7 डिसेंबर 2019चं राशीफळ, कन्या राशीला धनप्राप्तीची शक्यता

7 डिसेंबर 2019चं राशीफळ, कन्या राशीला धनप्राप्तीची शक्यता

मेष : नव्या संपर्कांपासून सावध राहा
कौटुंबिक नात्यात कलह निर्माण होतील. अनावश्यक बाचाबाची टाळा. राग आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय वेदनादायक ठरतील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती ठीक होईल.

कुंभ : आर्थिक नुकसानाची शक्यता
आज तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते, खिसा जपा. कठोर परिश्रम करूनही यश न मिळाल्यानं मन दुखी राहील. कायदेशीर बाबतीत तुम्हाला यश मिळेल. प्रियकराला भेटून आनंद होईल.

मीन : नव्या कामासाठी उत्साहित राहाल
कोणतीही नवीन कामे सुरू करण्यासाठी उत्साहित असाल. व्यवसायात नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. सलोखा जपण्यासाठी बर्‍याच संधी मिळतील. प्रियकरासोबतची भेट रोमँटिक राहील.

वृषभ : जो़डीदाराची प्रकृती बिघडेल
जोडीदाराची प्रकृती बिघडल्यानं तुम्ही त्रस्त असाल. खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घ्या. व्यवसायात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा. धार्मिक कार्यात मन गुंतेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

(वाचा : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’)

मिथुन : संपत्ती खरेदीची योजना
मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. सासरच्यांकडून महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. प्रेम संबंध रोमँटिक होतील. प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल.

कर्क : जवळच्या व्यक्तीची भेट
आज जवळच्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. विवाहात येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. अडकलेली महत्त्वपूर्ण कार्ये पूर्ण होतील.

सिंह : विद्यार्थी अस्वस्थ असतील
शिक्षणासंबंधित अडचणींमुळे विद्यार्थी अस्वस्थ होतील. मनोबलही कमकुवत होईल. कोणत्याही परिस्थितीत ठोस निर्णय घेण्यात अपयशी ठराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. सध्या प्रवास करणं टाळा.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

कन्या : धनप्राप्तीची शक्यता
सासरच्या लोकांकडून महागडी भेटवस्तू किंवा पैसे मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासह सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. परदेश प्रवासाची संधी मिळेल. रखडलेली काम पूर्ण होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल.

तूळ : वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता
आज संपूर्ण दिवस अस्ताव्यस्त राहील. मानसिक शांतता असेल परंतु कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. पैशांसंबंधित चांगले वृत्त मिळू शकेल.

वृश्चिक : प्रकृती खराब होऊ शकते
आरोग्यासंबंधित काही समस्या निर्माण असू शकतात. आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. व्यवसायात फायदा होईल. सामाजिक सन्मान आणि भेटवस्तू वाढतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील.

धनु : खास भेटीगाठी होतील
अचानक एखाद्या खास व्यक्तीची भेट घडण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध निर्माण होतील. कुटुंबात आनंद येईल. नोकरीत इच्छित पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

(वाचा : जूनमध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या)

मकर : कला-संगीतात आवड वाढेल
विद्यार्थ्यांची कला आणि संगीतामध्ये आवड वाढण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आरामदायक आणि अनुकूल असेल. व्यवसायात फायदा होईल. त्वरित नफा मिळवण्यासाठी तडजोड करण्याची तयारी असेल.