ADVERTISEMENT
home / भ्रमंती
वेकेशनवर असताना ‘या’ टिप्स फॉलो करून राहा फिट

वेकेशनवर असताना ‘या’ टिप्स फॉलो करून राहा फिट

प्रत्येकीला आपण निरोगी आणि सुडौल दिसावं असं वाटत असतं. फिट राहण्यासाठी तुम्ही योग्य आणि संतुलित आहार घेता. नियमित व्यायामाची स्वतःला सवय लावता. मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या वेकेशनवर जाता तेव्हा तुमचं फिटनेस रूटीनवर पाणी पडतं. काही दिवसाच्या वेकेशन प्लॅनिंगमध्ये व्यायाम न करता आल्यामुळे पुन्हा घरी आल्यावर व्यायामाची सवय सुटते. ज्यामुळे पुन्हा स्वतःला व्यायामाची सवय लावणं कठीण जातं.सध्या वेकेशनचा सिझन सुरू आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यात वेकेशनवर जाण्याचा प्लॅन नक्कीच आखत असाल. म्हणूनच आम्ही तुम्हाला वेकेशनवर असतानाही व्यायामात सातत्य कसं राखावं हे सांगत आहोत. 

वेकेशनवर असताना असं फॉलो करा असं फिटनेस रूटीन –

वेकेशनवर असताना तुम्हाला व्यायाम आणि आहाराबाबत रूटीन सांभाळणं नक्कीच कठीण जातं. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि फिटनेसवर जाणवतो. यासाठीच या टिप्स वेकेशनवर असताना जरूर पाळा. 

Shutterstock

ADVERTISEMENT

व्यवस्थित प्लॅनिंग करा –

तुम्ही कुठेही वेकेशनवर जा मात्र कमीत कमी अर्धा तास व्यायाम आणि प्राणायम करा. जेव्हा  तुम्ही तुमच्या वेकेशनचं प्लॅनिंग करत असता तेव्हा तुम्ही यासाठी वेळ आधीच प्लॅन करू शकता. यासाठी वेकेशनवर असताना अशा पर्यटनस्थळांची निवड करा. ज्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी अर्धा तास चालणे, पोहणे, सायकल चालवणे, डान्स असे व्यायाम करू शकता. 

वेकेशनवर असताना अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा –

काही लोकांना डोंगरावर चढायला आवडतं तर काही जणांना गाडीतून फिरायला आवडतं. कोणाला काय आवडेल हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. मात्र जर तुम्ही फिटनेस लव्हर असाल तर निसर्गरम्य जागी जरूर भेट द्या. डोंगर, नदी, गार्डन अशा ठिकाणी  फिरण्यामुळे तुमचा आपोआप व्यायाम होईल. 

मोबाईलमध्ये फिटनेस अॅप डाऊनलोड करा –

व्यायामाची आठवण राहण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये  फिटनेस अॅप डाऊनलोड करा. काही मोबाईल अॅपमुळे तुम्हाला साधनसामुग्रीशिवाय व्यायाम करण्याच्या काही टिप्स मिळू शकतात.

स्विमिंग पूल, जीम असलेले हॉटेल निवडा –

जर तुम्हाला वेकेशनवर असताना तुमचं फिटनेस रूटीन तसंच सुरू ठेवायचं असेल तर ही गोष्ट अवश्य पाळा. यासाठी तुम्ही ज्या हॉटेलचं बुकींग करत आहात तिथे जीम, स्विमिंग पूल असेल याची काळजी घ्या. कारण मौजमजा करत तुम्ही हॉटेलवरही तुमचं फिटनेस रूटीन यामुळे फॉलो करू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या बॅगेत हेल्दी स्नॅक्स ठेवा –

तुम्ही प्रवासात काय खाता यावर तुमचं फिटनेस अवलंबून आहे. प्रवासात असताना तुम्ही जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्कीच होतो. यासाठी तुमच्या ट्रॅव्हल बॅगेत प्रोटिन बार, शेंगदाणे, सुकामेवा, फळे असे काही तरी हेल्दी स्नॅक्स जरूर ठेवा. 

वेकेशनवरून घरी आल्यावर व्यायामाचा कंटाळा करू नका –

वेकेशनवरून आल्यावर आपण पुन्हा फिटनेस रूटीन सुरू करण्यासाठी बऱ्याचदा टाळाटाळ करतो. हे नक्कीच चुकीचे आहे. कारण आज नको उद्या करू यामुळे तुम्ही कधीच व्यायामाची सुरूवात करत नाही. यासाठी आल्यावर कितीही कंटाळा आणि थकवा जाणवत असेल तरी थोडा वेळ व्यायाम जरूर करा. 

या काही छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचे फिटनेसचं रूटीन फॉलो करणं सोपं जाईल. ज्यामुळे तुम्ही वेकेशनचा आनंदही घ्याल आणि निरोगीदेखील राहाल. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

कार अथवा बसने प्रवास करताना उलटीचा होतो त्रास, ट्राय करा 5 टिप्स

ADVERTISEMENT

प्रवासात प्रत्येक मुलीकडे असायलाच हवे ‘Travel kit’

प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

 

 

ADVERTISEMENT

 

23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT