17 डिसेंबर 2019चं राशीफळ, वृश्चिक राशीला उच्च शिक्षणाची संधी मिळेल

17 डिसेंबर 2019चं राशीफळ, वृश्चिक राशीला उच्च शिक्षणाची संधी मिळेल

मेष : उधार दिलेले पैसे मिळण्याची शक्यता

कला आणि सिनेसृष्टीशी संबंधित लोकांचा फायदा होईल. नवीन जमीन किंवा घर विकत घेण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ : मित्रांसोबत वाद घालू नका
मित्रांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. निरर्थक वादांपासून दूर राहा. राग आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतील. व्यवसायात अडचणी निर्माण होण्याची शक्यता. शिक्षणसंबंधी समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मीन : पोटाच्या समस्येमुळे हैराण
आज पोटाच्या समस्येमुळे हैराण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. अपत्याकडून सुखद बातमी मिळेल. सामाजिक सम्मान आणि धनसंपदेत वाढ होईल. धार्मिक कार्यात मन रमेल.

वृषभ : नव्या प्रेमसंबंधाची होईल सुरुवात
आज नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होऊ शकते आणि आज सर्व काही खूप आनंदीत असेल. व्यवसायात नवीन भागीदारासोबत सकारात्मक भेट होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यास यशस्वी व्हाल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मिथुन : व्यवसायात अ़चडणी येऊ शकतात
आळसाचा त्याग करा. व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात.विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील. रचनात्मक कामांमध्ये मन रमेल.

कर्क : पैसाच पैसा मिळेल
आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. मोठ्या करारासंबंधी आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी पगार वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक बुडालेला पैसा मिळल्यानं मन आनंदीत असेल. जोडीदारावर संशय घेणे बंद करा.

सिंह : मिळालेलं काम रद्द होऊ शकतं
आज अचानक व्यावसायिक करार रद्द होऊ शकतो आणि कामाच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्यांसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. स्वतःची काळजी घ्या. निरर्थक गुंतागुंत निर्माण होईल. आत्मविश्वास कमी होईल. प्रियकरासोबत संबंध दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कन्या : शारीरिक दुखण्यामुळे अस्वस्थ
एखाद्या अज्ञात भीतीमुळे मन भयभयीत राहील. शारीरिक दुखण्यामुळे अस्वस्थ राहाल. विद्यार्थ्यांना शिक्षण स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. जुन्या प्रकरणांचे निराकरण होऊ शकते. धार्मिक कार्यात मन लागेल.

तूळ :जोडीदाराशी संबंध मजबूत होतील
मित्र आणि नातेवाईकांच्या सहकार्याने मन प्रसन्न होईल. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होईल. व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

वृश्चिक : उच्च शिक्षणाची संधी मिळेल
आज संशोधनसंबंधी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी शोध संपेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. राजकीय मदत घेतल्यानं यश मिळू शकेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : खिसा कापला जाईल
आजचा दिवस आव्हानात्मक राहील. खिसा कापला जाऊ शकतो, सतर्क राहा. अधिक कष्ट घेतल्यानंतरही उत्पन्न कमी आणि खर्च अधिक राहील. कटुंबात अशांतता असेल. धार्मिक कामांमध्ये मन लागेल.

मकर : ब्लडप्रेशरमध्ये सुधारणा
ब्लडप्रेशरसारख्या आजारांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्मसम्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक प्रकरणांमध्ये प्रगती होईल.