20 डिसेंबर 2019चं राशीफळ, तूळ राशीला होऊ शकते धनप्राप्ती

20 डिसेंबर 2019चं राशीफळ, तूळ राशीला होऊ शकते धनप्राप्ती

मेष : आरोग्य सुधारेल
तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. ताजेपणाचा अनुभव घ्याल. आत्मविश्वासात वाढ होईल. गुंतागुंतीचे प्रकरण मार्गी लागतील. व्यवसायातील भागीदारीत फायदा होईल. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ : योजना यशस्वी होतील
रोजगाराच्या दिशेने तुम्हाला यश मिळेल. नव्या कराराची योजनाही यशस्वी होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे. गमावलेला विश्वास पुन्हा मिळवाल. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा.

मीन : महागडी वस्तू हरवण्याची शक्यता 
आज पैशांसंबंधी अडचणी येऊ शकतात. एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादं काम होता-होता रखडेल. पैसा गुंतवल्यानंतर फायदा होणार नाही. पण कर्ज घेणे टाळा.

वृषभ : वडिलांसोबत मतभेद वाढण्याची शक्यता
आज वडिलांसोबत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. असं कोणतंही काम करू नका ज्यामुळे सामाजिक सन्मानावर परिणाम होईल. पैशांसंबंधी अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कष्ट आणि व्यावसायिक कौशल्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नवीन करारामुळे फायदा होईल. अपत्याच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : सर्दी-खोकल्यामुळे त्रास
सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. व्यवसायात फायदा होईल. सामाजिक सन्मान आणि भेटवस्तू मिळतील. मानसिक शांती मिळेल. जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सिंह : आयुष्यात शांतता राहील
तुमच्या लव्ह लाइफमध्ये शांतता राहील. परस्पर संबंधांमध्ये अधिक परिपक्वता येईल.
काही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांसोबतचे संबंध सुधारतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल.

कन्या : शिक्षणात अडचणी येण्याची शक्यता
शिक्षण क्षेत्रात कठीण परिस्थितींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये परिवर्तनाची शक्यता आहे. निरर्थक धावपळ होईल. नवीन प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

तूळ : धनप्राप्ती होऊ शकते
घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करारामुळे फायदा होईल. शिक्षणसंबंधी समस्या मार्गी लागतील. जोडीदारासोबत नाते दृढ होईल.

वृश्चिक : व्यवसायात येऊ शकतात अडचणी
लक्ष्य गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागणार आहेत. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. कुटुंबीयांना वेळ दिल्यास नात्यात गोडवा येईल. निरर्थक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

धनु : मानसिकरित्या अशांती
आज तुम्ही मानसिक स्वरुपात अशांत होऊ शकता. चिडचिडेपणा देखील होईल. संवाद साधताना संयम बाळगा. आईचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक यात्रेचा योग आहे. नवीन करार मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : नव्या संबंधांमुळे खूश राहाल
जोडीदाच्या भावना समजून घेऊन परस्परांमधील समस्या दूर करा. नवीन लोकांच्या भेटीगाठींमुळे मन खूश असेल. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळतील. मित्रांसोबत संस्मरणीय क्षण व्यतित कराल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.