6 डिसेंबर 2019चं राशीफळ, वृषभ राशीचे वाढतील उत्पन्नाचे स्त्रोत

6 डिसेंबर 2019चं राशीफळ, वृषभ राशीचे वाढतील उत्पन्नाचे स्त्रोत

मेष : मानसिक तणावाची शक्यता
कौंटुबिक समस्यांमुळे त्रस्त असाल. मानसिक ताण देखील येऊ शकतो. प्रभावशाली व्यक्तींची भेट घेणे फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

कुंभ : अपत्याकडून मिळेल खूशखबर
आरोग्य ठीक राहील. अपत्याकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात मौज-मज्जेचं वातावरण असेल. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मीन : जोडीदारासोबत तणाव वाढेल
जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. मुलांना तुमच्या प्रेमाची आणि सोबतीची आवश्यकता असेल. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिस्पर्ध्यांकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक प्रवास करणं सध्या टाळा.

वृषभ : उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील
उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. आपणास कौटुंबिक मालमत्तेचा हक्क मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करारामध्ये नफा होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : सासरहून खूशखबर मिळेल
सासरहून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासह आपल्याला सामाजिक कार्यामध्ये सामील होण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे.

कर्क : कामात अडचणी येतील
कामाच्या ठिकाणी आज निरर्थक समस्या आणि गुंतागुंत निर्माण होईल. आरोग्य आणि प्रतिष्ठेसंदर्भात सावध राहा. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका. व्यावसायिक प्रवासाची शक्यता आहे, परंतु प्रवासादरम्यान सावध राहा.

सिंह : कौटुंबिक मालमत्ता मिळेल
कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार मिळल्यास मन आनंदित राहील. सामाजिक संस्थेकडून सन्मान होऊ शकतो. प्रतिष्ठा आणि धनसंपदेत वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : निरर्थक गोंधळ निर्माण होईल
काम लवकर आटोपण्याच्या नादात तुम्ही मोठी चूक कराल. स्वतःची काळजी घ्या. निरुपयोगी गुंतागुंत होईल. व्यावसायिक प्रवासात अडथळा येऊ शकतो. कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळेल. राजकारणात आवड वाढेल.

तूळ : हातापायाच्या दुखण्यानं त्रस्त
हात आणि पायांच्या दुखण्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात फायदा होईल. सामाजिक सन्मान आणि आर्थिक फायदा होईल. जोडीदारामुळे तणाव वाढू शकतो.

वृश्चिक : प्रेमभावना निर्माण होतील
एखाद्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात प्रेमभावना निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी असलेल्या संबंधात गोडवा राहील. परदेश प्रवासाचा योग आहे. राजकारणातील जबाबदारी वाढू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : कामाच्या ठिकाणी प्रगती होईल
कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. विद्यार्थ्यांना शिक्षण स्पर्धेत विशेष यश मिळेल. एखाद्या संस्थेमार्फत सन्मान होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

मकर : कर्ज घेणं टाळा
निरर्थक खर्चावर नियंत्रण आणा, अन्य अडचणी निर्माण होतील. कर्ज घेणे टाळा. वादांपासून दूर राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.