27 डिसेंबर 2019 राशीफळ, वृषभ राशीच्या व्यक्तींचा सन्मान वाढेल

27 डिसेंबर 2019 राशीफळ, वृषभ राशीच्या व्यक्तींचा सन्मान वाढेल

मेष -नव्या कामाला सुरुवात करू नका

आज कोणतंही नवे काम सुरू करण्याची घाई करू नका. विद्यार्थ्यांवर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. कार्यालयात तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक काम मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गोष्टी रद्द होण्याची शक्यता आहे. 

कुंभ - दातांचा त्रास उद्भवण्याची शक्यता

दातांसंबंधी त्रास तुम्हाला त्रस्त करू शकतात. आर्थिक बाबतीत तुम्ही जोखीम उचलू नका. दुसऱ्यांची मदत घेतल्याने तुम्हाला यश प्राप्त होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. जोडीदाराची साथ लाभेल. 

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

मीन- प्रेमाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता

प्रेमाचा प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. व्यवसायात तुम्हाला नफा होईल. राजकारणात तुमची स्थिती मजबूत राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. 

वृषभ - भेटवस्तू मिळेल अथवा सन्मान मिळेल

आज तुम्हाला भेटवस्तू मिळेल अथवा तुमचा सन्मान होईल. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. नवे संबंध जुळतील. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याचा योग आहे. कुटुंबासह बाहेरगावी जाण्याची योजना आखाल. बिघडलेली कामं होण्याची शक्यता आहे. 

आठवड्यातील कोणता दिवस आहे तुमच्यासाठी शुभ, काय सांगते तुमची रास

मिथुन - करिअरमध्ये संबंध बिघडण्याची शक्यता

आज नव्या व्यवसायात संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयातही तुम्हाला त्रास होऊ शकतो. सांभाळून राहा. विवादांपासून दूर राहा. प्रेमी युगुलांचे संबंध मजबूत होतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पैशांसंबधी संतुलन व्यवस्थित राहील. 

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

कर्क - मन उदास, त्रस्त राहील

आज मन उदास, त्रस्त आणि वाईट मनस्थितीत राहील. स्वभावात चिडचिडेपणा आणि अस्वस्थपणा राहील. कार्यालयात काम करायला त्रास होईल. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. राजकारणामध्ये जबाबदारी वाढू शकेल. 

सिंह - कठीण वेळी वडिलांची साथ लाभेल

नातेवाईकांसह तुम्ही आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवू शकाल. कार्यालयात तुम्हाला महत्त्वाची भूमिका मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक मित्रांचे सहकार्य मिळून काम पूर्ण करू शकाल. यात्रेचा योग आहे. 

कन्या - विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल

विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. मार्केटिंग आणि सेल्सच्या काही व्यक्तींना कठीण कामातून मार्ग काढता येईल. व्यावसायिक सहभागाचा लाभ मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता. 

तूळ - कौटुंबिक खर्चात वाढ होईल

कोणत्या तरी खास व्यक्तीमुळे तुमच्या कुटुंबातील खर्च वाढतील. कमी पैशात अधिक मिळणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवणं योग्य नाही. काम अतिशय हळू केल्याने तुम्हाला आर्थिक संंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक - दीर्घ आजारातून मिळेल सुटका

दीर्घ आजारातून तुम्हाला सुटका मिळेल. आरोग्य चांगलं राहील. आत्मविश्वासात वाढ होईल. तसंच तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेल्या निर्णयात तुम्हाला यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जोडीदाराचं प्रेम आणि सहयोग मिळेल.  

धनु - नातेसंबंधात तणाव वाढेल

आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.  अन्यथा नातेसंबंधातील तणाव वाढू शकतो. आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.  व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचा योग आहे. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या. नव्या संपर्कांकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. 

मकर - चल - अचल संपत्ती खरेदीची योजना आखाल

आई - वडिलांकडून महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासह चांगले क्षण घालवता येतील. नातेसंबंधात आलेला कडवटपणा दूर होईल. चल - अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखू शकता. परदेशात जाण्याचा प्रस्ताव मिळू शकतो.