21 डिसेंबर 2019चं राशीफळ, मीन राशीला पदोन्नतीची शक्यता

21 डिसेंबर 2019चं राशीफळ, मीन राशीला पदोन्नतीची शक्यता

मेष : धन संकट येण्याची शक्यता
नवीन कामाच्या सुरूवातीला पैशांचे संकट येण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊ शकतो. उत्पन्न कमी होईल आणि खर्च जास्त होईल. आत्मविश्वास कमी होईल. आईचे सहकार्य मिळेल.

कुंभ : कौटुंबिक त्रास कमी होईल
वाढत्या उत्पन्नामुळे कौटुंबिक नात्यातील अडचणी दूर होतील. आपल्याला पालकांकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. प्रेम संबंध रोमँटिक राहतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. प्रवासाचा योग आहे.

मीन : नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता
आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. थांबलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता. अध्यात्मात रस वाढू शकतो.

वृषभ : गंभीर आजाराचा चांगला रिपोर्ट
एखाद्या गंभीर आजाराचा चांगला रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. संपूर्ण दिवस उत्साहात राहाल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहतील. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : जोडीदाराकडून मिळेल तणाव
घरातील प्रमुख आणि जोडीदाराकडून तणाव मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात गुंतून आपल्या घराची शांती बिघण्याची शक्यता आहे. रागात काहीही विधाने करू नका. आरोग्य राहील ठीक. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

कर्क : सासरहून महागडी भेटवस्तू मिळेल
नवीन कामात गुंतवणुकीत चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सासरच्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे. वाहनात सावधगिरी बाळगा.

सिंह : डोळ्यांच्या आजारांपासून सावध राहा
डोळ्यांसंबंधित आजारांपासून सावध राहा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले राहतील.

कन्या : कुटुंबीय-मित्रांची साथ मिळेल
आपणास कठीण काळात कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. गुंतागुंत प्रकरणांचे निराकरण होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. एखाद्या सामाजिक संस्थेद्वारे सन्मान केला जाण्याची शक्यता आहे.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

तूळ : विद्यार्थ्यांनी आळसाचा त्याग करावा
आज तुम्हाला एखाद्या विशिष्ट कारणामुळे आत्मविश्वासात कमतरता जाणवेल.
आळसामुळे अभ्यास मन लागणार नाही. संयमानं कामे करावीत. जोडीदाराचं संपूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक कामांमध्ये तुमची सक्रियता वाढेल.

वृश्चिक : अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता
अडकलेला जुना पैसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक पार्टीमध्ये जाणं फायदेशीर ठरेल. शिक्षण आणि कलासंबंधित लोकांचा फायदा होईल. भावनिकरित्या तुम्हाला चांगेल वाटेल. सुखसोयींच्या साधनांमध्ये वाढ होईल.

धनु : विद्यार्थ्यांना अपयश मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासावर लक्ष द्या. अनोळखी लोकांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. सतर्क राहा. कामाच्या ठिकाणी दाखवलेला हलगर्जीपणा हानिकारक ठरू शकतो. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : प्रकृती असेल खराब
जोडीदाराची प्रकृती खराब होऊ शकते. मन निराश असेल. व्यवसाय किंवा नोकरी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. तुमच्या कौशल्यामुळे रखडलेले काम पूर्ण होईल. सामाजिक सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल.