8 डिसेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीचे पार्टनरसोबत असलेले तणाव होतील दूर

8 डिसेंबर 2019चं राशीफळ, मकर राशीचे पार्टनरसोबत असलेले तणाव होतील दूर

मेष : चांगला रिपोर्ट मिळेल
गंभीर आजारामुळे त्रस्त होऊ नका,त्यासंदर्भातील वैद्यकिय अहवाल चांगला येईल. संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण असेल. आपणास कुटुंबीयांसह आनंद साजरा करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. धार्मिक कार्यात मन लागेल.

कुंभ : रचनात्मक कामांमध्ये प्रगती
अपत्यानं आवडत्या खेळात विक्रम नोंदवल्याची खूशखबर मिळण्याची शक्यता. सर्जनशील कामांमध्ये प्रगती होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आरोग्य चांगले राहील. प्रवासाचा योग आहे.

मीन : खर्च वाढण्याची शक्यता
उत्पन्नात कमी आणि खर्च अधिक वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. आत्मविश्वास कमी होईल. आईचं भावनिक सहकार्य मिळेल. जोखीम असलेल्या कार्यांपासून दूर राहा.

वृषभ : नव्या संपर्कांपासून राहा सावध
नवीन संपर्क साधताना सावधगिरी बाळगा, फसवणूक होऊ शकते. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्टखटल्यात दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड निर्माण होईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राहील.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

मिथुन : मानसिक तणाव राहील
मानसिक तणाव राहील. मुलांच्या बाबतीत काळजी निर्माण होऊ शकते. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. व्यावसायिक नफा आणि विस्तार उत्साह वाढवेल. कुटुंबात सुख-समाधान राहील.

कर्क : खूशखबर मिळू शकते
आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. मालमत्तेचाही अधिकार मिळू शकतो. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. व्यवसाय योजना यशस्वी होतील. वैयक्तिक कामासाठी अनुभवी लोकांचा सल्ला घेतला जाऊ शकतो.

सिंह : कुटुंबात आनंद वाढेल
आज आपल्या सभोवताली आनंददायी वातावरण असेल. कुटुंबात आनंद वाढेल. मुलाची जबाबदारी पार पाडली जाईल. प्रतिस्पर्धी तुमची प्रशंसा करतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. परदेश प्रवासाचा योग आहे.

कन्या : व्यवसायात चढ-उताराची स्थिती
कामाच्या ठिकाणी नवीन पद्धत आत्मसात केल्यास अडचणी वाढतील. व्यवसायात चढ-उताराची परिस्थिती निर्माण होईल. राजकीय सहभाग मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. वाहन चालवताना सतर्क राहा.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

तूळ : कौटुंबिक मालमत्ता मिळण्याचा योग
कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांच्या साधनांमध्ये वाढ होईल. व्यावसायातील करार फायदेशीर ठरतील. आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका. प्रेमात त्रिकोण तयार होऊ शकतो.

वृश्चिक : विद्यार्थ्यांना अपयश मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश मिळण्याची शक्यता आहे. नियमित अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. अनोळखी लोकांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी केलेला निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

धनु : नैराश्य येऊ शकतं
शंका आणि तणावामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. नैराश्य येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जुना वाद संपुष्टात येतील. जोखीम असलेल्या कार्यांपासून दूर रहा.

(वाचा : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’)

मकर : जोडीदारासोबतचे तणाव दूर होतील
जोडीदारासोबत असलेले तणाव दूर होतील. तुम्हाला अपत्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. राजकीय उंची वाढण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यामुळे खर्चाशिवाय रखडलेली कामे पूर्ण होतील.