29 डिसेंबर 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या लोकांना धनलाभ

29 डिसेंबर 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या लोकांना धनलाभ

मेष -  शारीरिक कमजोरी आणि थकवा जाणवेल

भविष्यासंबंधी चिंता जाणवेल. मनात नकारात्मक विचार येतील. ताणतणावामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. जोखिमेची कामे करू नका. रखडलेली कामे पूर्ण होतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. 


कुंभ - गरजेच्या वेळी मित्र साथ देणार नाहीत

गरज असताना मित्र मदतीचा हात देणार नाहीत. घरच्या लोकांसाठी थोडासा वेळ काढा. करिअरबाबत महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकारी मदत करतील. राजकारणात लाभ मिळण्याची शक्यता  आहे. कोर्टकचेरीत तुमचा पक्ष मजबूत असेल.

 

मीन- उत्पन्न वाढणार आहे

आज तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. भागिदारीच्या व्यवसायाची संधी मिळेल. प्रियकरासोबत खरेदीला जाल. जोडीदारासोबत प्रवास सुखकर असेल. 

 

वृषभ - कौटुंबिक वाद होण्याची शक्यता

आज तुमचा कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे. नवीन मित्र मिळतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विरोधकांचा त्रास कमी होईल. विनाकारण खर्च करू नका. जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हवर जाल. 


मिथुन - अभ्यासात मन रमणार नाही

आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. कामाच्या ठिकाणी समस्या  येतील. अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. नात्यातील गोडवा वाढणार आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. 


कर्क -  नवीन कामे मिळतील

व्यवसायात फायदा होण्याचा योग आहे. नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक सुखसमृद्धी वाढणार आहे. परदेशी जाण्याचा योग आहे. नवीन मित्र भेटतील. 


सिंह - व्यवसायात कामे रद्द होण्याची शक्यता

महत्त्वाची कामे आज रद्द होण्याची शक्यता आहे. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी असेल. खर्च वाढणार आहे. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 

 

कन्या -  आरोग्यसमस्या जाणवतील


आज दिवसभर समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मनात अस्वस्थता जाणवेल. सावध राहणे गरजेचे आहे. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे निर्णय घेणे कठीण होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


तुळ - जोडीदाराशी वाद होतील

आज तुमचे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. भावंडांच्या मदतीमुळे व्यवसायात उन्नती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. आर्थिक स्थिती  सुधारणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध राहा. 


वृश्चिक - नोकरीचा शोध संपणार आहे

आज विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस असेल. नोकरीचा शोध संपणार आहे. यश मिळणार आहे. व्यवसायातील अडचणी दूर होतील. नवीन कामे मिळणार आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. 


धनु - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्ही घाईघाईत चुकीचे निर्णय घ्याल. ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी बदल होतील. विरोधक उघडपणे आव्हान देतील. जुन्या समस्या कमी  होणार आहेत. धार्मिक यात्रेचा योग आहे. 


मकर - आईची तब्येत सुधारणार आहे

आज तुमच्या आईच्या आरोग्यात सकारात्मक बदल होतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

 

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती