : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता 

घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. एखाद्या ठिकाणी अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करारामुळे फायदा होईल. शिक्षणासंबंधी समस्या मार्गी लागतील. सामाजिक आदरात वाढ होईल.

मकर : सासरी सन्मान मिळेल 

आज सासरी सन्मान मिळेल. वरिष्ठांचे सन्मान पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील.