स्कीन केअरसाठी आपण चेहरा आणि शरीराच्या अन्य भागावरील त्वचेची काळजी नेहमीच घेतो. मात्र हाताचा कोपरा आणि गुडघ्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे हाताच्या कोपऱ्यावर (Elbow) आणि गुडघ्यावर (Knees) काळेपणा दिसू लागतो. काळेपणा आल्यामुळे तुम्हाला तुमचे आवडते स्लिव्हलेस अथवा गुडघ्याच्या वरचे कपडे घालायला संकोच वाटतो. पण आता असं करण्याची गरज नाही. कारण हा काळेपणा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
तणाव, अनियमित जीवनशैली अथवा सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्या अंगावर आली तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर डेड स्किन तयार होऊ लागते आणि त्वचेवर हा काळेपणा यायला सुरुवात होते. गुडघे अथवा कोपरावर काळेपणा जमा होणं ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही त्वचा प्रकाराच्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो. मात्र ज्यांची त्वचा गव्हाळ अथवा डार्क असते त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. याचं कारण असं की अशा त्वचेमध्ये जास्त प्रमाणात मॅलॅनिन जमा होत असतं. कधी कधी जास्त प्रमाणात डेड स्कीन जमा होणं, त्वचेचं होणारं घर्षण, सुर्यप्रकाशात जास्त वेळ असणं, काही त्वचा समस्या, हायपर पिगमेंटेशनमुळे होणारा त्वचेचा दाह अशा अनेक गोष्टींचा यामागे समावेश असू शकतो. बऱ्याचदा कोरड्या त्वचेवर हा काळेपणा जास्त प्रमाणात दिसून येतो.
पायाचे गुडघे आणि हाताच्या कोपरांवर येणारा हा काळेपणा अपायकारक नसल्यामुळे त्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार सहसा केले जात नाहीत. मात्र काही घरगुती उपचार करून तुम्ही हा काळेपणा नक्कीच कमी करू शकता.
बेकिंग सोड्यामध्ये क्लिझिंगचे गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. शिवाय दूधातील लॅक्टिक अॅसिड आणि अमिनो अॅसिडमुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. सोडा आणि दुधाचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेतील काळेपणा तर दूर होतोच शिवाय तुमची त्वचा मॉश्चराईझदेखील होते.
कसा कराल वापर
एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा दूध घ्या. दोन्ही घटक एकत्र मिसळून त्याची छान पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या गुडघे आणि कोपरांवर लावा. हळूहळू त्यावर बोटांच्या मदतीने मसाज करा. दोन ते तीन मिनीटांनंतर पाण्याने तो त्वचा धुवून टाका. दोन दिवसांतून एकदा हा स्क्रब लावल्यामुळे तुमच्या गुडघे आणि कोपरावरचा काळेपणा नक्कीच कमी होईल.
वाचा - पायाची काळजी कशी घ्यावी
नारळाच्या तेलात त्वचा हायड्रेट आणि मॉश्चराईझ ठेवण्याचे गुणधर्म असतात. नारळाच्या तेलातील व्हिटॅमिन ईमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा उजळही होते.
कसा कराल वापर
एक चमचा नारळाचे तेल आणि एक चमचा अक्रोडाची पावडर घ्या. हे दोन्ही घटक एकत्र मिसळून त्याचा चांगला पॅक तयार करा. गुडघे आणि कोपरावर या पॅकने स्क्रबिंग करा. दोन ते तीन मिनीटांनी तो भाग पाण्याने स्वच्छ करा. दररोज अंघोळीपूर्वी तुम्ही हा स्क्रब लावल्यास तुमच्या त्वचेत अनेक आश्चर्यकारक बदल दिसून येतील.
दह्यात भरपूर पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होतं. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेवरचा मृत पेशींचा थर कमी होतो. व्हिनेगरचा वापर केल्यामुळे भविष्यात पिंगमेंटेशन अथवा त्वचा काळसर होण्याची शक्यता कमी होते.
कसा कराल वापर
एक चमचा दही आणि एक चमचा व्हिनेगर घ्या. दोन्ही घटक एकत्र मिसळून त्याचा पॅक तयार करा. हा पॅक तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा. वीस ते तीस मिनीटांनी हात पाय स्वच्छ धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी दरररोज हा प्रयोग करा.
बदामाचे तेल तुमच्या शरीराच्या संपूर्ण त्वचेसाठी उत्तम असतं. मात्र जर तुम्हाला गुडघे आणि कोपऱ्यावर काळेपणा असेल तर बदामाचे तेल जरूर वापरा. कारण यात व्हिटमिन ई मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं उत्तम पोषण होऊ शकतं.
कसा कराल वापर
चार ते पाच थेंब बदामाचे तेल तळहातावर घ्या. या तेलाने गुडघे आणि कोपरावर हळूवार मसाज करा. हळूहळू हे तेल तुमच्या त्वचेत मुरू लागेल. नियमित बदामाचे तेल हातापायांना लावल्यास तुमच्या हातापायावरचा काळेपणा नक्कीच कमी होईल.
कोरफडाच्या गरात तुमच्या त्वचेला उजळ करण्याचे गुणधर्म असतात. कोरफड हे एक वंडर प्लांट आहे. ज्याचे तुमच्या त्वचेवर फार चांगले परिणाम होतात. जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा टोन सुधारायचा असेल किंवा सतत सुर्यप्रकाशात राहावं लागत असेल तर कोरफडाचा वापर अवश्य करा.
कसा कराल वापर
कोरफडाच्या पानांमधून कोरफडाचा गर काढा. हा गर गुडघे आणि कोपरावर लावून पंधरा - वीस मिनीटांनी हात पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून दोनदा हा प्रयोग केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.
अॅपल सायडर व्हिनेगरमधील अॅसिटिक घटकांमुळे तुम्हाला चांगला परिणाम मिळू शकतो. कारण याचा परिणामामुळे तुमची त्वचा उजळ होते. त्वचेला उजळपणा आल्यास त्वचेचा काळेपणा नक्कीच कमी होऊ शकतो.
कसा कराल वापर
एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एक पेला पाण्यात टाकून त्याची तीव्रता कमी करा.हे मिक्षण कापसाच्या मदतीने ते तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी हात पाय कोमट पाण्याने धुवून टाका. हे मिश्रण जर तुम्ही आठवड्यातून एक ते दोनवेळा लावले तर तुमच्या हातापायाचा काळेपणा नक्कीच कमी होईल.
अंघोळ करताना कोमट पाण्यामुळे त्वचेचा डेड स्कीनचा भाग सहज निघू शकतो. पण तो काढून टाकण्यासाठी तुम्हाला नियमित Pumice Stone वापर करावा लागेल.
कसा कराल वापर
अंघोळ करताना कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळा Pumice Stone ने हात पाय घासून काढा. मात्र लक्षात ठेवा हा दगड हळूवारपणे तुमच्या त्वचेवरून फिरवा. ज्यामुळे कोमट पाण्याने वर आलेली डेड स्कीन सहज निघून जाईल.
साखरेमुळे तुमच्या त्वचेवरील धुळ, माती आणि प्रदूषणाचा थर कमी होतो. शिवाय जेव्हा तुम्ही साखर आणि ऑलिव्ह ऑईलसोबत साखरेचा वापर त्वचेवर करता तेव्हा त्वचा हायड्रेट आणि मॉश्चराईझ होते.
कसा कराल वापर
दोन चमचे ऑलिव्ह ऑईल आणि दोन चमचे साखर घ्या. दोन्ही घटक एकत्र मिसळा आणि थोडंसं गरम करा. हे मिक्षण तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा आणि पाच ते दहा मिनीटांनी हातयपाय स्वच्छ धुवा. दर दोन दिवसांनी हे मिश्रण वापरल्यास तुमच्या हातापायाचा काळेपणा दूर होईल.
लिंबाचा रसात ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या गुडघे आणि कोपरे स्वच्छ होतात.
कसा कराल वापर
एका लिंबाचा रस काढा. तो गुडघे आणि कोपऱ्यावर लावा. एक तासाने हात पाय स्वच्छ धुवा. दररोज लिंबाचा रस लावल्यास तुमच्या हातापायाचा काळेपणा कमी होतो.
साखरेमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन कमी होते तर व्हिटॅमिन ई ऑईलमुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होतं. त्वचा हायड्रेट झाल्यामुळे त्वचेचा काळेपणा हळूहळू कमी होतो.
कसा कराल वापर
व्हिटॅमिन ई ऑईल ची एक कॅप्सूल आणि एक चमचा साखरेचे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावून हलक्या हाताने मसाज करा. पंधरा ते वीस मिनीटांनी हात पाय स्वच्छ करा. दर दोन दिवसांनी तुम्ही हे मिश्रण लावू शकता. ज्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल.
हळदीमध्ये त्वचा स्वच्छ करण्याचे आणि स्कीन टोन समान करण्याचे गुणधर्म असतात. हळद, दूध आणि मधामुळे तुमच्या त्वचेचं पोषण होतं. त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येतो.
कसा कराल वापर
एक चमचा हळद, दोन चमचे मध आणि एक चमचा दूध घ्या. हे मिश्रण तुमचे गुडघे आणि कोपरावर लावा. दोन मिनीटांसाठी त्वचेवर मसाज करा. वीस मिनीटांनी त्वचा स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक लावा.
बटाट्याचा रसात त्वचेला उजळ करणारे घटक असतात. ज्यामुळे तुम्ही त्वचेवरील काळे डाग, जखमांचे डाग, व्रण कमी करण्यासाठी बटाट्याचा रस वापरू शकता.
कसा कराल वापर
कच्च्या बटाट्याचा कीस काढून त्याचा रस काढा. हा रस तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा. वीस मिनीटांनी हात पाय स्वच्छ धुवा. दिवसभरात दोन ते तीन वेळा रस लावल्यास तुमच्या त्वचेत चांगला बदल दिसून येईल.
चण्याच्या पीठामुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते. ज्यामुळे तुमची त्वचा उजळ दिसते. त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळते. फार पूर्वीपासून साबणाऐवजी चण्याच्या पीठाचा वापर केला जात आहे.
कसा कराल वापर
दोन चमचे चण्याचे पीठ आणि एक चमचा दही घ्या. हे मिश्रण एकत्र करा आणि त्याची पेस्ट तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी हात आणि पाय स्वच्छ धुवा. दररोज अंघोळ करताना तुम्ही या पॅकचा साबणाप्रमाणे वापर करू शकता. ज्यामुळे तुमचे गुडघे आणि कोपर स्वच्छ होतील.
टोमॅटोचा रस तुमच्या त्वचेसाठी खूपच चांगले असतं. कारण त्यामुळे तुमच्या हातापायांना उजळपणा येऊ शकतो. दररोज टोमॅटोचा रस लावल्यामुळे तुमची त्वचा उजळ आणि चमकदार दिसू शकते.
कसा कराल वापर
एका टोमॅटोचा रस घ्या. हा रस तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा. वीस मिनीटांनी तुमच्या गुडघे आणि कोपराजवळची त्वचा धुवून टाका. आठवड्यातून कमीत कमी चार ते पाच वेळा हा रस त्वचेवर लावा.
काकडीच्या रसात त्वचेला मुळापासून स्वच्छ करण्याची आणि त्वचेला थंडावा देण्याची क्षमता असते. म्हणूनच काकडीच्या रसामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते आणि त्यावरील काळसरपणा कमी होतो.
काय कराल वापर
काकडीचा रस काढून त्यात मधाचे काही थेंब टाका. हा रस तुमच्या गुडघे आणि कोपरावर लावा. सुकल्यावर हात आणि पाय स्वच्छ धुवून टाका.
आधीच वर सांगितल्याप्रमाणे वातावरण, ताणतणाव, धुळ-माती, अस्वच्छता, अणूवंशिक, त्वचेचं घर्षण, कोरडी त्वचा अशा अनेक कारणांमुळे तुमच्या हातापायाची त्वचा काळवंडू शकते.
सुर्यप्रकाशात फिरताना काळजी घ्या, सतत पाणी प्या. योग्य आणि पोषक आहार घ्या आणि त्वचेची योग्य स्वच्छता आणि निगा राखा.
होय, कारण गुडघे आणि कोपराची निगा सतत राखणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला एकदा चांगला परिणाम मिळाला तरी सतत त्वचेची काळजी घ्या.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -