16 डिसेंबर 2019चं राशीफळ, कन्या राशीनं कौटुंबिक तणावापासून दूर राहावं

16 डिसेंबर 2019चं राशीफळ, कन्या राशीनं कौटुंबिक तणावापासून दूर राहावं

मेष : जोडीदारासोबत रोमांस राहील
परस्पर समन्वयामुळे नात्यात आणखी प्रेम वाढेल. जोडीदारासोबत रोमान्स कायम राहील. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सहकर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे रखडलेली काम पूर्ण होईल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. राजकारणातील जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ : दातदुखीमुळे अस्वस्थ
दातदुखीमुळे अस्वस्थ असाल. महत्त्वाच्या कामांमध्ये आळश आणि निष्काळजीपणा दाखवू नका. निरर्थक गुंतागुंत निर्माण होईल. सध्या प्रवास करणं टाळा. तुमची व्यावसायिक योजना यशस्वी होईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मीन : पैसा पुन्हा मिळू शकतो
आज तुम्हाला पैशांसंदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उधार दिलेला पैसा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. प्रभावशाली लोकांसोबत भेट होईल, ज्यामुळे व्यवसायात फायदा होईल. मित्रांकडून महागडी भेटवस्तू मिळेल.

वृषभ : चांगल्या संधी गमावण्याची शक्यता
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावल्या जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिस्पर्धी उघडपणे आव्हान देतील. मालमत्तेसंबंधी वाद मार्गी लागू शकतात.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : नोकरीत पदोन्नतीची शक्यता
व्यवसायात नफा आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखली जाण्याची शक्यता. मित्रांच्या भेटीगाठी होतील. रखडलेली कामे पूर्ण होतील.

कर्क : आळसाचा त्याग करा
कामाच्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान स्वीकारल्यास अडचणी वाढतील. वरिष्ठांसोबत वाद वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. व्यवहारांच्या प्रकरणांत सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : वयोवृद्धांचं आरोग्य बिघडू शकते
वयोवृद्धांचं प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. खाणेपिणे आणि दिनक्रमाची विशेष काळजी घ्या. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलण्याची वेळ येऊ शकते. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील. अचानक धनलाभाचा योग आहे.

कन्या : कौटुंबिक तणावापासून दूर राहा
आज सर्वकाही खूप आनंदित राहील. कौटुंबिक तणावापासून दूर राहा. आपल्या जोडीदारासह उत्तम क्षणांचा आनंद घ्या. जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. सामाजिक संस्थेकडून सन्मान केला जाण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स

तूळ : करार मिळण्याची शक्यता
आज आनंदाची बातमी मिळेल. व्यावसायिक यात्रा यशस्वी होईल. मोठे करार मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते आणि आर्थिक लाभ होईल. जुन्या मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : चोरी होण्याची शक्यता
एखादी मौल्यवान वस्तू गमावण्याची किंवा चोरण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत सावध राहा, नुकसान होऊ शकते. आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते. नवीन प्रेमी जोडप्यांसाठी वेळ चांगला असेल.

धनु : आरोग्यात सुधारणात होईल
दीर्घ काळापासून सुरू असलेल्या आजारात आता सुधार होण्याची वेळ आली आहे.
सूर्य स्नानामुळे अधिक फायदा मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून लाभ मिळेल, त्यांच्यासोबत भ्रमंतीची योजना आखली जाऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : आईवडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता
आईवडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संवाद साधताना संयम बाळगा. नोकरीमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.