जीवघेणा उकाडा, पावसात भिजल्यानं होणारी तीव्र डोके-अंग दुखी किंवा बोचऱ्या थंडीमुळे होणारा सर्दी-खोकल्याचा भयंकर त्रास असो… या सर्व समस्यांपासून तुमची एकाच रामबाण उपायाद्वारे सुटका झाली तर? हो हे शक्य आहे. बहुगुणी पुदिन्याचा (Peppermint) वापर केल्यास असंख्य आजारांतून तुम्हाला झटपट आराम मिळण्यास मदत होते. पुदिन्याला (पेपरमिंट) आयुर्वेदातही विशेष असं महत्त्व आहे. पुदिन्याची पाने आकारानं जरी लहान असली तर त्यातील विविध गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्यवर्धक अशी आहेत. पुदिन्याच्या पानांप्रमाणे त्याच्या तेलाचेही अतिशय फायदे आहेत. पेपरमिंट ऑईलमध्ये (पुदिन्याचे तेल) ‘व्हिटॅमिन ए’, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा अॅसिड’चे प्रमाण भरपूर असते. पेपरमिंट ऑईलचे योग्य प्रमाणात वापर किंवा सेवन केल्यास तुमचे केस, त्वचा आणि शरीराच्या आतील-बाहेरील अवयवांचे आरोग्य सुधारते.
पेपरमिंट ऑईलचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Peppermint Oil In Marathi)
अन्नपदार्थांना एक विशिष्ट चव येण्यासाठी, आयुर्वेदिक औषधांमध्येही पेपरमिंट ऑईलचा वापर केला जातो. हे तेल विशेषतः आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पेपरमिंट ऑईलचे बहुगुणकारी फायदे जाणून घ्या आणि शारीरिक समस्यातून सुटका मिळवा.
वाचा : तुमच्या पोटात जाताहेत भेसळयुक्त मसाले, होऊ शकतात गंभीर आजार
1. पचनप्रक्रिया सुधारते (Improves Digestion)
शरीराची पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी पूर्वीच्या काळापासून पेपरमिंट ऑईलचा वापर केला जात आहे. पुदिना आरोग्यासाठी फायदेशीर असतो, त्यामुळे गॅस आणि लहान मुलाच्या पचनप्रक्रियेच्या समस्यांवर पेपरमिंट ऑईलचा वापर करता येतो. आतड्यांची जळजळ होत असल्यासही याचा वापर करावा.
2. श्वसनासंबंधीचे आजार (Respiratory Illnesses)
सर्दी-कफमुळे नाक बंद झाले असल्यास नाकात पुदिन्याच्या तेलाचे थेंब सोडावेत. यामुळे बंद झालेले नाक मोकळे होते. फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढवते. पुदिना तेलाच्या वापरामुळे श्वसन प्रणालीचे स्नायू अधिक बळकटदेखील होतात. याच कारणामुळे सर्दी-खोकल्याचं औषध म्हणून पेपरमिंट ऑईलचा उपयोग केला जातो.
3. डोकेदुखी होते कमी (Relieves In Headache)
तीव्र डोकेदुखीचा त्रास असल्यास पेपरमिंट ऑईलचा वापर करावा. संशोधनानुसार पेपरमिंट ऑईलमुळे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. या तेलाच्या औषधी गुणांना अॅलोपॅथिक औषधांइतकंच प्रभावी मानलं जातं.
वाचा :जेवणानंतर लगेचच पाणी पिता का, मग तुमचं आरोग्य आहे धोक्यात
4. रक्तप्रवाह वाढतो (Increases Blood Flow)
त्वचेच्या समस्या असणाऱ्या पेपरमिंट ऑईलचा अवश्य वापर करावा. या तेलाचा नियमित उपयोग केल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह योग्यरितीने होईल. तेलामध्ये असलेली पोषकतत्त्वे आपली त्वचा अगदी सहजपणे शोषून घेते आणि यामुळे रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.
5. तोंडाचे आरोग्य सुधारते (Improves Oral Health)
पुदिन्याचं एक पान चावून खाल्ल्यानंतरही मुखशुद्धी होते. पेपरमिंट आणि पेपरमिंटच्या तेलात अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगलचे गुणधर्म असल्याचं संशोधनाद्वारे देखील स्पष्ट झालं आहे. ही गुणधर्म तोंडामध्ये जंतू फसरवणाऱ्या जिवाणूंना रोखण्याचं काम करतात. यामुळे तोंडातून दुर्गंधी येत नाही.
6. ताणतणावातून मिळतो आराम (Relieves Stress)
पेपरमिंटच्या तेलामुळे शारीरिक थकवा, ताणतणाव आणि शरीराचं दुखणं कमी होण्यास मदत होते. या तेलाच्या वापरामुळे आपल्या मज्जासंस्थेवर सकारात्मक प्रभाव होतो. यामुळे ताणतणाव, दुखण्यांपासून मुक्तता मिळते. अरोमाथेरेपीमध्ये पेपरमिंट तेलाचा वापर केला जाऊ शकतो.
(वाचा : चेहर्यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे Benefits Of Rice Flour For Face In Marathi)
7. सायनससाठी पेपरमिंट ऑईल फायदेशीर (Peppermint Oil Beneficial For Sinuses)
एका विशिष्ट प्रकारच्या संसर्गामुळे नाकाच्या आतील भागाला सूज येते. यामुळे तीव्र स्वरूपात दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सायनस आजारापासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याचं तेल फायदेशीर ठरेल. कोमट पाण्यात काही थेंब तेल घेऊन नाकात सोडल्यास श्वास घेताना येणारे अडथळे दूर होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास पूर्वीच्या तुलनेत कमी त्रोस होतो.
8. मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग (Urinary Tract Infection)
मूत्रमार्गाच्या भागात झालेल्या संसर्गावर उपाय करण्यासाठी तुम्ही पेपरमिंट ऑईलचा वापर करू शकता. या तेलाच्या वापरामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
9. नखांचे आरोग्य सुधारते (Improves Nail Health)
पेपरमिंट तेलामध्ये असणाऱ्या अँटी-फंगल गुणधर्मामुळे नखांना होणार संसर्ग कमी होतो. नखांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
10. अॅलर्जी आणि संसर्गापासून सुटका (Prevents Allergies And Infections)
पेपरमिंट तेलाच्या उपयोगामुळे कित्येक अॅलर्जी आणि संसर्गापासून सुटका होते. यामध्ये असलेल्या मेंथॉल गुणधर्मामुळे अॅलर्जी कमी होते. पेपरमिंटमध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे संसर्स पसरवणाऱ्या जीवजंतूंचा खात्मा होतो.
पेपरमिंट ऑईलच्या वापरामुळे मिळेल सुंदर-नितळ त्वचा (Peppermint Oil For Skin In Marathi)
करिअरमधील स्पर्धा पाहात हल्ली एखाद्या व्यक्तीच्या दिसण्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या सोयीनं घरगुती औषधोपचार किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुंदर दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पण कॉस्मेटिक उपचार पद्धतींवर पाण्यासारखा खर्च करण्यापेक्षा पेपरमिंट ऑईलचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर डाग, मुरुमांचा समस्या कमी होऊन त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
1. मुरुमांपासून सुटका (Removes Acne)
आकारानं लहान असलेली मुरुमे देखील पूर्णतः जाण्यासाठी बराच कालवधी लागतो. चेहऱ्यावरील मुरुमांमुळे बऱ्याचदा आपला मूड ऑफ होतो, आत्मविश्वासदेखील कमी होतो, यामुळे कित्येक महत्त्वपूर्ण कामांवर दुष्परिणाम होतात. हे त्रास टाळण्यासाठी समस्या समूळ नष्ट होईल, असा रामबाण उपाय शोधावा. पेपरमिंट ऑईल हे त्वचेवरील तैल ग्रंथी नियंत्रित करण्यासाठी ओळखले जाते. यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे मुरुमे पसरवणाऱ्या जंतूंविरोधात लढतात आणि तुमची मुरुमांच्या त्रासातून सुटका करतात. याव्यतिरिक्त यामध्ये असलेल्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे मुरुमांमुळे येणारी सूज देखील कमी होते. ज्या ठिकाणी मुरुमे आली आहेत त्यावर कापसाच्या मदतीनं तेल लावावं.
2. स्क्रबमध्ये वापरा पेपरमिंट ऑइल (Use Peppermint Oil In Scrubs)
पेपरमिंट ऑईलमध्ये ‘व्हिटॅमिन ए’चं प्रमाण असतं. या तेलाच्या वापरामुळे वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर दिसणारी लक्षणं म्हणजे त्वचा सैल पडणे, सुरकुत्यांसारख्या समस्या कमी होतात.
3. निस्तेज त्वचा उजळते (Brightens The Skin)
धूळ, माती, प्रदुषणाचे त्वचेवर दुष्परिणाम होतात. यामुळे त्वचा काळवंडते. ही समस्या दूर करण्यासाठी पेपर मिंट ऑईलचा वापर करावा. यामध्ये असलेल्या ‘व्हिटॅमिन सी’मुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते आणि त्वचा नितळ-निरोगी राहते. व्हिटॅमिन सी अँटी-ऑक्सिडेंटप्रमाणे काम करते. यामुळे चेहऱ्यावरील ताणतणाव, डागांची समस्या कमी होऊन त्वचेचा रंग उजळू लागतो.
4. नैसर्गिक टोनर (Natural Toner)
पेपरमिंट ऑईल आणि सफरचंदाचा गर एकत्रित करून याचा त्वचेसाठी नैसर्गिक टोनर म्हणून वापर करावा. पेपरमिंटमध्ये असणाऱ्या मेंथॉलमुळे त्वचेला थंडावा मिळतो. तर सफरचंदामध्ये असणाऱ्या अँटी-बॅक्टेरिअल गुण मुरुमे येण्यापासून रोखतात. शिवाय, यातील लॅक्टिक आणि मॅलिक अॅसिड त्वचेच्या पीएचमध्ये समतोल राखण्याचं काम करते.
5. फेस पॅक (Face Pack)
पेपरमिंट ऑईल, मुलतानी माती आणि खिसलेली काकडी एकत्रित करून याचा पॅक चेहऱ्यावर लावावा. पेपरमिंटमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए यासांरखे पोषकतत्त्वे आहेत. यामुळे त्वचेच्या कित्येक समस्यांपासून सुटका होते. काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि मुलतानी माती त्वचेरवरील मृत पेशी काढण्याचं काम करते. हा पॅक आठवड्यातून तीन वेळा लावल्यास तुम्हाला चमकदार त्वचा मिळेल.
लांबसडक,काळेशार केसांसाठी वापरा पेपरमिंट ऑईल (Peppermint Oil Benefits For Hair)
पेपरमिंट ऑईलमुळे त्वचेसोबतच केसांचंही सौंदर्य सुधारते. बहुतांश महिला आणि पुरुषांना केसांसंबंधी समस्यांचा सामना कराावा लागतो. केसगळती, कोंड्याची समस्या रोखण्यासाठी केवळ तेल लावणं महत्त्वाचं नाही, तर यासाठी योग्य तेलाची निवड करणं देखील तितकंच आवश्यक आहे. डोक्यामध्ये खाज येणे, टाळूवर खपल्या तयार होणे या त्रासातून सुटका हवी असल्यास काही नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्यास उत्तम. यासाठी पेपरमिंट ऑईल अतिशय चांगला पर्याय आहे. या तेलामुळे तुमचे केस चमकदार, मऊ, आणि मजबूत होतात.
1. केसांची होते वाढ (Hair Growth)
पुदिन्या तेलामध्ये असलेल्या पोषकतत्त्वांमुळे केसगळती रोखली जाते. व्हिटॅमिन सी, लोह आणि झिंकसारख्या तत्त्वांमुळे केसांचे आरोग्य सुधारते. शिवाय, प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणांपासून केसांचा बचाव केला जातो. केसांच्या मुळांना पेपरमिंट ऑईल योग्यरितीने लावल्यास त्या भागातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
2. कोरड्या टाळूसाठी (Scalp) उपयोगी (Useful For Dry Scalp)
पेपरमिंट ऑईल त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करतं. यासाठी निरनिराळ्या मॉईश्चराईझर उत्पादनांमध्ये पेपरमिंट ऑईलचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त यामध्ये मेंथॉल, झिंक आणि सिलॅनियमचाही समावेश असतो. जे टाळूवर अँटीफ्लॅक (टाळूच्या त्वचेवर जखमा-पापुद्रे तयार होण्यापासून रोखते) गुणधर्मासारखे काम करते. या तेलामुळे थंडावा मिळतो आणि कोंड्याची समस्या देखील कमी होते.
3. सर्व प्रकारच्या केसांसाठी फायदेशीर (Useful For All Types Of Hair)
पेपरमिंटचे तेल सर्व प्रकारच्या केसांसाठी म्हणजे कोरड्या, तेलकट, मिश्र केसांसाठी फायदेशीर आहे. दरम्यान, याबाबत केसांसाठी पेपरमिंट ऑईल किती फायदेशीर ठरेल याबाबतचं अचूक वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही.
4. उवांच्या त्रासातून मिळते सुटका (Gets Rid Of Lice)
पेपरमिंट ऑईल हे सुंदर सुगंधासाठी ओळखले जातं. मेंथॉलचे गुणधर्म आपल्या केसांना पुनरुज्जीवित करण्यास मदत करतात. शिवाय, या तेलामुळे उवांची समस्यातून तुमची पूर्णतः सुटका होते. झोपण्यापूर्वी पेपरमिंट ऑईल केसांना लावावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
5. केसांची मुळे मजबूत होतात (Hair Roots Get Stronger)
पेपरमिंटमध्ये मेंथॉन आणि मेंथॉलचे गुणधर्म असतात, यामुळे केसांसह मुळे देखील मजबूत होतात. केसांचं नुकसान होण्यापासूनही बचाव होतो. कित्येक शॅम्पूमध्ये पेपरमिंटचा समावेश केला जातो. तुमच्या शॅम्पूमध्ये पेपरमिंट नसल्यास त्यामध्ये पेपरमिंट ऑईलचे काही थेंब मिक्स करा. शॅम्पूमध्ये मिक्स केलेले तेल तुमच्या केसांसाठी क्लिन्झरप्रमाणे काम करतं.
असा केला जातो पेपरमिंट ऑईलचा उपयोग (Uses Of Peppermint Oil In Marathi)
पेपरमिंट तेलाचा आयुर्वेदिक औषधे, टूथपेस्ट, बाम, परफ्यमू आणि कित्येक अन्नपदार्थांमध्ये वापर केला जातो.
1. आतड्याच्या दुखण्यावर प्रभावी (Effective On Intestinal Pain)
पेपरमिंटमट तेलाच्या वापरामुळे पोटाचे दुखणे, आतड्यांचे दुखणे (Irritable Bowel Syndrome),मळमळ, पचनप्रक्रियेच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. पेपरमिंट तेलानं चार आठवडे उपचार घेतल्यास पोटाची निरनिराळी दुखणी कमी होतात. सर्दी आणि डोकेदुखीचा त्रासदेखील कमी होतो.
2. स्नायूंचा मसाज (Muscle Massage)
पेपरमिंट तेलाच्या वापरामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि शरीराचा थकवादेखील कमी होतो. पेपरमिंट तेलामध्ये शारीरिक वेदना कमी होतील, असे गुणधर्म आहेत. पेपरमिंट ऑईलचे काही थेंब घेऊन स्नायूंना मसाज करावा.
3. सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर (Use In Cosmetics)
पेपरमिंट ऑईलमध्ये सौंदर्यवर्धक गुण असल्यानं साबण, हेअर मास्क, फेस पॅक, तसंच कॉस्मेटिक उत्पादनांमध्येही याचा वापर केला जातो.
4. अन्नपदार्थ (Foodstuffs)
पेपरमिंट ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-व्हायरल, अँटी- इन्फ्लेमेटरी, अँटी-स्पास्मोडिक यांसारखे गुणधर्म असतात. यामुळे अपचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. मुख्यतः पेपरमिंट ऑईलचा अन्नपदार्थांमध्येही उपयोग केल्यास पचनप्रक्रिया सुधारते. तसंच जेवणं स्वादिष्ट देखील होतं. मुखवासातही पेपरमिंट ऑईलचा वापर केला जातो.
पेपरमिंट ऑईलचे दुष्परिणाम (Side Effects Of Peppermint Oil)
पेपरमिंट ऑईलच्या फायद्यांनंतर आता यापासून होणारे दुष्परिणाम देखील जाणून आवश्यक आहे.
1.पेपरमिंट तेलाच्या सेवनामुळे काहींना अॅलर्जी होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ : जळजळ होणे, तोंडाचा अल्सर किंवा जीभ अडकण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
2.अतिरिक्त प्रमाणात पेपरमिंट ऑईलचा वापर केल्यास डोकेदुखी देखील होऊ शकते.
3.योग्य प्रमाणात पेपरमिंट ऑईलचं सेवन न केल्यास याचे अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतील. उदाहरणार्थ -गॅसची समस्या, मळमळ, शरीर थरथरणे, नैराश्य, यकृतामध्ये समस्या, श्वसनाचा त्रास, पोटदुखी, अतिसार, लघवीद्वारे रक्त निघणे, इत्यादी
4.पेपरमिंट ऑईलमध्ये पुलगोन नावाचं विषारी घटक असतो. त्यामुळे अतिरिक्त प्रमाणात याचं सेवन केल्यास शरीरासाठी घातक ठरू शकते.
5. संवेदनशील त्वचेवर पेपरमिंट ऑईलचा वापर केल्यास जळजळ आणि लाल पुरळ येण्याची शक्यता आहे.
NOTE : पेपरमिंट ऑईलचा वापर करण्यापूर्वी डॉक्टर, आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
पेपरमिंट ऑईलचा वापर कोणी करू नये? (Who Should Avoid Peppermint Oil)
1. G6PD कमतरता (G6PD Deficiency)
ज्या लोकांमध्ये G6PD कमतरता असते (शरीरात निर्माण होणारे विशिष्ट द्रव्याची कमतरता) त्यांनी पेपरमिंटचं सेवन करणं टाळावं.
2. औषधोपचारदरम्यान सेवन टाळावं (Avoid Consuming During Medication)
एखाद्या आजारावर औषधोपचार सुरू असताना पेपरमिंट तेलाचं सेवन करणं टाळावं. कारण यामुळे शरीरात तयार होणारे विशिष्ट द्रवपदार्थांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे पेपरमिंट ऑईलचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
3. लहान मुले (Little Kids)
लहान मुलांच्या चेहऱ्यावर, छातीवर किंवा कोणत्याही अवयवावर पेपरमिंट ऑईल लावणं शक्यतो टाळलं पाहिजे. पेपरमिंटमध्ये असणाऱ्या मेंथॉलमुळे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
4. गर्भवती महिला (Pregnant Woman)
हर्निया आणि पित्ताशयासंबंधीत आजारानं पीडित असलेले रुग्ण, गर्भवती महिलांनी पेपरमिंट ऑईलचे सेवन करू नये.
पेपरमिंट ऑईल वापरासंबंधीची प्रश्नोत्तरे(FAQs)
1. केसांना पेपरमिंट ऑईल लावून रात्रभर ठेवू शकतो का?
केसगळती रोखण्यासाठी केसांना पेपरमिंट ऑईल लावण्याच्या काही पद्धती आहेत. पेपरमिंट ऑईल केसांच्या मुळांना आणि टाळूवर लावून मसाज करू शकता. किंवा पेपरमिंट ऑईल तुमच्या आवडत्या तेलात मिक्स करूनही केसांसाठी वापरू शकता. केसांचा मसाज केल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी तेल तसेच राहून द्यावे. यानंतर शॅम्पूनं केस धुवावेत. पण रात्रभर डोक्यावर तेल ठेवणं शक्यतो टाळावे.
2. पेपरमिंट ऑईलचं कच्च्या स्वरुपात सेवन करू शकतो?
आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पेपरमिंट ऑईलचं थेट तोंडावाटे सेवन करावं. कारण याचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरासाठी घातक ठरू शकते. हृदयात जळजळ किंवा एखादी अॅलर्जी होण्याची शक्यता आहे.
3. पेपरमिंट ऑईलचा त्वचेवर थेट उपयोग करणं फायदेशीर ठरेल का?
जर तुमची त्वचा संवेदनशील आहे, तर सुरुवातीला हातावर पेपरमिंट ऑईलचा वापर करून पाहावा. जर यामुळे तुम्हाला त्वचेवर खाज येऊ लागली अथवा त्वचा लाल झाल्यास पेपरमिंट ऑईलचा वापर करू नका.
4. पेपरमिंट ऑईलमुळे डास-कीटकांचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो?
तुमच्या घरात जर झुरळ, कोळी, मुंग्या इत्यादींचा प्रादुर्भाव झाला असल्यास पेपरमिंट ऑईलचा नक्की वापर करावा. पेपरमिंट ऑईल आणि व्हिनेगर समप्रमाणात एकत्रित करावे आणि ज्या ठिकाणी डास-किड्यांची पैदास झाली आहे तेथे फवारावे.
हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.