18 डिसेंबर 2019चं राशीफळ, मिथुन राशीला कुटुंबाचं मिळेल सहकार्य

18 डिसेंबर 2019चं राशीफळ, मिथुन राशीला कुटुंबाचं मिळेल सहकार्य

मेष : हातापायाच्या दुखण्यामुळे अस्वस्थ
आज तुम्ही हाता-पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त राहाल. दिवसभर शारीरिक थकवा जाणवेल. कामाच्या ठिकाणी काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न कराल. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा अचानक पैशांचा लाभ होऊ शकतो.

कुंभ : अपत्याकडून मिळेल खूशखबर
आज तुमचे आरोग्य ठीक राहील. आज अपत्याकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकेल. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मीन : नव्या संपर्कांपासून सावध राहा
कौटुंबिक नात्यांमध्ये कलह होतील. नव्या संपर्कांपासून सावध राहा, विश्वासघात होऊ शकतो. वरिष्ठांसोबत मतभेद होतील. निरर्थक वादापासून दूर राहा. रचनात्मक कार्यांत प्रगती होईल. व्यवहार करताना सतर्क राहा.

वृषभ : अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता
मालमत्तेसंदर्भातील कोर्टातील खटल्यापासून दिलासा मिळू शकतो. अडकेलाल पैसा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांती मिळेल. संतान सुख मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदी करू शकतात.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : कुटुंबाचं सहकार्य मिळेल
प्रेम संबंधांत एकमेकांवर विश्वास ठेवा. पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे सहकार्य मिळेल. नवीन वाहन खरेदी करू शकता. सामाजिक कार्यात सहभाग घेऊ शकता. नवीन व्यवसायाच्या योजना आखल्या जाऊ शकतात.

कर्क : नोकरीत अडचणी येऊ शकतात
नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक भागीदारीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. त्यापासून वाचण्यासाठी आपल्या व्यवहारात किचिंतसे परिवर्तन करा. गमावलेला विश्वास पुन्हा मिळवू शकता. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

सिंह : महागडी भेटवस्तू मिळेल
आज तुमचा दिवस खूपच चांगला जाईल. तुम्हाला महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल आणि नोकरीतही उत्पन्न वाढेल. यात्रा होण्याचा योग आहे.

कन्या : नवे काम सुरू करू नका
आज कोणतंही नवीन कार्य सुरू करू नका. अडचणी येऊ शकतात. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांपासून मतभेद होऊ शकतात. वादांपासून दूर राहा. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे.

तूळ : थकवा आणि अशक्तपणा जाणवेल
आज निरर्थक धावपळीमुळे त्रस्त राहाल. शारीरिकरित्या थकावा आणि अशक्तपणा जाणवेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक सन्मान आणि धनसंपदेत वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

वृश्चिक : अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल
आज भाग्योदयाचा दिवस आहे. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळाल्यानं मनोधैर्य वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे.

धनु : कला आणि संगीतात आवड वाढेल
विद्यार्थ्यांची कला आणि संगीत क्षेत्रात आवड वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आरामदायक आणि मैत्रिपूर्ण असतील. व्यवसायात फायदा होईल. तात्काळ लाभ होण्यासाठी तडजोड करण्यास तयार असाल. नवीन वाहन खरेदी करू शकता.

(वाचा : Vaastu Tips : घरात कुठे असावा आरसा)

मकर : कर्ज घेऊ नका
निरर्थक खर्चावर नियंत्रण आणा, अन्यथ अडचणी निर्माण होऊ शकता. कर्ज घेणे सध्या टाळा. वाद-विवादांपासून दूर राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.