19 डिसेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीला मिळतील नोकरीचे चांगले प्रस्ताव

19 डिसेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीला मिळतील नोकरीचे चांगले प्रस्ताव

मेष : आईवडिलांसोबत मतभेद होऊ शकतात
प्रेमात निराशा मिळण्याची शक्यता आहे.आईवडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. प्रगती आणि आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये तगडे आव्हान मिळेल.

कुंभ : आर्थिक व्यवहार करू नका
आज व्यावसायिक प्रकरणांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. पैशांची कोणतीही मोठी देवाण-घेवाण करू नका. कौटुंबिक तणाव वाढू शकतो. निरर्थक वादापासून दूर राहा. आत्मविश्वास कमी होईल.

मीन : ब्लडप्रेशरमध्ये सुधारणा होईल
आज तुम्ही ताजेतवाने असाल. काही नवीन गोष्ट करण्यास उत्सुक असाल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील.

वृषभ : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. कौटुंबिक संपत्तीचा हक्क मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करारातून फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते. वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

(वाचा : Vaastu Tips : घरात कुठे असावा आरसा)

मिथुन: गुडघे-पाय दुखीच्या तक्रारी
आईचे गुघडे आणि पाय दुखण्याची तक्रारी उद्भवू शकतात. खाणेपिणे आणि नियमित दिनक्रमाची काळजी घ्या. तुमचा मधुर व्यवहार सामाजिक मान-सन्मान वाढवेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : प्रेमसंबंधांना मार्ग मिळू शकतो
तुमच्यासाठी काही व्यक्ती विशेष महत्त्वपूर्ण होऊन जातील. प्रेमसंबंधांना मार्ग मिळू शकतो. कोर्ट-खटल्याच्या प्रकरणातून दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल.

सिंह : मिळालेलं काम रद्द होऊ शकते
प्रोफेशनल लाइफमध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात मिळालेले करार रद्द होण्याची शक्यता आहे. स्वतःची काळजी घ्या. निरर्थक गुंतागुंत होईल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील
आज अडकलेली धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. प्रतिस्पर्धी हार स्वीकारतील. रचनात्मक कार्यांमध्ये यश मिळेल. अपत्याच्या आरोग्याची काळजी घ्या.

(वाचा : पूजेला बसताना नवराबायकोचं एकत्र बसणं मानलं जातं शुभ)

तूळ : व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता
कामाच्या ठिकाणी मतभेदामुळे अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक करार रद्द होऊ शकतात. धावपळ होईल. आर्थिक नुकसान होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याचाही योग आहे. जोडीदाराचे सहकार्य कायम राहील.

वृश्चिक : जोडीदाराचे आरोग्य खराब होईल
जोडीदाराचे आरोग्य खराब असल्यानं तुम्ही अस्वस्थ राहाल. खाण्यापिण्यात सावधगिरी बाळगा. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. वाद-विवादांपासून दूर राहा. रखडलेले काम मार्गी लागल्यानं आत्मविश्वासात वाढ होईल. सामाजिक सन्मान मिळेल.

धनु : नव्या प्रेमाची सुरुवात होईल
आज तुमच्या नव्या प्रेमसंबंधाची सुरुवात होईल. भाऊ आणि शेजाऱ्यांचं सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संबंध विचारविनिमयपूर्वक स्थापित करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळेल.

(वाचा : शास्त्र सांगतं की, रात्री खाऊ नका हे पदार्थ)

मकर : तरुणांना नोकरीचे चांगले प्रस्ताव मिळतील
शैक्षणिक पातळीवरील परिस्थिती विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीचे चांगले प्रस्ताव मिळतील. कामाशी संबंधित संघर्ष संपुष्टात येईल. अनुभवी व्यक्तीकडून फायदा मिळवून घ्या. राजकारणात जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.