रात्र बनवायची आहे अधिक रोमँटिक तर नक्की खेळा किसिंग गेम

रात्र बनवायची आहे अधिक रोमँटिक तर नक्की खेळा किसिंग गेम

रोजच्या आयुष्यात आपल्या जोडीदाराबरोबर रोमँटिक क्षण घालवण्याची गरज असते. आपलं नातं टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात रोमान्स आणि मजेशीर क्षण कायम आणायला हवेत. रोजच्या धावपळीत आणि जगण्यात एकमेकांबरोबर जगणं राहून जातं. पण तुमच्या नात्यातील स्पाईस जपून ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर रोमँटिक व्हायलाच हवं. तुमची रात्र तुम्हाला अधिक रोमँटिक बनवायची असेल तर काही खास किसिंग गेम तुम्ही खेळू शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला अधिक तुमच्या जवळ घेऊन येऊ शकता. लव्ह लाईफ म्हणजे फक्त सेक्स आणि इंटरकोर्स नाही. तर तुमचं बाँडिंग किसिंंगमुळे अधिक चांगलं होत असतं. आम्ही तुम्हाला लेखातून काही खास किसिंग गेम सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सेक्सपूर्वी फोरप्लेदरम्यान त्याचा नक्की वापर करू शकता. सेक्स पटकन संपवण्यापेक्षा त्याची मजा घेत केल्यास, तुमचं आरोग्य आणि नातं दोन्ही हेल्दी राहातं. पाहूया काय आहेत हे किसिंग गेम. 

1. ओपन आय गेम

Shutterstock

प्रत्येकाला माहीत असतं की किस करताना तुमचे डोळे आपोआप बंद होतात. कारण जेव्हा तुम्ही एकमेकांजवळ येता आणि किस करायचं असतं तेव्हा तुम्हाला एकमेकांचा स्पर्श अधिक जाणवून घ्यायचा असतो. त्यासाठी आपले डोळे आपोआप किस करताना बंद होतात. पण हा गेम खेळताना तुम्हाला डोळे बंद करायचे नाहीत. त्यातच खरी मजा आहे. या गेममध्ये तुमच्या जोडीदाराला स्मूच करताना डोळे बंद करायचे नाहीत. तुमच्या दोघांपैकी ज्याचे डोळे जास्त वेळ किस करताना उघडे राहतील ती व्यक्ती जिंकेल. यामध्ये जो जिंकेल त्याच्या मनाप्रमाणे तुम्ही पुढे  सेक्स करायचं. ऐकायला खूपच एक्सायटिंग वाटत आहे ना? नक्की हा गेम खेळून बघा. 

2. पिन द लिप्स

Shutterstock

पुढच्या गेम तुम्ही खेळू शकता पिन द लिप्स. आता यामध्ये  नक्की काय करायचं? या गेममध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यांवर पट्टी बांधून जोडीदाराला थोडंसंं गोल गोल फिरवा आणि जोडीदारापासून थोड्या लांब अंतरावर जाऊन उभे राहा. आता तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वेगवेगळ्या शरीराच्या भागाचं नाव घ्या. उदाहरणार्थ डोळे, मान, बूब्स. तुमच्या जोडीदाराला डोळ्यांना पट्टी बांधून तुमच्या या भागांना हळूवार स्पर्श करायचा आहे. या खेळामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या अधिक जवळ जाता येतं आणि एकमेकांच्या अधिक जवळ जाऊन तुमच्यातील झालेला दुरावा दूर करता येतो. असं करताना तुम्हालाही तुमच्या रोजच्या बोअर आयुष्यात अधिक मजा करता येते. 

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

3. कँडी गेम

Shutterstock

तुम्ही आणि तुमचा जोडीदार जर कँडी लव्हर असाल तर तुम्हाला हा गेम नक्कीच आवडेल. या गेममध्ये तुम्ही तुमच्याजवळ काही कँडी घेऊन बसा. तुम्हा दोघांच्याही डोळ्यांवर पट्टी असायला हवी. तुमच्यापैकी एकाने कँडी खा.  त्यानंतर तुम्ही फ्रेंच किस करा. आता तुमच्या जोडीदाराने तुम्ही खाल्लेल्या कँडीचा स्वाद सांगायचा आहे. कोणत्या फ्लेवरची कँडी खाल्ली आहे हे जर ओळखता आलं नाही तर तुम्ही त्यांना तुम्हाला हवी ती शिक्षा देऊ शकता. पण ही शिक्षादेखील अशी असायला हवी की,  तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकाल. 

आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स

4. रेड लस्ट

Shutterstock

या गेममध्ये तुम्हाला म्युझिकवर केवळ तुमच्या जोडीदाराला नाचवयाचं नाहीये तर म्युझिक प्लेअरची कमांड पण तुम्हाला तुमच्या हातात ठेवायची आहे.  तुम्ही न बघता गाणं स्टॉप करा आणि तुमच्या जोडीदाराला असेल त्या पोझिशनमध्ये स्टॅच्यू व्हायचं आहे. त्याच पोझिशनमध्ये तुम्ही त्याना स्मूच करायचं आहे. आहे ना मजेशीर गेम. मग वाट कसली पाहताय? आज रात्री होऊन जाऊ दे हा मजेशीर गेम. 

किस घेताय ना...किस घेण्यालाही असतात अर्थ

5. फ्रूटी किस

Shutterstock

या नावावरूनच तुम्हाला थोडी कल्पना आली असेल. या गेममध्ये केळं, सफरचंद अथवा संत्र यासारखी फळं तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आणि तुमच्या ओठांवरमध्ये होल्ड करून ठेवायची आहेत आणि हळूहळू दोन्ही बाजूंनी हे फळ चावायचं आहे. लास्ट बाईटनंतर काय होणार हे तुम्हाला माहीतच आहे. आठवूनच तुम्हाला नक्की अंगावर रोमांच आले असतील ना? नक्की हा गेम तुम्ही ट्राय करा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.