5 डिसेंबर 2019चं राशीफळ, मेष राशीला धनप्राप्तीची शक्यता

5 डिसेंबर 2019चं राशीफळ, मेष राशीला धनप्राप्तीची शक्यता

मेष : आईकडून धनप्राप्ती होईल
आईकडून धनप्राप्ती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. कायदेशीर खटला जिंकण्याची शक्यता. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती मिळेल. भागीदारांशी संबंध दृढ होतील.

कुंभ : वाद होण्याची भीती
प्रेमसंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळणं यावेळेस तुमच्या भल्याचं ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता. आपल्या उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

मीन : शारीरिक थकवा आणि चिडचिड होईल
आज अधिक धावपळ झाल्यानं शारीरिक थकवा आणि चिडचिड देखील होण्याची शक्यता आहे. आर्थिक उन्नतीचे शुभ योग आहेत. मित्रांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात.

वृषभ : जोडीदारासह चांगला वेळ घालवाल
जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. मुलांच्या मदतीने तुमचे प्रश्न सुटतील. भूतकाळाच्या उणिवा दूर करण्यास यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आपले नियंत्रण असेल.

वाचा : राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

मिथुन : कार्यालयातील अडचणीमुळे त्रस्त
कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल. नोकरी बदलण्याचा किंवा रजेवर जाण्याचा विचार मनात येईल. व्यवसायातील नुकसान टाळण्यासाठी लोभाचा त्याग करा. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा.

कर्क : पैशांसंबंधित चांगली बातमी मिळेल
पैशांसंबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. जोडीदाराचा सहवास आणि सहकार्य मिळेल. गुंतागुंतीची प्रकरणे मार्गी लागतील.

सिंह : हलगर्जीपणामुळे चांगल्या संधी गमवाल
आपण निष्काळजीपणाने चांगली संधी गमावण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होईल. आत्मविश्वास कमी होईल. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.

वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स

कन्या : मानसिकरित्या अशांत
मानसिक त्रासामुळे अशांत असाल. स्वभावात चिडचिडेपणा असेल. संभाषण करताना संयम बाळगा. आईचं सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या निमित्तानं प्रवासाचा योग आहे. नवीन करार मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : एखाद्याला प्रभावित कराल
आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाद्वारे तुम्ही कोणालाही प्रभावित करू शकाल. जुन्या मित्रांच्या मदतीने रखडलेली काम पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्याच्या कर्तृत्वाने आपण उत्साही व्हाल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागतील.

वृश्चिक : नवीन करार मिळण्याची शक्यता
तुम्ही जे काही कार्य कराल त्यावर आपली छाप सोडाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामाच्या शैलीमुळे प्रभावित होतील. नवीन कंत्राटे प्राप्त होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. राजकारणातील तुमची उंची वाढू शकते.

(वाचा : वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘ह्या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान)

धनु : खर्चामध्ये वाढ होऊ शकते
कोणीतरी आपला विश्वास जिंकून तुमचा मेहनतीचा पैसा काढून घेऊ शकतो. वाहनाच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो. व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. धार्मिक श्रद्धा वाढेल.

मकर : आरोग्यात सुधारणा होईल
दीर्घ काळापासून सुरू असलेल्या आजारातून मुक्तता मिळून आरोग्यात सुधारणा होईल. घरात राहून आराम करा. वादांपासून दूर राहा. व्यवसायात लाभ मिळतील. आत्मविश्वास वाढेल. प्रतिस्पर्ध्यांचा पराजय होईल. कार्य योजनेत बदलाची शक्यता आहे.