रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या 'सुपरहिरो'च्या भूमिकेत

रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या 'सुपरहिरो'च्या भूमिकेत

जर तुमचं बालपण 90च्या दशकातलं असेल तर तुम्हाला नक्कीच सुपरहिरो नागराज (Nagraj)च्या अनोख्या पराक्रमांची माहिती देणारे कॉमिक वाचलं असेल. लवकरच नागराजचे पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळणार आहेत.  राज कॉमिक्सचे अध्यक्ष मनोज गुप्ता यांनी बुधवारी या  वृत्तास दुजोरा दिला आहे. अभिनेता रणवीर सिंह ‘नागराज’ची भूमिका साकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या सिनेमाची निर्मिती करण जोहर करणार आहे. सिनेमासंदर्भात सांगताना गुप्ता म्हणाले की, ‘नागराचं पात्र रुपेरी पडद्यावर उतरवण्यासाठी आम्ही रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि करण जोहर (Karan Johar)सोबत बोलणी करत आहोत.  पण अद्यापपर्यंत काहीही निश्चित झालेले नाही. पण याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. 

(वाचा : शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं नोंदवला ‘हा’ नवा रेकॉर्ड)

करण जोहर करणार निर्मिती?

2022 पर्यंत हा सिनेमा बॉक्सऑफिसवर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. सुपरहिरो ‘नागराज’ पात्र संजय गुप्ता यांनी घडवलं आहे आणि राज कॉमिक्सनं याचं प्रकाशन केले होतं. नागराजची पहिली कहाणी परशुराम शर्मा यांनी लिहिली तर कॉमिकमधील चित्र (illustration) प्रताप मुल्लिक यांनी साकारलेली आहेत.   

(वाचा : दीपिकाच्या ‘छपाक’चा ट्रेलर पाहून परफेक्शनिस्ट आमिर खान म्हणाला...)

View this post on Instagram

Saturday Night Fever 🕺🏽

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंहचा आगामी सिनेमा ‘83’चीही उत्सुकता

दुसरीकडे, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांचाही बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातही रणवीरची मुख्य भूमिका आहे. रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका ‘83’ सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.  ‘83’ या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा आहे. याचं चित्रिकरण पूर्ण झालं असून एप्रिल 2020 मध्ये हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडसह क्रिकेटप्रेमी देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटासाठी रणवीर केलेल्या कायापालटामुळे तो हुबेहुब कपिल देव यांच्यासारखाच दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्तानं रणवीर आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

(वाचा : बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील 'सर्वात सेक्सी आशियाई पुरूष')

रणवीर सिंह ठरतोय नंबर वन सेलिब्रिटी ब्रॅंड

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची ब्रॅंड वॅल्यू सध्या चांगलीच वाढत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्यांच्या ब्रॅंड वॅल्यूमध्ये रणवीर नंबर वन ठरला आहे. रणवीरच्या मागील तीन चित्रपटांची कमाई जवळजवळ 800 कोटी रुपये एवढी झाली आहे. लागोपाठ तीन हिट चित्रपट दिल्यामुळे रणवीरचा  भाव आता चांगलाच वधारला आहे. रणवीर सिंह जाहिरात क्षेत्रातदेखील सध्या नंबर वन ब्रॅंड ठरत आहे. त्यामुळे त्याला सतत नवनवीन ब्रॅंडच्या जाहिरातींच्या ऑफर येत आहेत. मागील वर्षी रणवीरने संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावत’ सिनेमामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. पद्मावत चित्रपटासाठी रणवीरने विशेष कष्ट घेतले होते. ‘पद्मावत’नंतर रणवीरचे ‘सिम्बा’ आणि ‘गलीबॉय’ हे दोन्ही चित्रपट लागोपाठ हिट झाले. एका मागोमाग हिट झालेल्या या चित्रपटांनी रणवीरला प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर नेले. रणवीरने या तिन्ही चित्रपटांमधून एकूण 800 कोटी रुपयांची कमाई केली. 2018 आणि 2019 मध्ये रणवीर शिवाय कोणत्याही इतर अभिनेत्याची इतकी कमाई झालेली नाही. शिवाय या यशामुळे रणवीरची जाहिरात क्षेत्रातील ब्रॅंड वॅल्यूदेखील वाढतच चालली आहे.

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.