23 डिसेंबर 2019 राशीफळ, कन्या राशीला प्रॉपर्टीसंबंधी मिळेल खूशखबर

23 डिसेंबर 2019 राशीफळ, कन्या राशीला प्रॉपर्टीसंबंधी मिळेल खूशखबर

मेष : कटुता दूर होईल
भाऊबहिणीच्या नात्यातील कटुता दूर होईल. कुटुंबात मंगल कार्याची योजना आखली जाईल. व्यावसायिक भागीदारीमुळे लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. राजकारणात सक्रियता वाढेल.

कुंभ : वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता
निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक नुकसान होईल. आत्मविश्वास कमी होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल.

मीन : मन अशांत राहील
एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ राहाल. मन अशांत राहील. आत्मविश्वास कमी होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धार्मिक कामांमध्ये मन रमेल. आर्थिक परिस्थिती भक्कम होईल. सध्या प्रवास करणं टाळा.

वृषभ : रखडलेले करार पूर्ण होतील
व्यावसायिक रखडलेले करार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयोग यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. जोडीदाराचा सहवास आणि सहकार्य मिळेल. यात्रेचा यग आहे.

मिथुन : खर्च वाढ शकतो
एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती राहील. वाहनाच्या देखभालीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकता. नावडत्या लोकांची भेट होऊ शकते.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

कर्क : आरोग्यात सुधारणा होईल
दीर्घ आजारांनंतर आरोग्यात सुधारणा होईल. वादांपासून दूर राहा. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. कार्याच्या योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

सिंह : जोडीदारासोबत वाद वाढू शकतात
जोडीदाराचं सहकार्य मिळेल पण वाद वाढण्याची शक्यता आहे. अपत्याकडून निराशाजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे. नुकसान करणाऱ्यांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात.

कन्या : प्रॉपर्टीसंबंधी मिळेल खूशखबर
आज धन संबंधी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीवरील हक्क मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. व्यवसायाच्या योजना सफल होतील आणि काही नवीन गोष्टी शिकण्यास मिळतील. सन्मानात वाढ होईल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

तूळ : सांधेदुखीमुळे त्रास होईल
सांधेदुखीमुळे त्रास होईल. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामांमध्ये मन लागेल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मित्रांसोबत भेट होण्यासाठी अनेक संधी मिळतील.

वृश्चिक : कुटुंबात आनंद वाढेल
आज तुमच्या चहुबाजूंना सुखद वातावरण असेल. कुटुंबात आनंद वाढेल. मुलाची जबाबदारी पार पाडली जाईल. व्यवसायात राजकीय लाभ मिळेल. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

धनु : विद्यार्थ्यांचं मन अशांत राहील
शिक्षणसंबंधी समस्यांमुळे विद्यार्थ्यांचं मन अशांत राहील. व्यवसायात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास डगमगेल. ठोस निर्णय घेण्यात अपयश येईल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मकर : आईकडून धनप्राप्ती होईल
आईकडून धनप्राप्ती होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यवहाराच्या मोठ्या समस्येचं निराकरण होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल. जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ होईल. रचनात्मक कामांमध्ये यश मिळेल.