Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi - तुमच्या स्किनटोननुसार तुमच्यासाठी या लिपस्टिक शेड आहेत बेस्ट | POPxo

तुमच्यासाठी ही लिपस्टिकची शेड आहे परफेक्ट Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

तुमच्यासाठी ही लिपस्टिकची शेड आहे परफेक्ट Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi

मेकअप किटमधील इतर कोणत्याही साहित्याबद्दल तुम्हाला काही माहीत नसेल तर चालू शकते. पण तुम्हाला लिपस्टिकबद्दल योग्य ती माहिती असायला हवी. कारण ओठांवर लिपस्टिक फिरवल्यानंतर तुमच्या लुकमध्ये लगेचच फरक पडतो. पण तुम्ही निवडत असलेल्या लिपस्टिकचा रंग तुमच्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे कित्येक जणींना माहीत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला लिपस्टिकच्या परफेक्ट शेडविषयी सांगणार आहोत. मग करुया सुरुवात

Table of Contents

    लिपस्टिकचे वेगवेगळे प्रकार (Types of Lipsticks)

    लिपस्टिकचे जितके रंग आहेत तितकेच लिपस्टिकचे प्रकारही आहेत. त्यामुळे तुम्ही आधी लिपस्टिकचे प्रकार जाणून घेणे फारच गरजेचे असते. त्यामुळे आधी आपण जाणून घेऊया  लिपस्टिकचे वेगवेगळे प्रकार 

    1. मॅट लिपस्टिक (Matt Lipstick)

    मॅट लिपस्टिकचा ट्रेंड सध्या जास्त आहे. तुम्ही एखादी लिपस्टिक लावल्यानंतर जेव्हा ती तुमच्या ओठांना लावल्यासारखीही वाटत नाही किंवा ती तुमच्या ओठांना समरुप झाल्यासारखी वाटते अशी लिपस्टिक मॅट लिपस्टिक असते. हल्ली तुम्हाला मॅट लिपस्टिकमध्ये अनेक शेड दिसतील आणि त्याचे अनेक प्रकारही दिसतील. सर्वसाधारणपणे ही लिपस्टिक तुम्हाला ऑफिसससाठी वापरता येईल.

    वाचा - मेकअप ब्रश

    2. ग्लॉसी लिपस्टिक (Glossy Lipstick)

    Shutterstock
    Shutterstock

    ज्या लिपस्टिक्स लावल्यानंतर तुमच्या ओठांवर चमक येते. त्याला ग्लॉसी लिपस्टिक म्हणतात. या लिपस्टिक लावल्यानंतर तुमचे ओठ छान चमकतात. ग्लॉसी लिपस्टिकमध्ये लिक्वीडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळेच तुमचे ओठ तुम्हाला ओले वाटत राहतात. यामध्ये तुम्हाला ग्लिटर आणि रंगाचे अनेक पर्याय मिळतात.

    3. क्रिम लिपस्टिक (Creamy Lipstick)

    अनेकदा काहींना लिपस्टिक लावल्यानंतर त्याला ओठांना भेगा पडल्याचे वाटते अशावेळी क्रिम लिपस्टिकचा वापर करा असे म्हटले जाते. तर या क्रिम लिपस्टिकचा बेस हा क्रिम असल्यामुळे ही लिपस्टिक ओठांवर छान राहते. ती छान पसरते सुद्धा म्हणूनच जर तुम्हाला जास्त वेळ लिपस्टिक टिकवायची असेल तर तुम्ही अशा लिपस्टिक वापरु शकता.

    4. सॅटीन आणि शीअर लिपस्टिक (Satin and Sheer lipstick)

    Shutterstock
    Shutterstock

    तसं पाहायला गेलं तर सॅटीन लिपस्टिक आणि क्रिम लिपस्टिकमध्ये फारसा फरक नाही. सॅटीन लिपस्टिकचा स्ट्रोक पटकन बसतो. त्यामध्ये ग्लिटर नसते. तर शीअर लिपस्टिकमध्ये तुम्हाला ग्लीटर पार्टीकल दिसतील. 

    वाचा - कोरड्या ओठांसाठी लिप बाम

    5. क्रेऑन लिपस्टिक (Crayon Lipstick)

    खडूच्या स्वरुपात असलेली ही लिपस्टिक ही हल्ली सर्रास उपलब्ध आहे. चॉक फॉर्ममध्ये असल्यामुळे तुम्हाला या लिपस्टिकला टोक काढावे लागते. ही लावणे थोडे कठीण असते. कारण ही लिपस्टिक तुम्हाला नीट लावावी लागते.

    तुमच्यासाठी लिपस्टिकची निवड करताना लक्षात घ्या या गोष्टी (Tips for Choosing The Right Lipstick)

    लिपस्टिकचे प्रकार पाहिल्यानंतर आता आपण लिपस्टिक निवडताना तुम्ही नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ते देखील आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. सर्वसाधारणपणे तुम्ही या गोष्टी फॉलो करायला हव्यात.

    थंडीत हे फूट स्क्रब आणि फूट क्रिम तुमचे पाय ठेवतील कोमल

    1. वय (Age)

    Shutterstock
    Shutterstock

    लिपस्टिक लावण्याचे वय असे काही नाही. पण लिपस्टिकची शेड निवडताना तुम्हाला तुमच्या वयाचा विचार करावा लागतो. कारण तुम्ही कोणत्याही वयात कोणताही शेड लावू शकत नाही. त्यामुळे लिपस्टिकची निवड करताना तुम्ही या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.  

    उदा. जर तुम्ही साधारण 25 ते 30 घरात असाल तर तुम्हाला गोड गुलाबी किंवा फार लाईट कलर उठून दिसेल पण तो तुमची पर्सनॅलिटीला चांगला दिसणार नाही. त्याने तुम्ही अल्लड किंवा लहान वाटाल.

    महिन्याभरात मिळवा तुम्हाला हवी असलेली सुंदर त्वचा... तेही घरच्या घरी

    2. चेहरा (Face)

    आता तुमचा चेहऱ्याचा आकारही लिपस्टिक निवडीमध्ये महत्वाचा असतो. याचे कारण असे की, तुमचा चेहरा फार लहान असेल आणि तुम्ही फार गडद लिपस्टिक निवडत असाल तर ती तुमचा संपूर्ण चेहरा झाकोळू शकते. जर तुमचा चेहरा मोठा असेल आणि तुम्ही गडद लिपस्टिक लावली असेल तर तुमचा चेहरा पान खाल्ल्यासारखा वाढू शकेल. 

    उदा. जर तुमचा चेहरा चौकोनी आहे आणि तुम्ही फार गडद लिपस्टिक लावली असेल तर तुमच्या चेहऱ्यावर ती उठून किंवा खुलून दिसणार नाही.

    3. तुमचा स्किनटोन (Complexion)

    Shutterstock
    Shutterstock

    तुमचा रंग सावळा की गोरा असा भेद आम्हाला मुळीच करायचा नाही. पण तुमच्या स्किनटोननुसार तुम्ही त्याची निवड करणे फारच गरजेचे असते. नाही तर तुम्हाला लिपस्टिक चांगल्या दिसणार नाहीत. तुमच्या स्किनटोननुसार लिपस्टिक निवडण्यामागे त्या खुलून दिसणे जास्त आवश्यक असते. 

    उदा. तुमचा रंग फारच गोरा आहे म्हणून तुम्ही खूप ब्राईट म्हणजे लाल किंवा भडक रंगाचा प्रयोग करत असाल तर ते तुम्हाला नेहमी लाऊड लुक देऊ शकतात. तुमचा रंग सावळा असेल आणि तुम्ही खूपच फिक्कट रंग निवडला असेल तरी तो तुम्हाला चांगल दिसणार नाही.

    4. कामाचे स्वरुप (Work Type)

    तुमच्या कामाचे स्वरुप काय या नुसारही तुम्ही लिपस्टिकची शेड निवडायला हवी. लिपस्टिकचा प्रकार निवडायला हवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी बोलायचे असते. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल, शाळेत शिक्षिका किंवा प्रोफेसर असाल किंवा मग मीडिया क्षेत्राशी निगडीत असाल तुम्हाला सतत लोकांशी बोलायचे असते. अशावेळी तुम्ही निवडलेला रंग हा परफेक्टच हवा.

    उदा. तुम्ही शिक्षिका असाल आणि तुम्ही लाल रंगाची लिपस्टिक लावली तर ती तुमच्या कामाच्या ठिकाणी अजिबात चांगली नाही. कारण असा रंग तुमची पर्सनॅलिटी चुकीची दाखवतो.

    कपड्यावरील डाग काढण्यासाठी घरगुती टिप्स

    5. कामाच्या वेळा (Working Hour)

    जर तुमच्या कामाच्या वेळा अधिक असतील तर तुम्हाला दिवसभर टिकणारी लिपस्टिक हवी. म्हणजे तुम्हाला जास्त वेळा लिपस्टिक लावायला नको. म्हणूनच कामाच्या वेळा देखील तुम्हाला माहीत असणे फारच गरजेचे असते. 

    उदा. जर तुम्हाला मिटींग आणि सतत कोणाशी बोलायचे असेल अशावेळी तुम्ही लाँग लास्टिंग लिपस्टिकची निवड करा.

    तुमच्या स्किनटोननुसार तुमच्यासाठी या लिपस्टिक आहेत बेस्ट (Lipstick Shades For Indian Skin Tone In Marathi)

    Shutterstock
    Shutterstock

    आता लिपस्टिकची निवड करायची म्हणजे तुम्हाला तुमच्या स्किनटोनचा विचार करणेही आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्किनटोननुसार लिपस्टिकची कोणती शेड तुमच्यासाठी परफेक्ट आहे ते देखील सांगणार आहोत.

    1. गोरा त्वचेच्या टोनसाठी लिपस्टिक शेड (Fair/Light Skin Tone)

    जर तुमचा रंग लाईट असेल किंवा गोरा (हा शब्द वापरणे योग्य नाही) पण काहींचा वर्ण फारच उजळ असतो अशांना कोणत्याही लिपस्टिकच्या शेड चांगल्या दिसतात हे जरी खरे असले तरी देखील तुम्ही काही काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही जराही गडद रंग लावला तरी तुमचा लुक पूर्णपणे बदलून जातो. त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही 6 लिपस्टिकच्या शेडची निवड केली आहे. 

    Maybelline New York Color Sensational Creamy Matte Lipstick

    जर तुम्हाला गुलाबी रंग आवडत असेल तर तुम्ही असा गुलाबी रंग घेऊ शकता. पण जर तुम्ही कोणत्या ऑफिसच्या कार्यक्रमासाठी जाणार असाल तिथे तुम्ही सिनिअर म्हणून जाणार असाल तर तुम्ही या रंग निवडू नका. जर निवडलात की, तर तो फार लावू नका अगदी हलका लावा.

    Make Up

    Maybelline New York Color Sensational Creamy Matte Lipstick

    INR 299 AT Maybelline

    M.A.C Lipstick / Mini - Lady Danger

    गोऱ्या वर्णाला केशरी रंग ही उठून दिसतो. हा रंग तुम्ही कधीही लावू शकता. तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही वेअरवर असे ड्रेस आरामात घालता येतील.

    Make Up

    M.A.C Lipstick / Mini - Lady Danger

    INR 1,050 AT M.A.C

    Nykaa Wonderpuff! Lip & Cheek Cushion Lipstick Tint - Carpe Diem

    जर तुम्हाला लाल किंवा गुलाबी रंग वापरुन कंटाळा आला असेल तर तुम्ही चॉकलेटी रंगाची ही शेड ट्राय करु शकता. ही शेड तुम्हाला छान दिसेल.

    Make Up

    Nykaa Wonderpuff! Lip & Cheek Cushion Lipstick Tint - Carpe Diem

    INR 899 AT Nykaa

    Kay Beauty Matteinee Matte Lipstick

    कतरिना कैफच्या ब्युटी रेंजमधील हे प्रोडक्टही फार चांगले आहेत.तुम्हाला हा शेडही नक्की ट्राय करता येईल. तुम्हाला हा रंग ट्रेडिशनलवेअरवर घालता येईल. 

    Make Up

    Kay Beauty Matteinee Matte Lipstick

    INR 799 AT Kay Beauty

    Lakme Absolute Lip Pout Matte Lip Color - Pink Fantasy

    तुम्हाला थोडा फ्रेश रंग आवडत असतील तर तुम्ही हा रंग ही कधी कधी वापरु शकता. तुमच्या स्किनटोनला हा रंग खुलून दिसतो. पण तुम्ही मध्यमवयीन असाल तर हा रंग टाळा. 

    Make Up

    Lakme Absolute Lip Pout Matte Lip Color - Pink Fantasy

    INR 608 AT Lakme

    Power Bullet Matte Lipstick - Bachelorette

    तुम्हाला पार्टीसाठी परफेक्ट शेड हवी असेल तर तुम्ही ही शेड निवडू शकता. ही शेड तुम्हाला खुलून दिसेल.

    Make Up

    Power Bullet Matte Lipstick - Bachelorette

    INR 1,995 AT Huda beauty

    2. गव्हाळ त्वचेच्या टोनसाठी लिपस्टिक शेड (Lipsticks For Wheatish Skin Tone)

    आता सर्वसाधारणपणे सगळ्यांचाच रंग गव्हाळ रंगामध्ये येतो. जर तुमचा रंग गव्हाळ असेल तर तुमच्यासाठीही रंगाचे अनेक पर्याय आहेत जे तुम्ही नक्कीच ट्राय करुन पाहायला हवे तुमच्यासाठीही आम्ही काही रंगाची निवड केली आहे ते रंग कोणते ते पाहुया

    Rimmel London Lasting Finish Matte Lipstick

    जर तुम्हाला रेग्युलरसाठी लिपस्टिक हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारचा रंग निवडू शकता. पण हा रंग लावताना जास्ती स्ट्रोक लावू नका. कारण तो जास्त गडद दिसेल. 

    Make Up

    Rimmel London Lasting Finish Matte Lipstick

    INR 293 AT Rimmel London

    NYX Professional Makeup Powder Puff Lippie Cream - Boys Tears

    तुम्हाला खूप लाल लिपस्टिक नको असेल तर तुम्ही हा रंग नक्कीच निवडू शकता. तुम्हाला क्रिम आणि लाँग लास्टींग अशी लिपस्टिक नक्की ट्राय करु शकता.

    Make Up

    NYX Professional Makeup Powder Puff Lippie Cream - Boys Tears

    INR 650 AT NYX

    Mettle Liquid Lipstick - 10 Mimosa (Deep pinkish red with blue undertone)

    तुम्हाला लाल रंग आवडत असेल तर मग तुम्ही अशा प्रकारची लिपस्टिक निवडू शकता. ही लिपस्टिक तुम्हाला छान उठून दिसते. तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात किंवा फॉर्मल इव्हेंटला या रंगाची लिपस्टिक लावता येईल.

    Make Up

    Mettle Liquid Lipstick - 10 Mimosa (Deep pinkish red with blue undertone)

    INR 1,199 AT sugarcosmetics

    Always On Liquid Lipstck

    चॉकलेटी रंगाची शेड अनेकदा गव्हाळ रंगाला उठून दिसते. जर तुम्हाला थोडा वेगळा रंग ट्राय करायचा असेल तर तुम्ही हा रंग नक्की ट्राय करु शकता.

    Make Up

    Always On Liquid Lip Stick - Out Loud

    INR 2,100 AT SMASHBOX

    Limited Edition Nothing Else Matter Longwear Lipstick

    ब्राऊन आणि रेडचे कॉम्बिनेशन असलेला हा शेड तुम्हाला नक्कीच ट्राय करायला हवा कारण हा तुम्हाला कधीही लावता येईल शिवाय हा जास्त टिकणारा सुद्धा आहे. 

    Make Up

    Limited Edition Nothing Else Matter Longwear Lipstick

    INR 599 AT sugarcosmetics

    Liquid Matte Lip Stick - Praline

    तुम्हाला लिक्वीड लिपस्टिकमधील हा पर्याय ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. हा रंग तुम्हाला चांगला दिसू शकतो. 

    Make Up

    MAKE UP FOR EVER Liquid Matte Lip Stick - Praline

    INR 1,950 AT MAKE UP FOR EVER

    3. सावळा टोनसाठी लिपस्टिक शेड (Lipstick Shades For Dusky Skin Tone)

    जर तुमचा रंग सावळा असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी लिपस्टिकच्या अनेक शेड उपलब्ध आहेत. जरी तुमचा वर्ण उजळ नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला काही शेड्स या फारच उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही या शेड्स नक्की ट्राय करुन पाहा.

    Nothing Else Matter Longwear Lipstick - 16 Cloud Wine (Burgundy, Red Berry)

    गव्हाळ रंगाला गडद रंग फारच उठून दिसतात. तुम्ही बर्गेंटीमधील ही शेड अगदी आरामात निवडू शकता. तुम्हाला ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी हा रंग निवडता येईल. 

    Make Up

    Nothing Else Matter Longwear Lipstick - 16 Cloud Wine (Burgundy, Red Berry)

    INR 499 AT SUGAR

    Mettle Matte Lipstick - 05 Hedone (Orange toned Red)

    हा रंग गोरा आणि सावळा दोघांनाही छान उठून दिसतो. तुम्हाला लाल आणि केशरी रंगाचे कॉम्बिनेशन हवे असेल तर तुमच्यासाठी हा रंग एकदम बेस्ट आहे. त्यामुळे तुमच्या मेकअप किटमध्ये हा एक तरी रंग हवा.

    Make Up

    Mettle Matte Lipstick - 05 Hedone (Orange toned Red)

    INR 1,099 AT sugarcosmetics

    Mettle Liquid Lipstick - 05 Polaris (Medium dark, muted berry red)

    जांभळ्या रंगाची शेड ही थोडी वेगळी आणि नेहमीच चांगली दिसते. जर तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी ही लिपस्टिक चांगली दिसू शकेल.

    Make Up

    Mettle Liquid Lipstick - 05 Polaris (Medium dark, muted berry red)

    INR 1,199 AT sugarcosmetics.

    Maybelline New York Super Stay Matte Ink Liquid Lipstick - 80 Ruler

    जर तुम्हाला गुलाबी आणि लाँग लास्टिंग असे काही हवे असेल तर तुम्ही हा पर्याय नक्की निवडू शकता. तुमच्यावर हा रंग नक्कीच खुलून दिसू शकेल. तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये किंवा कॅज्युअल मिटींगसाठी हा रंग तुम्ही निवडू शकता. 

    Make Up

    Maybelline New York Super Stay Matte Ink Liquid Lipstick - 80 Ruler

    INR 650 AT Maybelline

    Artist Rouge Lip Stick - Powder Pink

    तुम्हाला गुलाबी रंग लावायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा गुलाबी रंग सुद्धा निवडू शकता. हा रंग तुम्हाला अजिबात विचित्र दिसणार नाही.

    Make Up

    MAKE UP FOR EVER Artist Rouge Lip Stick - Powder Pink

    INR 1,950 AT MAKE UP FOR EVER

    Masaba By Nykaa Lipstick

    लाल रंग हा नेहमीच सावळ्या स्किनटोनला उठून दिसतो. तुम्ही रोजच्या वापरासाठी अशी लाल लिपस्टिक वापरली तरी चालू शकते. किंवा तुम्हाला अगदीच सवय नसेल तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी ही लिपस्टिक लावू शकता.

    Make Up

    Masaba By Nykaa Lipstick

    INR 479 AT Nykaa

    तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

    लिपस्टिक ग्लुटन फ्री आहे का?

    ग्लुटेन शरीरात पटकन शोषले जातात म्हणूनच ग्लुटेन फ्री प्रोडक्टची नेहमीच मागणी केली जाते. तुमच्या पोटात ग्लुटेन जाऊ नये म्हणून तुम्ही ग्लुटेन फ्री लीप बाम आणि लिपस्टिक वापरायला हवी. लिपस्टिक ग्लुटेन फ्री नसतात. पण काही ब्रँडमध्ये तुम्हाला ग्लुटेन फ्री लिपस्टिक मिळू शकतील. 

    लिपस्टिक कशी काढावी?

    लिपस्टिक मेकअपचा एक भाग आहे. ती कितीही सुरक्षित असली तरी दिवसाअखेरीस तुम्ही तुमची लिपस्टिक काढणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही मेकअप क्लिनझरचा उपयोग करुन तुमची लिपस्टिक काढू शकता. पाण्याने लिपस्टिक कधीच जात नाही. ती आतपर्यंत तुमच्या त्वचेत जाते. त्यामुळे ओठ काळे पडण्याची शक्यता असते. हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही लिपस्टिक दिवसाअखेरीस काढून टाका.

    लिपस्टिक रोज लावणे सुरक्षित आहे का?

    लिपस्टिकमध्ये केमिकल्स असले तरी नैसर्गिक घटक असलेले लिपस्टिक मिळतात. त्यामुळे त्या रोज लावणे सुरक्षित असते. जर तुम्हाला रोज लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही चांगल्या प्रतीची लिपस्टिक निवडणेही जास्त गरजेचे असते. त्यामुळे हलक्या प्रतीची लिपस्टिक निवडण्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रतीची लिपस्टिक निवडा. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे लिपस्टिक लावणे तसे सुरक्षित असते. 

    खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या क्लिक करा.

    You Might Like This:

    त्वचेच्या समस्या आणि त्यावरील मसूर डाळीचे DIY फेसपॅक