चहामध्ये साखरेपेक्षा वापरा मध, जाणून घ्या फायदे

चहामध्ये साखरेपेक्षा वापरा मध, जाणून घ्या फायदे

जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा साखरेपेक्षा त्याठिकाणी साखरेचे क्यूब्स ठेवण्यात येतात. तुमच्या स्वादानुसार तुम्ही हे क्यूब्स वापरता. घरातही तुम्ही चहा तयार करताना साखर वापरता. नेहमी आपल्याला साखर ही आपल्या शरीरासाठी चांगली नसते हे सांगितलं जातं. पण आपण तरीही चहामध्ये साखर घालूनच चहा पितो. पण त्याला पर्याय म्हणून आता बाजारामध्ये सहा महिन्यात मधाचे क्यूब्सदेखील येणार आहेत. पण तुम्ही चहामध्ये मध घालून पिऊन बघा. तुम्ही तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा पर्याय नक्की वापरून बघायला हवा. यामुळे तुमचं शरीर निरोगीदेखील राहतं आणि तुम्हाला त्याचे फायदेही मिळतात. साखरेपेक्षा मध हा आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी योग्य पर्याय असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. इतर गोष्टीत आपण मधाचा वापर करतोच. पण चहामध्ये मधाचा वापर केल्यास, त्याचाही तुमच्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल. 

साखरेने होतं नुकसान, मधाने नाही

Shutterstock

शरीरावर साखरेचा दुष्परिणाम होत असतो. यामुळे मधुमेहासारखे आजारही निर्माण होतात याची सगळ्यांच कल्पना आहे.  पण मग याला पर्याय काय असाही प्रश्न उपस्थित राहतो. चहासारख्या पेयामध्ये साखर हीच गोष्ट आहे असं सगळ्यांना वाटतं. कारण साखरेची चव ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला येऊ शकत नाही  असं चहाप्रेमींंचा समज आहे. पण खरं तर तुमच्या शरीराासाठी साखरेला पर्याय म्हणून तुम्ही मधाचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला फायदा तर होतोच. शिवाय साखरेने होणाऱ्या नुकसानापासून तुम्ही चार हात लांब राहाता. मधामध्ये रासायनिक तत्वातही साधी साखर असते. पण पांढऱ्या साखरेमध्ये शरीराला हानी पोहचवण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामध्ये साधारण 30 टक्के ग्लुकोज आणि 40 टक्के फ्रक्टोजचं प्रमाण असतं. मधामध्ये  स्टार्ची फायबर डेक्सट्रिन असतं. हे मिश्रण शरीरातील रक्ताच्या पातळीचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं. त्याशिवाय मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, विटामिन सी, मिनरल्स, अमिनो अॅसिड्स आणि काही एन्जाईम्सदेखील असतात. चहा साधारण दिवसातून 3-4 वेळा तर नक्कीच घेतला जातो. मग अशावेळी साखरेचा सतत तुमच्या शरीरामध्ये इनटेक होत असतो. मग त्यापेक्षा शरीराला फायदेशीर मध वापरून तुम्ही तुमचं शरीर अधिक आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न करू शकता.

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांपासून सुटका देईल मध

साखरेच्या तुलनेत मध असतो कमी प्रोसेस्ड

Shutterstock

मधामध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल घटकांमुळे किटाणूंना मारण्यासाठी याचा जास्त उपयोग करून घेता येतो. यामुळे शरीरातील प्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत मिळते. तसंच तुम्ही जेल फॉर्ममध्ये वापरलात तर तुमच्या लहान-सहान आलेल्या जखम अथवा जळण्यावर अथवा घाव असल्यास, त्यावरही फायदेशीर आहे. याशिवाय सर्दी - खोकला यासाठी औषध म्हणून तुम्ही मधाचा चहा बनवून दिल्यास त्याचा शरीराला जास्त प्रमाणात फायदा होतो. साखरेच्या तुलनेत मधामध्ये कमी प्रोसेस्ड असते. त्यामुळे तुमच्या शरीराला जास्त फायदा याचा होतो. म्हणूनच चहा ही गोष्ट बऱ्याच जणांच्या शरीरालामध्ये जास्त प्रमाणात जात असते. त्यामुळे सहसा साखरेचा वापर  न करता मधाचा वापर केल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. केवळ चहातूनच नाही तर तुम्ही मध रोज एक चमचा कच्चा खाल्ला तरीही त्याचा तुमच्या शरीराला फायदा मिळू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा. 

सौंदर्य आणि आरोग्यवर्धक आहे मध, जाणून घ्या फायदे

साखरेच्या तुलनेत मध पचवणं अधिक सोपं

Shutterstock

तुमच्या शरीराच्या पचनतंत्रासाठीही मध हा साखरेपेक्षा सरस ठरतो. साखर पचवण्यापेक्षा शरीरात मध पचवणं सहज सोपं आहे. आपल्या कम्पोझिशनच्या कारणाने साखर शरीरात गेल्यानंतर ती तुटून पचण्यासाठी जास्त वेळ लागते. पण मध हा मुळातच मधमाशा इन्जाइम्स करतात त्यामुळे तो पचवणं सहज होतं. तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठीही याचा अधिक उपयोग होतो. त्यामुळे चहा पिताना त्यात मध घालून पिणं जास्त सोयीस्कर आणि शरीराला लाभदायक ठरतं. तुम्हीही जर साखरेचा वापर करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही मधाचा चहा पिण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून तुमच्या शरीराला याचा फायदा मिळेल. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.