नवं वर्ष… नवं कॅलेंडर...आणि नवा उत्साह… नव्या वर्षासाठी तुम्ही आतापर्यंत छान सेट झाला असाल. नव्या वर्षात काय करायचे त्याचे प्लॅनिंगही तुम्ही अगदी छान केलं असेल. पण नवीन वर्षात काय टाळायचं हे तुम्ही ठरवलं आहे का? जर तुम्ही नव्या वर्षात काय टाळायचं याची यादी बनवली नसेल तर तुम्ही आताच ही यादी तयार करुन ठेवा. कारण काय करायचे याही पेक्षा काय टाळायचे हे फार महत्वाचे असते. त्यामुळे तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आपण सगळेच पैसा कमावतो खर्च करण्यासाठी… पण तुम्ही अगदी सढळ हस्ताने मस्त पैसे खर्च करत असाल तर थोडा ब्रेक लावा. हा आता पैसे तुमचे आहेत तुम्ही त्याचं काहीही करु शकता. या वर्षात पैसे खर्च करण्याची चूक करु नका. हीच ती संधी हीच ती वेळ ज्यावेळी तुमचे पालक तुम्हाला सांगतात की, अरे पैसे साठवून ठेवतोयस ना कामाला येतील? त्यांचा हा डायलॉग ऐकून तुम्ही बोअर झाला असाल तरी यंदा ही चूक करु नका. उलट तुम्ही यंदा पैशांचे नियोजन करायला घ्या. म्हणजे तुमचा सगळा पगार गुंतवा असं आम्ही अजिबात सांगणार नाही. पण त्यातील किमान 5 टक्के तरी तुम्ही गुंतवणूक करा. योग्य मार्गदर्शन करत पैशांच्या बचतीचा श्रीगणेशा करा.
काही जणांना प्रेम सतत होतं तर काहींना प्रेम एकदाच होतं आणि कायम राहतं आता प्रॅक्टिकली विचार केला तर ‘दुनिया मै आयो हो तो जीना ही पडेगा...जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा’ रिलेशनशीपच्या बाबतीत तुम्ही कायम गोंधळलेले असाल तर तुमचा गोंधळ तुम्ही पुढच्या वर्षी नेऊ नका. जे काय आहे ते 2019 मध्येच संपवा. सतत प्रेम होणाऱ्यांनी स्वत:ला जरा आवरा. मोबाईचे कव्हर बदलल्याप्रमाणे तुम्ही तुमचे मन इकडून तिकडे जाऊ देऊ नका. आणि ज्यांनी अपमान सहन करुन नात्यात compromise केलं आहे त्यांनी थोडं प्रॅक्टिकल होऊन सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि काय तो निर्णय घ्या.
प्रत्येक वर्ष तुमचे नसते असा विचार तुम्ही करत असाल तर हा विचार करणे सोडून द्या. यंदाचे वर्ष तुमचेच असणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. अपना टाईम आयेगा नही आ गया ...असे समजा आणि योग्य ते निर्णय 2020 मध्ये घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचे वर्ष अगदी हमखास आणि आनंदात जाईल.
तुम्ही जर फिरण्याचा विचार करत असाल आणि नुसतचं प्लॅनिंग करत असाल तर ही चूक नव्या वर्षात करु नका. तुम्हाला या वर्षात भरपूर फिरायचं आहे . my Rule My life म्हणत तुम्हाला यंदा तुम्हाला मस्त फिरायचं आहे. वर्षभराचे पैशाचे प्लॅनिंग करत तुम्हाला या टूर आखायचे आहे. तुमच्या थांबलेल्या आणि बोअर झालेल्या लाईफला तुम्हाला गिअर घालायचा आहे.
सगळ्या गोष्टींचा इतका विचार करायची आपल्याला इतकी सवय असते की, त्यातून बाहेर पडायची इच्छा आपल्याला नसते. पण हीच चुकीची एक सवय तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत झालेल्या सगळ्या मागच्या गोष्टी विसरा. तुमच्यासोबत कोणी वाईट वागले असेल किंवा तुम्ही कोणासोबत वाईट वागला असाल तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल तर माफी मागून पुढे जा. काही गोष्ट योग्यवेळी योग्य पद्धतीने संपवलेल्या बऱ्या असतात. त्याचा त्रास तुम्हाला पुढे जाऊन होत नाही.
मग आता जर तुम्ही या चुका दरवर्षी करत असाल तर तुम्ही या चुका टाळा आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवा.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.