'फर्स्ट इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन' ही बाब ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ऑफिसमधील तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते. पहिलीच छाप प्रभावी ठरल्यास ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबाबत वेगळीच प्रतिमा तयार होते. अशातच एखाद्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन कल्पना मांडण्यापूर्वीच सहकारी तुमच्याकडे एक तगडे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहू लागतील.काही जण तुमचे तोंडभरून कौतुक करतील, तर काहींचा अक्षरशः जळफळाटही होईल. पण स्वतःच्या चांगल्या वागणुकीतून त्यांचंही मन जिंकण्याचं प्रयत्न करा. ऑफिसच्या सुरुवातीच्या दिवसातच जर तुम्ही किंचितसा समजूतदारपणा दाखवल्यास पुढे जाऊन तुम्हाला याचा फायदा होईल. जाणून घेऊया कसं असावं ऑफिसमधील वर्तन…
वेळेला महत्त्व दिल्यास तुमची सर्व कामे योग्य वेळी पार पडतील, यात काही शंका नाही. यानुसारच ऑफिसची वेळदेखील चुकवून चालणार नाही. तुम्ही तुमच्या कामाप्रती किती गंभीर आहात, हे देखील सिद्ध होते. यावरून तुमच्यातील वेळ व्यवस्थापन कौशल्याचं दर्शन घडते. ठरलेल्या ऑफिस वेळेच्या पाच मिनिट आधी पोहोचलात तर तुम्हाला कामाच्या ठिकाणाशी योग्य पद्धतीनं जुळवून घेणे फायदेशीर ठरेल.
(वाचा : लग्नानंतर बदलतं मुलींचं आयुष्य, अशी करा मानसिक तयारी)
तुम्हाला विश्वास होवो अथवा न होवो. लोकांनी कितीही म्हटलं की आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीवरून पारखत नाही. तर तसं अजिबात नसते. तुमची बसण्या-उठण्याची सवय, जेवणाचा डबा, बॅगपासून ते तुमच्या लुकपर्यंत लोक तुम्हाला सतत पारखत असतात. त्यामुळे तुमच्या ऑफिस वातावरणाशी अनुकूल असा ड्रेस कोड निवडावा. छान, स्वच्छ फॉर्मल कपडे परिधान करून ऑफिसमध्ये गेल्यास तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण राहील. शिवाय, तुम्ही प्रोफेशनलदेखील दिसाल.
(वाचा : तुम्हाला हिवाळ्यात दही खायला आवडतं का, मग हे नक्की वाचा)
ऑफिसमध्ये सहकारी आणि आव्हानांप्रती आपला सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवा. सहकाऱ्यांसोबत कायम मैत्रिपूर्ण वर्तन असू द्यावे. ऑफिसमध्ये तुमच्या उर्जेची पातळी अशी असावी की तुमच्या आसपासचे वातावरण अतिशय हलकेफुलके आणि आनंदी राहीले पाहिजे.
(वाचा : 'ओम'कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता)
स्वतःच्या कामावर नियमित लक्ष असू द्यावे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करावे. पण सोबतच सहकाऱ्यांसोबतही आपलं नातं घट्ट करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये एखादा नवीन व्यक्ती रूजू झाल्यास स्वतःहून जाऊन त्याच्या संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्याला/तिला देखील नवीन ठिकाणी वावरणं सोपे जाईल.
सर्वात आधी आपल्या कामांची यादी तयार करून ठेवा. यानंतर जे काम अधिक महत्त्वाचे आहे, त्याची स्वतंत्र यादी करा. यामुळे तुमचे काम अतिशय सहज आणि सोपे होऊन जाते.
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.