मेकअपविषयी कमालीची उत्सुकता अनेकांना असते. पण मेकअप किटमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वापर सगळ्यांनाच माहीत नसतो. आता concealerचं घ्या ना. फाऊंडेशनप्रमाणे दिसणाऱ्या या प्रोडक्टची नेमकी गरज काय ही खूप जणांना माहीत नसते. जर तुम्हालाही याचा उपयोग कसा करायचा हे माहीत नसेल तर आज तुम्हाला आम्ही कन्सिलरचा उपयोग कशासाठी आणि कसा करायचा हे सांगणार आहोत. म्हणजे जर तुम्ही हे घेण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला याचा वापर करायला हवा की नको ते कळेल.
काहींच्या चेहऱ्यावर बारीक बारीक काळे डाग असतात. ते लपवण्यासाठी तुम्ही कन्सिलरचा उपयोग करु शकता. आता आपण पायानंतर आपल्या चेहऱ्यावर कन्सीलर लावू शकता. तुमच्याकडे असलेले concealer तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावायचे आहे. थोडेसे कन्सिलर घेऊन ते डागांवर टॅब करायचे आहे. तुम्हाला लगेचच तुमच्या त्वचेत झालेले फरक जाणवेल.
जर तुम्ही तुमचा चेहरा आरशात नीट निरखून पाहिला तर तुम्हाला तुमची त्वचा काही ठिकाणी काळवंडलेली दिसेल. आता हेच फिक्स करण्याचे काम कन्सिलर करते.जर तुमच्या कपाळाचा भाग काळवंडलेला असेल तर ओठांकडील भाग काळवंडलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अगदी हलकेसे concealer लावायचे आहे. आता हा भाग कव्हर करताना तुम्ही ते ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर केला तरी चालू शकेल.व्यवस्थित त्वचेवर लावल्यानंतर तुम्हाला एकसारखी त्वचा दिसेल.
अनेकांना डार्क सर्कलचा त्रास असतो. फाऊंडेशनने डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी होत नाहीत. जर तुम्हाला तुमचे डार्क सर्कल कव्हर करायचे असतील तर तुम्ही कन्सिलर लावायला हवे. डोळ्याखाली त्रिकोण आकारामध्ये तुम्हाला कन्सिलर लावायचे आहे. पण तुम्हाला कन्सिलर जास्त लावायचे नाही. तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाने देखील कन्सिलर लावू शकता. डोळ्यांखाली जर कन्सिलर तुम्ही लावत असाल तर डोळ्याच्या वरही कन्सिलर लावायला विसरु नका. कारण त्यामुळे तुमच्या डोळ्यांचा मेकअप अधिक उठून दिसतो.
67
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.