3 डिसेंबर 2019चं राशीफळ, कुंभ राशीच्या व्यक्तींना होईल धनलाभ

3 डिसेंबर 2019चं राशीफळ, कुंभ राशीच्या व्यक्तींना होईल धनलाभ

मेष : करिअरसाठी धावपळ
चांगले करिअर घडवण्यासाठी तरूणांची धावपळ होईल. जोखीम असलेल्या कार्यांपासून दूर राहा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वाईट बातमीमुळे अचानक प्रवास करावा लागू शकतो. तब्येत ठीक राहील.

कुंभ : धनलाभ होईल
आज तुम्ही नवी योजना आखू शकता. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कुटुंबात अपत्यासंबंधी आनंदाचे क्षण येतील.

मीन : जुन्या समस्या दूर होतील
वृद्धांच्या मदतीनं जुन्या समस्या दूर होतील. व्यावसायिक लाभासाठी तडजोड करू शकता. व्यवहारांचे प्रकरण मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल.

वृषभ : अचानक धनलाभाचा योग
आज अचानक धनलाभाचा योग आहे. व्यावसायिक प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल आणि जबाबदारी वाढेल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागेल. परदेशी प्रवास घडण्याचा योग आहे.

मिथुन : अडचणी निर्माण होतील
विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अपूर्ण कामांना पूर्ण होण्यास अतिरिक्त वेळ लागू शकतो. कामाच्या ठिकाणी इच्छेविरोधात अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता. तब्येत ठीक राहील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कर्क : डोळेदुखीची समस्या
डोळेदुखीमुळे त्रस्त व्हाल. आनंदी बातमी मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीमुळे लाभ होतील. व्यवहारांच्या प्रकरणात हलगर्जीपणा बाळगू नका.

सिंह : जोडीदारासोबत मौजमस्ती
एखाद्याच्या आकर्षणात कैद होऊ शकता. जोडीदारासोबत मौज-मस्तीचं वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी तुमचं म्हणणं मान्य करतील. आरोग्याची काळजी घ्या.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कन्या : रोजगारात नव्या प्रयत्नांना यश
रोजगाराच्या क्षेत्रात नव्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यावसायिक विस्तार वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे खासगी संबंध प्रेमपूर्ण असतील. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील. सामाजिक सन्मान आणि धनसंपदेत वाढ होईल.

तूळ : अधिक खर्चाची अपेक्षा
नवी योजनेच्या सुरुवातीस अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आपणास मोठा करार किंवा पैसा मिळता-मिळता अचानक त्यात व्यत्यय येईल. सध्या प्रवास करणे टाळा. प्रियकराच्या भेटीमुळे सुखद वाटेल. तब्येत ठीक राहील.

(वाचा : वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘ह्या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान)

वृश्चिक : गुडघेदुखीपासून आराम मिळेल
गुडघ्यांच्या दुखण्यातून सुटका होईल. नियमित दिनक्रम आखा आणि खाण्यापिण्याची सवयींची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या दूर होतील. व्यावसायिक यात्रेचा योग आहे. प्रवास फायदेशीर ठरेल.

धनु : विश्वासघाताची शक्यता
नवीन संपर्कांमुळे विश्वासघात होण्याची शक्यता आहे. मन आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. राजकारणातील जबाबदारी वाढेल. जोखीम असलेल्या कार्यांपासून दूर राहा. प्रवासाचा योग आहे.

मकर : गुडघेदुखीमुळे त्रस्त
गुडघेदुखीमुळे त्रस्त राहाल. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपदेत वाढ होईल. जोडीदारासोबत नात्यात गोडावा वाढेल. आर्थिक परिस्थिती भक्कम राहील.